Friday, 13 January 2023

करदात्यांना त्याच्या वापरावर देखरेख करण्याचा अधिकार असला पाहिजे

 इन्कमटॅक्स भरणारेच्या परवानगीशिववाय सरकार काहीच फुकट वाटणार नाही न्यायालयाच्या या निर्णयामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना बसेल लगाम.

सर्वोच्च न्यायालयाने काल एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला की करदात्यांची अखिल भारतीय संघटना स्थापन करावी, जी जगातील सर्वात मोठी संघटना असेल.


 कोणतेही सरकार सत्ताधारी असले तरी, या संस्थेच्या मान्यतेशिवाय, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही सरकार मोफत वीज, मोफत पाणी, मोफत वितरण किंवा कर्जमाफीची घोषणा करू शकत नाही.

 पैसा आमच्या कर देयकांचा असल्याने, करदात्यांना त्याच्या वापरावर देखरेख करण्याचा अधिकार असला पाहिजे.

 राजकीय पक्ष मतांसाठी फुकट वाटून जनतेला आमिष दाखवत राहतील, कारण त्याचा फायदा त्यांना होतो.  ज्या काही योजना जाहीर केल्या जातात, त्या आधी सरकारने त्यांची ब्लू प्रिंट देऊन या संस्थेची संमती घ्यावी.  खासदार-आमदारांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या इतर बिनदिक्कत लाभांनाही हे लागू व्हायला हवे.

 लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित आहे का?  त्यानंतर आम्हा करदात्यांना कोणते अधिकार आहेत?

 संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल खासदार, आमदारांना जबाबदार धरण्याचा आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही अधिकार करदात्यांना असला पाहिजे.  ते सर्व "सेवक" आहेत, करदात्यांनी भरलेले आहेत.

 राईट टू रिकॉल अशा कोणत्याही ‘फ्रीबीज’चीही लवकरच अंमलबजावणी व्हायला हवी.

 तुम्ही सहमत असाल तर कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा.  हे करण्यासाठी, पोस्ट शेअर करा.

 तुमच्या किमान 10 मित्रांना ते पाठवा.

 कृपया व्हायरल होण्यासाठी हा संदेश शेअर करा.  🙏


 https://www.nationalheraldindia.com/india/sc-forming-panel-to-examine-issue-of-freebies-by-political-parties-is-burial-by-committee-experts

ब्रम्हांड दाखवते फक्त बायको

 आई कडेवर घेऊन चंद्र दाखवते,


बाप खणकन वाजवून सूर्य दाखवतो,


शिक्षक गृहपाठ देऊन नक्षत्र दाखवतात,


नोकरीत साहेब दिवसा ढवळ्या तारे दाखवतो,


आणि


बायको समोर आली तर ब्रम्हांड दिसतं.


बाकी हे इस्रो, नासा वैगरे अंधश्रद्धा......😂😂😁😁

बेस्ट आचारी कमी मेहेंनतना

 *कोणाला आचारी लागला तर कमी पैशात मिळेल महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट आचारी 🤣 🤣*


जिंदगी


कभी जीने की आशा,

कभी मन की निराशा,

कभी खुशियों की धूप,

कभी हकीकत की छाव,

कुछ खोकर पाने की आशा,

शायद यही है जीवन की परिभाषा

: प्रतिभा आपल्याला आपल्या कारकिर्दीत उच्च स्थानावर नेईल परंतु वागणूक आपल्याला इतरांच्या हृदयात उच्च स्थान टिकवून ठेवण्यास मदत करेल


सुप्रभात .. आपला दिवस आनंदात जावो...🌹🌹🌹: ☀️☀️☀️☀️☀️🙏🏻☀️☀️☀️☀️☀️

*प्रवास हा असाच असतो..,*

*चढ आला तर कष्ठाने चढायचा असतो*

*आणि उतार आला की त्याचा आनंद*

*लुटायचा असतो...*

☀️☀️☀️☀️☀️🙏🏻☀️☀️☀️☀️☀️

           

सही दिशा में किया गया 

      अच्छा कर्म 

मनुष्य का वर्तमान और भविष्य

    दोनों बदल देता है!!: *गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर*.....,

*संकटाच्यावेळी* 

*आपली माणसं गर्दी करायला* 

*विसरत नाहीत*....!!!!!!

*वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचे*

           💐 *शुभ दिवस* 💐

तेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट

 तेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट

 

          मुंबईदि. 12 : तेलंगणा राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक बी. राजा मौली यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांची भेट घेऊन महासंचालनालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.

            तेलंगणा राज्याचे माहिती संचालक बी. राजा मौली यांच्या अध्यक्षतेखाली पथकाने आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास भेट दिली. पथकात सहसंचालक डी. एस. जगनसहसंचालक डी. एस. श्रीनिवासन यांचा समावेश होता.

            महासंचालक जयश्री भोज यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संचालक हेमराज बागुलडॉ. राहुल तिडकेउपसंचालक दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.

            सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांनी राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करीत असलेले विविध उपक्रम याची माहिती दिली. त्यांनी लोकराज्यचे अंकही भेट दिले.

            यावेळी शासकीय जाहिरात वितरण धोरणशासकीय अभियानाची प्रसिध्दीसाठी समाज माध्यम आणि विविध नवीन माध्यमांचा वापरप्रसार माध्यम प्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधाप्रसार माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

            श्री. राजामौलीश्री. जगन आणि श्रीनिवासन यांनी माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम प्रतिसाद केंद्र (एमआरसी) आणि स्टुडिओची पाहणी केली. तिथे केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली.

*****

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेपत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार.

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फेपत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार.

            मुंबई, दि. १२ : लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र, ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संर्स्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घ्ज्ञेवून यंदापासून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.


            मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधीच्या माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार दिला जाणार आहे, तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मतदार मित्र पुरस्कार दिला जाणार आहे. दहा हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. हे पुरस्कार २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्य कार्यक्रमात वितरीत केले जातील. पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वत: अर्ज करू शकतात. त्यासाठी मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्यालयाचा अहवाल स्वरूप माहिती आणि छायाचित्रांसह आपला अर्ज democracybook2022@gmail.com या ई- मेल आयडीवर अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर (मोबाईल क्रमांक ८६६९०५८३२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


०००००

मेट्रो ७, मेट्रो २अ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल

 मेट्रो ७, मेट्रो २अ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण.

            मुंबई, दि. १२ :- मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग '२अ' ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंधेरी परिसरातील गुंदवली स्थानक येथे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.


            यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २ अ चा ३५ किलोमीटर्सचा टप्पा पूर्ण झाला आहे. यातील ३३ स्थानके लोकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. हा टप्पा लोकांच्या सेवेत येण्याने अंधेरी, दहिसर, वर्सोवा या परिसरातील मुंबईकरांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल.


            रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १९ जानेवारीला होणार आहे. या मेट्रोचे भूमीपूजन पंतप्रधान श्री. मोदी यांच्याच हस्ते झाले होते, हा एक मोठा योगायोग आहे. लाखो लोकांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. लोकांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. ही मेट्रो लाखो मुंबईकरांसाठी वरदान ठरेल. मुंबईमध्ये आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. रखडलेले हे प्रकल्प आम्ही वेगाने मार्गी लावले आहेत. काँक्रीटचे रस्ते, एसटीपी प्लांट, आरोग्याचे विषय, सुशोभीकरण अशा प्रकल्पांचेही पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ही मुंबईकरांसाठी एक मोठी भेट ठरेल, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.


मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २अ ची वैशिष्ट्ये...


            मुंबई मेट्रो कॉरिडॉरमध्ये एकूण ३३७.१ किमी लांबीचे मार्ग बांधणे प्रस्तावित आहे. हे सर्व मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यावर, मेट्रो प्रणालीमध्ये दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीच्या १.३ पट प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता असेल.


मुंबई मेट्रो मार्ग ७ विषयी...


            मुंबई मेट्रो मार्ग ७ गुंदवली (अंधेरीपूर्व) ते दहिसर पूर्व कॉरिडॉर ही पश्चिम द्रुतगती मार्गालगत असून मुंबई मेट्रो मार्ग ७ मुळे मुंबईच्या पश्चिमेकडील भागांना पूर्वेकडील भागांशी जोडून सेवा देईल.


            मुंबई मेट्रो मार्ग ७ मुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग-७ टप्पा-१ आणि टप्पा २ या दोन टप्प्यात पूर्ण केली आहे.


            मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-१ ) हा १०.९०२ किमी लांबीचा उन्नत कॉरिडॉर आहे ज्यामध्ये ९ स्थानके आहेत (आरे ते दहिसर (पू)) ज्यामधे (दहिसर (पू) हे स्थानक मुंबई मेट्रो मार्ग २अ अंतर्गत येते.


            मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-१) मध्ये (१) ओवरीपाडा (२) राष्ट्रीय उद्यान (३) देवीपाडा (४) मागाठाणे (५) पोईसर (६) आकुर्ली (७) कुरार (८) दिंडोशी (९) आरे या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.


            मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) ५.५५२ किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे ज्यामध्ये ४ स्थानके आहेत (गुंदवली ते आरे), मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) मध्ये (१) गोरेगाव पूर्व (२) जोगेश्वरी पूर्व (३) मोगरा (४) गुंदवली या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.


मुंबई मेट्रो मार्ग २अ विषयी....


            मुंबई मेट्रो मार्ग २अ अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व कॉरिडॉर मुंबईच्या पश्चिमेकडील भागांसाठी अत्यंत उपयुक्त असा मार्ग आहे.


            मुंबई मेट्रो मार्ग २अ सुद्धा टप्पा-१ आणि टप्पा-२ या दोन पूर्ण केली आहे.


मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-१) हा ९.८२८ किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे ज्यामध्ये ९ स्थानके आहेत (डहाणुकरवाडी ते दहिसर पूर्व).


मुंबई मेट्रो मार्ग २ अ (टप्पा-१) मध्ये (१) दहिसर पूर्व (२) आनंद नगर (३) कांदरपाडा (४) मंडपेश्वर (५) एकसर (६) बोरिवली प. (७) पहाडी एकसर (८) कांदिवली प. (९) डहाणुकरवाडी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.


मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-२) हा ८.७६८ किमी लांबीचा एलिव्हेटेड मार्ग आहे ज्यामध्ये स्थानके आहेत (वळनाई ते अंधेरी प.),


मुंबई मेट्रो मार्ग २अ (टप्पा-२) मध्ये (१) वळनई (२) मालाड प. (३) लोअर मालाड (४) पहाड़ी गोरेगाव (५) गोरेगाव प. (६) ओशीवरा (७) लोअर ओशीवरा (८) अंधेरी प. या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.


मुंबई मेट्रो मार्ग ७ - एकूण लांबी १६.५ किमी, एकूण स्थानके १३ (उन्नत)


कार्यान्वयीत स्थानकेः ९ (टप्पा-१) (१) ओवरीपाडा (२) राष्ट्रीय उद्यान (३) देवीपाडा (४) मागाठाणे (५) पोईसर (६) आकुर्ली (७) कुरार (८) दिंडोशी (९) आरे


टप्पा-२ मधील स्थानके: ४ (१) गोरेगाव पूर्व (२) जोगेश्वरी पूर्व (३) मोगरा (४)


इंटरचेंज स्थानके : (१) गुंदवली- मेट्रो मार्ग १ वरील पश्चिम द्रुतगती मार्ग स्थानकासोबत (२) जोगेश्वरी पूर्व मेट्रो मार्ग ६ सोबत


मुंबई मेट्रो मार्ग २ अ - एकूण लांबी १८.६ किमी, एकूण स्थानके: १७ (उन्नत)


कार्यान्वयीत स्थानकेः ९ (टप्पा-१) ((१) दहिसर पूर्व (२) आनंद नगर (३) कांदरपाडा (४) मंडपेश्वर (५) एकसर (६) बोरिवली प. (७) पहाडी एकसर (८) कांदिवली प. (९)) डहाणुकरवाडी


टप्पा-२ मधील स्थानके : ८ (१) वळनई (२) मालाड प. (३) लोअर मालाड (४) पहाडी गोरेगाव (५) गोरेगाव प. (६) ओशीवरा (७) लोअर ओशीवरा (८) अंधेरी प.


इंटरचेंज स्थानके : (१) दहिसर पूर्व मेट्रो मार्ग ९ सोबत (२) अंधेरी प. मेट्रो मार्ग १ वरील डि. एन. नगर


0000



Featured post

Lakshvedhi