Sunday, 7 May 2023

अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद

 अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला

इच्छुकांचा चांगला प्रतिसाद


३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी

                   मुंबई, दि. ७ : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु करण्याकरीता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यभरातून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १ हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत.


                   ११ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मुदत कर्ज योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायांना प्रथम प्राधान्य देऊन ३.२० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करुन मंजुरी पत्र लाभार्थ्यांना निर्गमित करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील ७८३ लाभार्थ्यांना आतापर्यंत मंजुरी पत्र निर्गमित करण्यात आले आहेत. कर्ज मंजुरीपत्र निर्गमित केलेल्या लाभार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रावरुन स्थळ पाहणी करण्याच्या सूचना कर्ज वितरण अधिकारी व कर्ज वसुली अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. दस्तऐवजांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने कर्ज परतफेडी संदर्भातील बँकेकडील तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना कर्ज रकमेचे त्वरित वितरण करण्यात येईल, अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी दिली.


                   या योजनेला अल्पसंख्याक समाजाचा मिळालेला प्रतिसाद विचारात घेता प्राप्त झालेल्या अर्जावर जलदगतीने कार्यवाही करण्यासाठी ३१ मे २०२३ पर्यंत नवीन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या अर्जाचा निपटारा करण्यासाठी ३१ मे २०२३ नंतर पुढील आदेश होईपर्यंत या योजनेअंतर्गत नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.


                   या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 हजार 553 प्रस्ताव जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत. यामध्ये मुंबईतून 4 अर्ज, ठाणे 1, रायगड 2, पुणे 84, सोलापूर 44, सातारा 12, सांगली 10, कोल्हापूर 102, नाशिक 7, नंदुरबार 15, धुळे 29, जळगाव 101, अहमदनगर 42, औरंगाबाद 96, परभणी 173, बीड 215, लातूर 53, जालना 82, हिंगोली 43, नांदेड 9, उस्मानाबाद 61, अमरावती 18, वाशिम 54, बुलढाणा 157, यवतमाळ 97, अकोला 27, नागपूर 13, तर वर्धा जिल्ह्यातून 2 अर्ज जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत.


००००

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार 'जनतेशी सुसंवाद

 मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार 'जनतेशी सुसंवाद'.


                मुंबई दि. 7 - राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर 'सरकार आपल्या दारी', 'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या बुधवार आणि गुरूवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


केव्हा आणि कुठे होईल संवाद


बुधवार दि 10 मे रोजी महानगरपालिकेच्या 'सी वॉर्ड' मध्ये कॉन्फरन्स हॉल, सी विभाग कार्यालय, चंदनवाडी, मरीन लाईन्स येथे तर गुरूवार दि 11 मे रोजी 'डी वॉर्ड' मध्ये कॉन्फरन्स हॉल, डी विभाग कार्यालय, ग्रँट रोड (प.) येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत पालकमंत्री श्री. केसरकर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे 'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमास पालकमंत्री यांच्यासोबत संबंधित विभागांचे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.


                या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे.


 

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

 मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


                मुंबई, दि. 7 : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


                महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त केले, त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


                विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


००००


दि. 7 मे, 2023


वृत्त क्र. 1480


 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरसह आसामच्या


मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद


 


मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची केली विनंती


 


मुंबई, दि. 7 - मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.


          मणिपूरमध्ये अडकलेल्या 22 विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार असून तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना मणिपूरहून आसाममध्ये आणण्यात येईल. मणिपूरहून आसामपर्यंत आणताना या विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

रिकामा डबा आणि भरलेलं मन..

 रिकामा डबा आणि भरलेलं मन..

     काल सदाशिवपेठेत माझ्या प्रकाशकाच्या ऑफीसला गेले होते.. येताना तुळशीबागेत सहज चक्कर मारायचा प्लॅन होता आणि श्रीकृष्ण मिसळ खायची पण आमच्या पुण्यात मिसळ ७ वाजता बंद झाली आणि मला तिथुन परत यावे लागले..

बाहेर पडताना डाव्या हाताला एक वयस्कर आजोबा पैसे मागत बसले होते.. आजोबा पाहिल्यावर वाटलं , त्यांना काहीतरी द्यावे तितक्यात माझा फोन वाजला म्हणुन तिथेच बाजूला उभी राहुन फोन घेतला.. फोन संपवुन पर्स उघडणार तितक्यात एक लेडी तिथे आली आणि आजोबाना म्हणाली ,काय रे म्हाताऱ्या अजुन डबा रिकामाच का ?? .. भिक मागुन कमवायची पण लायकी नाही का ?? .. मी उघडलेली पर्स पुन्हा बंद केली .. ती लेडी तिथुन निघुन गेली होती म्हणुन मी आजोबांच्या जवळ गेले आणि म्हणाले ,आजोबा कोण होती हो ती ?? .. त्यांच्या डोळ्यात पाणी दिसले .. मी म्हटलं ,,आजोबा हे पैसे घ्या .. मला माफ करा .. मी तुम्हाला विचारायला नको होते.. तितक्यात ते म्हणाले , पोरी तसं नाही..ती सुन होती माझी .. तिने थोड्या वेळापुर्वी माझ्या डब्यात साठलेले सगळे पैसे नेले आणि आता पुन्हा आली.. हे तुमचे पैसे परत घ्या आणि मला काहीतरी खायला आणुन द्या...नाहीतर आजही रात्री मला उपाशी झोपावे लागेल.. मी त्यांना खायला आणुन दिले पण खुप वाईट वाटलं..यात मला कोणालाच दोष द्यायचा नाही पण तो रिकामा डबा आणि भरलेलं मन मला माझ्या बालपणात घेउन गेलं कारण लहानपणी आमच्या फडताळात ( कपाटात ) बऱ्याचदा मी असा रिकामा डबा पाहिला होता ज्यात ५ पैसेही नसायचे आणि मला पुस्तक किवा पेंसील हवी असायची.. आज त्याच पुस्तक पेन ने मला तुमच्यासारखे वाचक भेटले..

मी थोडी डीस्टर्ब झाले पण काळ आणि वेळ हेच सगळ्यावर औषध असते.. उद्या त्या आजोबांच्या जेवणाचे काय हा प्रश्न वरचा सोडवेल पण त्या प्रसंगाने पुन्हा एकदा मला जमीनीवर राहायला शिकवले..आयुष्यात प्रत्येक क्षण आपल्याला काहीना काही शिकवतो.. फक्त आपले डोळे उघडे हवेत..

सोनल गोडबोले

लेखिका , अभिनेत्री

Phir काहेंगे anrutpal फिरेसे भा ग गया


कोण होते बुद्ध ?*

 *कोण होते बुद्ध ?*


  *"तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!."*


*आजही आमच्या सुशिक्षीत म्हटल्या जाणाऱ्या समाजामध्ये तथागत गौतम बुद्धांबद्दल गैरसमज नाहीत असे नाही . उलट ह्याच लोकांत जास्त गैरसमज आहेत. बुद्धांना एका विशिष्ट समाजाच्या चौकटीत अडकवुन आम्हाला आजपर्यंत खरे बुद्ध समजुच दिले गेले नाही . जर आम्हाला खरे बुद्ध समजले असते तर आज भारतावर ही वेळच आली नसती.*


 *कोण होते बुद्ध ?* 

     

*1) बुद्धांचे पुर्ण नाव सिद्धार्थ शुद्धोधन*

*गौतम शाक्य ...गौतम हे त्यांचे आडनाव आणि शाक्य हे त्यांच्या गणाच नाव...कारण बुद्धांच्या काळात म्हणजे इ.स.पुर्व.563 च्या पुर्वी भारतात जातीव्यवस्था नव्हती , तर गणव्यवस्था होती . भारतीय समाजाचे पाच गण होते .शाक्य , लिच्छवी , कोलियन , द्रविड , गौंड हेच ते पाच गण !*


*2 ) पहिला शाक्य म्हणजे शेती करणारा ..त्याला त्यावेळेस " कणबी " असे म्हणत होते . कण म्हणजे मातीचा कण आणी बी म्हणजे बियाणे ....मातीच्या कणांत बियाण पेरुन जो त्याचा आणि त्याच्या परिवाराचा , समाजाचा उदरनिर्वाह करत होता ..त्याला " कणबी " असे म्हणत होते . कणबीचा पुढ अपभ्रंश झाला " कुणबी " कुणबी म्हणजे आजचा ओबिसी ! मराठा आणी कुणबी एकच . तथागत गौतम बुद्ध कुणबी मराठा होते . त्यांचे वडील आणी परिवार सर्व शेतकरी होते .*


*3 ) जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर हे लिच्छवी गणातले होते . दैत्यासुर  हिरण्यकश्यपुचा मुलगा राजा प्रल्हाद ..प्रल्हादाची दोन मुले ..कपिल आणी विरोचन ! कपिल हा " सांख्यदर्शन " चा प्रणेता हे आपण आपल्या आयुर्वेदाच्या पहिल्या वर्षाच्या " पदार्थ विज्ञान " हया विषयात दर्शन शास्रात बघितले आणी अभ्यासलेले आहे . दुसरा जो विरोचन आहे ..त्याला " वृषभदेव असेही म्हणतात .हाच वृषभदेव म्हणजेच " जैनदर्शन " प्रणेता..म्हणजेच पहिला तिर्थंकर होय ! वर्धमान महावीर हे शेवटचे म्हणजेच 24 वे तिर्थंकर !!*


*4 )  तिसरा जो गण आहे तो कोलियन म्हणजेच आजचा आपला कोळी समाज ! कोळी समाज हा राजा असलेला समाज होता . गौतम बुद्धांची आई देवी महामाया ही कोळी गणाची होती.याचा अर्थ त्यावेळेस कुणबी आणी कोळी यांच्यात आंतरजातीय विवाह होत होते ..म्हणजेच तेव्हा जातीप्रथा नव्हती .*


*5 ) चौथा गण द्रविड ! दक्षिणेतले सातवाहन , सातकर्णी हे द्रविड गणातील बुद्धीस्ट राजे होते .*


*6 ) आणी पाचवा गण गौंड ! महापराक्रमी , दशविद्याप्राप्त , प्राच्यविद्यापंडीत राजा रावण हा गौंड गणातील होता . गौंड म्हणजेच आजचा आमचा आदिवासी समाज . आजही मध्यप्रदेशातील बैतुल आणी विदर्भातील अनेक जिल्ह्यातील आमचा आदिवासी समाजाची लोक  रावणदहन करत नाहीत  . तर तिथ रावणाची आमचा आदिपुरुष म्हणुन पुजा करतात . झारखंण्ड राज्यातील आदिवासी समाज राजा रावणाची पुजा करतो .त्याला देव मानतो.*


*7 ) बुद्धानी प्रचलीत वैदिक व्यवस्थेला छेद  देत बुद्धीप्रामाण्यवादी , विज्ञानवादी , वास्तववादी अश्या विचारांची , धम्माची आणी त्या विचारांचा प्रचार आणी प्रसार करण्यासाठी संघाची स्थापना केली.चार आर्यसत्ये , पंचशिल , अष्टांगमार्ग ह्या माध्यमातुन समाजाला दिशा देण्याच काम केले. याचा परिणाम असा झाला कि बुद्धकाळात भारत " सोनेकी चिडीया " म्हणुन प्रसिद्ध होता. शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी उघडण्यात आली . स्री-पुरुष भेदाभेद नष्ट झाला . समाज कर्मकांडापासुन दुर गेला , नालंदा ..तक्षशिला ..विक्रमशीला सारखी विश्वविद्यालये स्थापन झाली , जिथे एका वेळी जगातील 60,000 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत होते . योगा शास्र हे बुद्धांची देण आहे . पतंजली हा नालंदा विद्यापिठाचा विद्यार्थी होता . तो योगाभ्यासात पारंगत होता .अर्थशास्राचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ.अमर्त्य सेन म्हणतात कि बुद्ध काळात भारताचा GDP ( Gross Develpment Product ) हा जगाच्या GDP च्या 33% होता . यावरुन बुद्धकाळात भारत किती प्रगतीशील आणि विकसित होता याची आपल्याला प्रचिती येईल!*


*8 ) बुद्ध काळ हा 800 वर्षांचा ! सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा पहिला सम्राट तर सम्राट बृहद्रथ मौर्य हा शेवटचा दहावा सम्राट ! त्याची हत्या त्याच्याच  सैन्यातील सेनापती पुष्यमित्र शुंग नावाच्या सेनापतीने कपटाने हत्या केली आणि बुद्धसाम्राज्याला उतरती कळा आली . भारतात जातीव्यवस्था , स्री- गुलामगिरी , स्री- दास्यता , क्रमिक असमानता ( Greded Inequality ) आणि मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा , रुढी परमपरांची निर्मिती झाली . ह्या गोष्टींना फाटा देण्याच काम भविष्यात लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर , महानुभाव पंथाचे प्रवर्तक संत चक्रधर , वारकरी पंथाचे प्रवर्तक संत नामदेव महाराज ..जगदगुरु तुकोबाराय , छ.शिवाजी महाराज , छ.संभाजी महाराज ...महात्मा जोतीराव फुले , शाहु महाराज आणी सर्वात शेवटी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे .*

*9 ) ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने जगातील 100 महान महापुरुष्यांची " विश्वाचे निर्माते " ( Makers Of The Universe )  म्हणुन एक यादी जाहीर केली . त्यात पहिली चार नाव भारतीय होती ....*


*A ) तथागत भगवान गौतम बुद्ध* 

*B ) वर्धमान महावीर* 

*C ) प्रियदर्शी सम्राट अशोक* 

*D ) विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!*

    

    *आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे .ज्या ज्या देशांनी बुद्ध स्विकारले ..ते ते देश आज प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर विराजमान आहेत मात्र आम्हाला बुद्ध कधी समजुच दिला नाही आणी आम्हीही कधी बुद्धांना समजुनच घेतलं नाही . जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणाऱ्या ह्या महामानवास ..विश्वनिर्मात्यास कोटी कोटी प्रणाम ! 

*बौद्ध पौर्णिमेच्या सर्व भारतीयांना मंगलमय हार्दीक हार्दीक शुभेच्छा!*

*भवतु सब्ब मंगलम!*


मला उपलब्ध झालं, मनाला भावलं. खास आपल्यासाठी  ....

*दिलीप साळुंके* 

*जेष्ठ पत्रकार-रंगकर्मी, नाशिक*


🙏🙏🙏🙏🙏

प्रवाळ पिष्टि....एक महत्त्वाचे.. आयुर्वेद औषध

 *प्रवाळ पिष्टि....एक महत्त्वाचे.. आयुर्वेद औषध...*


.....प्रवाळ म्हणजे मराठीत पोवळे, आणि हिंदित मूंगा.. याच्यावर आयुर्वेद पद्धतीने काही संस्कार केले कि प्रवाळ पिष्टि हे औषध तयार होते. शुद्ध प्रवाळ हे चिनि मातिच्या खलात , गुलाब पाण्यात २१ दिवस कुटल्या जाते.. आणि मग हि पुटि तयार होते.. अतिशय उपयुक्त असे हे औषधं आहे. आपण याचे औषधि गुणधर्म बघू या...👇


..१) तळहात व तळपाय यांचि आग, जळजळ होत असल्यास किंवा पूर्ण शरीराचि आग होत असल्यास, त्वचा कोरडी पडत असेल तर, डाळिंबाचा रस काढून घ्यावा व प्रवाळ पिष्टि सोबत घेतल्यास लगेच आराम मिळतो.

२) लहान मुलांना दात येताना खूप त्रास होतो, जुलाब डिसेंट्री होते,ताप येतो, अशा वेळी त्यांना मधात मिसळून चाटण द्यावे. दात लवकर येतात, तसेच बर्याच लहान मुलांना रिकेटस् मूडदुस कुपोषणामुळे होतो. हाडे ठिसूळ होतात,अशा वेळी प्रवाळ पिष्टि हे औषध गुळवेल सत्त्वासोबत दिल्यास हा रोग बरा होतो.

३) रक्ति मूळव्याध झाल्यास, तसेच नाकातून रक्त येत असल्यास, युरिनमधून रक्त येत असल्यास, शरिरातील कोणत्याही भागातून रक्त येत असल्यास प्रवाळ पिष्टि , हे गुळवेल सत्त्व, व नागकेशर चूर्णासोबत दिल्यास वरील सर्व त्रास दूर होतात.

४) हायपर अॅसिडिटि, आम्लपित्त झाले की, छातीत जळजळ होते, जीव घाबरतो, पोट दुखत, घशात जळजळ होते, तोंडात आंबट पाणी येते, अशा वेळी प्रवाळ पिष्टि हे औषध जेवणाच्या एक तास आधी गुळवेल सत्त्व व आवळा रसासोबत दिल्यास बरे वाटते.


                     


५) प्रवाळ पिष्टि मध्ये कॅल्शियम विपूल प्रमाणात असते,कारण प्रवाळ हा एक प्रकारचा खडक आहे, जो समुद्रिजीवजंतू तयार करतात.म्हणून ज्यांना याची कमतरता आहे त्यांनी हे रोज मधात मिसळून घ्यावे.

६) बर्याच जणांना छातित धडधड होणे , जीव घाबरणे, पल्सेस वाढतात, अशांनी प्रवाळ पिष्टि डाळिंबाचा रस काढून, यासोबत घेतल्यास आराम मिळतो.

७) गरोदर स्त्रियांना प्रवाळ पिष्टि दिल्यास होणारं बाळ हेल्दी, निरोगी आणि भविष्यात देखील बलवान राहतं, कारण यात विटामिन डी, व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

८) कांजिण्या गोवर येऊन गेल्यावर, शरिराची आग होते, नागिण झाल्यावर देखील आग होते. अशा वेळी रोज प्रवाळ पिष्टि डाळिंबाचा रस काढून यासोबत घेतल्यास आराम मिळतो, आणि शरिरात थंडावा तयार होतो.

९). संधिवात आमवात गुडघेदुखी कंबरदुखी, हे सर्व वाताचे विकार नेहमी कॅल्शियम कमी झाल्यामुळे होतात, कारण बहुतेक डिलिव्हरी मध्ये हे खुप कमी होते. आणि मग याची पूर्तता. न झाल्याने चाळीशी नंतर वरील आजार उद्भवतात.अशा वेळी. प्रवाळ पिष्टि व दूध एकत्र घ्यावे. याने ताकद येते.

‌१०) त्वचा विकार..\\-- प्रवाळ पिष्टि मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते, यामुळे, पिंपल्स, फुंसि, पुरळ, हे सर्व दूर होतात, आणि चेहरा उजळतो,प्रवाळ पिष्टि दूधातून घ्या.

११) प्रवाळ पिष्टि मध्ये लेक्सेटिव्ह गुण धर्म आहे. त्यामुळे पचन संस्था मजबूत होते. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, हे सर्व त्रास दूर होतात. पचन व्यवस्थित होते. पित्त होतं नाही, सर्व प्रकारचे पित्त विकार दूर होतात.

१२) ताप आला की, तहान तहान होते,खूप घाम येतो, थकवा येतो, अशा वेळी प्रवाळ पिष्टि शहाळे पाण्यासोबत घ्यावे याने शरिरातील उष्णता कमी होते, व तापही उतरतो.

१३) मुत्र विकार\\--\\.. युरिनची जळजळ होणे, युरिन होतांना वेदना होणं, वारंवार होणे, किंवा न होणे यासर्व विकारांवर प्रवाळ पिष्टि दिल्यास जळजळ दूर होते. .


  आपण याचे अतिशय मौल्यवान उपयोग बघीतले.. आयुर्वेद जगतातील. हे फार महत्त्वाचे औषध आहे.

.. घरात जरूर ठेवावे. कधीही उपयोगी पडते..


  आयुर्वेद अभ्यासक..... सुनिता सहस्रबुद्धे.... 


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi