Saturday, 5 November 2022

महाराष्ट्रातील युवक व महिलांना उद्योजकता प्रोत्साहनासाठी महाराष्ट्र चेंबर व एम.एस.एम.ई मंत्रालय संयुक्त अभियान राबवणार

 महाराष्ट्रातील युवक व महिलांना उद्योजकता प्रोत्साहनासाठी महाराष्ट्र चेंबर व एम.एस.एम.ई मंत्रालय संयुक्त अभियान राबवणार

 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मान्यता


 नवी दिल्ली : महाराष्ट्रातील युवकांना व महिलांना उद्योजकतेसाठी प्रेरित करून त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व केंद्र सरकारच्या एम.एस.एम.ई मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात अभियान राबविण्यासाठी एम.एस.एम.ई खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.


          महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शिष्टमंडळासह नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन यासंबंधीची संकल्पना मांडून प्रस्ताव सादर केले होते.


          त्यानुसार हे अभियान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, एम.एस.एम.ई मंत्रालय भारत सरकार व उद्योग विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.


          महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या 23 नोव्हेंबर च्या जयंती दिनापासून या अभियानास सुरुवात होईल व राज्यातील 36 जिल्ह्यातील 75 ठिकाणी या अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून व्यापार उद्योगातील नवीन संधी, त्यासाठी असलेल्या सरकारच्या योजना, अर्थ पुरवठ्यासाठीच्या उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या योजना, केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानाच्या योजना व्यापार, उद्योगासाठी लागणारे प्रशिक्षण यासंबंधीची माहिती या अभियानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच या अभियानांतर्गत उद्योग आधार योजनेखाली राज्यातील व्यापारी, उद्योगांची नोंदणी करण्याची मोहीमही हाती घेण्यात येणार आहे.


          संपूर्ण महाराष्ट्रातून किमान 5000 युवक व 5000 महिला नवीन व्यापार उद्योग सुरू करतील अशा प्रकारचे हे आयोजन केले असल्याची माहिती देऊन ललित गांधी पुढे म्हणाले की या अभियानामुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यातील तरुण व महिलांना व्यापार उद्योगासाठी प्रेरणा मिळणार आहे.


          महाराष्ट्र चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्ष संगीता पाटील, युथ विंगचे चेअरमन संदीप भंडारी एम. एस. एम. ई कमिटीचे चेअरमन आशिष नहार व अन्य पदाधिकारी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत असून, 23 नोव्हेंबर ते 15 मार्च या कालावधीत राज्यभरातील 50000 युवक व महिलांच्या पर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती ही ललित गांधी यांनी यावेळी दिली.यावेळी भेटलेल्या शिष्टमंडळात संदीप भंडारी, महाराष्ट्र चेंबर चे दिल्ली प्रतिनिधी जे.के. जैन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते


फोटो कॅप्शन : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उद्योजक प्रोत्साहन अभियानाची अभियानाचे प्रस्ताव सादर करताना महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, संदीप भंडारी व अन्य मान्यवर.

Thanks and Regards,

Lalit Gandhi | President

Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture (MACCIA)

Head Office - Oricon House, 6th Flr, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400 001, Maharashtra | Tel: +91 22 6739 5811 | Fax: 2285 5861 

Nashik Branch - 201, Sarda Sankul, M. G. Road

ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणेइलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट

 ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणेइलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट करून घेण्याचे आवाहन

             मुंबई, दि. 04 : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधरकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेर मीटर 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत रिकॅलिब्रेट करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी केले आहे.


            मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. ऑटो रिक्षा व टॅक्सी धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम 1.5 किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 21 रुपये होता. आता वाढीव दर 23 रुपये, असा ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी 14.20 पैसे होता,तो आता 15.33 पैसे केला आहे. टॅक्सीसाठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वी 25 रुपये होते. तो आता 28 रुपये असा ठरविण्यात आला.असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी 16.93 पैसे होता, तो आता 18.66 पैसे व कूल कॅब (वातानुकूलित) साठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वीचा दर 33 रुपये भाडेदर होता, तो आता 40 रुपये असा दर ठरविण्यात आला असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 22.26 पैसे होता, तो सुधारित 26.71 पैसे असा ठरविण्यात आला आहे. ही भाडेवाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून अंमलात आली आहे.


            प्रवाशांना योग्यप्रकारे भाडे आकारणी करण्याकरिता ऑटो रिक्षा व टॅक्सी मध्ये बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये नवीन भाडेदराप्रमाणे दुरुस्ती करुन या संबंधित कार्यालयामार्फत रिकॅलिब्रेशन तपासून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयामध्ये नोंदणीकृत असलेल्या ऑटो रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी परवानाधारकांसाठी रिकॅलिब्रेट केलेल्या मीटरच्या चाचणीसाठी यंत्रणा कार्यरत आहे. तारखेनुसार पूर्व नियोजित वेळ घेवून इलेक्ट्रॉनिक मीटर रिकेलिब्रेट केलेल्या वाहनांची चाचणी पूर्व द्रुतगती महामार्ग ( गोदरेज कंपनी गेट क्र. ०२, विक्रोळी पूर्व, मुंबई) या ठिकाणी दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत करण्यात येत आहे.


            ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंत एकूण ऑटो रिक्षांपैकी केवळ ११ टक्के परवानाधारकांनी चाचणीसाठी वाहन हजर करून मीटर चाचणी उत्तीर्ण केली आहे. तसेच ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंत एकूण काळी-पिवळी टॅक्सींपैकी केवळ ४ टक्के परवानाधारकांनी चाचणीसाठी वाहन हजर करून मीटर चाचणी उत्तीर्ण केली आहे. हे प्रमाण अत्यल्प असून रिकॅलिब्रेट केलेल्या इलेक्ट्रॉनिक फेअर मोटरसह वाहने या कार्यालयाकडून चाचणी करीता सादर करुन तपासून घेणे आवश्यक आहे.


            रिकेलिब्रेशनसाठीची मुदत प्राधिकरणाने दि. ३० नोव्हेंबर २०२२ अखेरची दिली असल्याने त्यानंतर मीटर रिकेलिब्रेशन चाचणीसाठी येणाऱ्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल.


            विहित वेळेत रिकॅलिब्रेशन करून कार्यालयामार्फत घेण्यात आलेली चाचणी उत्तीर्ण केली नसल्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या ठरावाप्रमाणे प्रत्येक दिवस एक दिवस परवाना निलंबन मात्र किमान 7 दिवस, जास्तीत जास्त 90 दिवस किंवा मुदत समाप्तीनंतर प्रतिदिन 50 रुपये आणि जास्तीत जास्त 5 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी 30 नोव्हेंबर, 2022 पूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे नोंदणीकृत असलेल्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी त्यांचे इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर वाढीव भाडेदराप्रमाणे रिकॅलिब्रेट करून घ्यावे.


            रिकॅलिब्रेशनची मुदत दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत असली तरी वाढीव भाडेदर हे दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत. रिकॅलिब्रेट होईपर्यंत सर्व प्रवाशांना व ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकांना ठरवून देण्यात आलेले दराप्रमाणे प्रवासाचे भाडे अदा करता येतील व घेता येतील. दर हे क्यूआर कोडसह विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑटो रिक्षा व टॅक्सी भाडेवाढ नवीन (New) या टॅबवर क्लिक करून ऑटो रिक्षा, काळी-पिवळी व कूल कॅब टॅक्सीसाठी दराचा आधार घेवूनच भाडेदर प्रवाशांनी अदा करावेत. तसेच संकेतस्थळावर दर हे क्यूआर कोडसह प्रदर्शित केले असल्याने हा क्यूआरकोड ग्राह्य धरण्यात यावा. तसेच ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी देखील रिकॅलिब्रेट होईपर्यंत या दराचा वापर करावा आणि प्रवाशांकडून योग्य भाडेदर आकारावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच दि. 1 ऑक्टोबर, 2022 नंतर आटो रिक्षा व टॅक्सी चालकांकडून विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास त्याविषयीची तक्रार संबंधित कार्यालयाकडे   घटनेच्या इतर तपशीलासह करावी, असे परित्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

जयसिंगपूर मधील रेल्वेक्रॉस पुलाबाबत सकारात्मक कार्यवाहीचे मुख्यमंत्र्याचे निर्देश.

 जयसिंगपूर मधील रेल्वेक्रॉस पुलाबाबत सकारात्मक कार्यवाहीचे मुख्यमंत्र्याचे निर्देश.

            मुंबई, दि. ४ : जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील रेल्वे क्रॉस पुलाबाबत परिसरातील रहिवाशी क्षेत्र आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            या पुलाबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. बैठकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, परिवहन विभागाचे सह सचिव सिद्धार्थ खरात, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता अरोरा आदी सहभागी झाले.


            जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर आरओबी पूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. वर्दळीचा मार्ग आणि आजूबाजूचे रहिवाशी क्षेत्र यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टीने पूल व्हावा, अशी मागणी होती. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या पुलाबाबत स्थानिक रहिवाश्यांची सुरक्षितता, वाहनांची मोठी वर्दळ हे लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले.

राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा

 सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार

राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा

                          - सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना







      मुंबई, दि. 5 - आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले.

            उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सरन्यायाधीश यांच्या पत्नी अमिता लळीत, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.


            सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपली कर्मभूमी सुप्रीम कोर्टात असली तरीही जी कामे हाती घेतली त्यात राज्याशी संबंधित अधिक कामे होती असे सांगितले महाराष्ट्राचा सुपुत्र असल्याने घरात मराठमोळ वातावरण आणि बांधिलकी कायम ठेवल्याचे ते म्हणाले. राज्यात कोकण सोलापूर नागपूर मुंबई येथे अधिक संबंध आला असला तरी प्रत्येक जिल्ह्याची माहिती असावी यासाठी मोटरसायकल वरून दौरा केल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये अनेकदा सहभागी झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली. महाराष्ट्राच्या मातीशी जवळचा संबंध असल्याने मायेची ऊब कायम आपल्या सोबत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध कायम मनात राहील, असे सांगून राज्याच्या वतीने आग्रहाने झालेल्या सत्काराबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


            सर्वसामान्यांना न्यायप्रक्रिया सहज समजावी यासाठी न्यायपालिकेच्या कामात मातृभाषेचा उपयोग वाढावा, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. सरन्यायाधीश मराठी भाषेत बोलले याबाबत आनंद व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, सर्वसामान्यांचा संबंध असेल त्या क्षेत्रात मातृभाषेतून कामकाज होणे गरजेचे आहे. कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांमध्ये आपण मराठी भाषेतून बोलण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. देशात अनेक कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा केली जात आहे याबाबत समाधान व्यक्त करून सरन्यायाधीश लळीत हे पुढील काही दिवसात निवृत्त होत असले तरीही कायदा क्षेत्राला त्यांचे मार्गदर्शन यापुढेही मिळत राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश लळीत यांच्या कार्याचा गौरव करून न्यायालयीन कामकाज अधिक गतीने आणि पारदर्शकपणे व्हावे असा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले. राज्य शासन देखील कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशाने काम करीत असून मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सुलभतेने व्हावे यासाठी वांद्रे येथे नवीन न्यायालयीन संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली. महाराष्ट्र अनेक बाबतीत देशाचे ग्रोथ इंजिन मानले जाते. अनेक सुधारणांची सुरुवात राज्यातून झाली आहे. राज्याने देशाला अनेक विद्वान, कायदे पंडित दिले.

न्यायदानाच्या क्षेत्रातील हा लौकिक लळीत कुटुंबियांनी कायम ठेवला. सरन्यायाधीश उदय लळीत तो वारसा पुढे चालवत असून त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश लळीत यांचा राज्याला अभिमान असून त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या हस्ते सत्कार असल्याचे सांगितले. राज्यात न्यायदानाची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी विधी व न्याय मंत्री म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरन्यायाधीश लळीत यांच्या न्यायदानातील कार्याचा गौरव करून न्यायदानाचे काम सुलभ व्हावे यासाठी त्यांचे मार्गदर्शन निश्चित मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


            प्रारंभी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या मानपत्राचे वाचन केले. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी तर राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000



तुलसी विवाह


 

तुळशी विवाह

 🌹⚜️🚩🔆🌅🔆🚩⚜🌹


           🌻 *आनंदी पहाट* 🌻


             *स्वप्नपुर्तीच्या मंजूळ*

                  *सनईसूरांची* 


            *तुळसी विवाह प्रारंभ*


🏵🔆🌸🌿🎷🌿🌸🔆🏵


        *महाप्रसाद जननी*

        *सर्व सौभाग्यवर्धिनी,*

        *आधि व्याधि हरा नित्यं* 

        *तुलसी त्वं नमोस्तुते*


        *भारतीय संस्कृतीने चराचरावर प्रेम करायला शिकवलेय. येथील सर्वच नदी, डोंगर, पशु, वृक्ष.. वनस्पतींचा जीवनात उपयोग असल्याने त्यांचे श्रद्धेने पूजन करायला सांगितलेय. वड, पिंपळ, अर्जुन आदि आयुर्वेदीय वृक्ष घरासमोर लावणे शक्य नसले तरीही सर्वच वनस्पतींचे प्रतिक म्हणून दारोदार तुळस आहे.*

        *कार्तिक महिना हा तुळस लागवडीसाठी उत्तम महिना. आज तुळसीचे औषधी महत्व अखिल विश्वाने मान्य केलेय. तुळस ही प्राणवायूची संजीवनी घरोघरी आहेच. तुळसीचे रोपण.. संगोपन.. दर्शन.. स्पर्श.. ध्यान.. नमन.. पूजन सारेच मंगलदायी.*

        *तुळसीला पाणी देत.. प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक मानले जाते. आज तुळसीशी भावनिक नाते जोडणारा विष्णू अवतार शालीग्रामाशी तुळसीचा लग्नसोहळा सानंद पार पडणार. या विवाहात मांडव ऊसाचा. तर बोर.. आवळा पूजनात हवेच. सर्वात मोठे दान म्हणजे कन्यादान. तुळसी विवाहाने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते ही धारणा.*

        *समाजात कुणाचे वर.. वधू संशोधन सुरू असेल तर त्यांना लग्नाची घाई करण्याची आठवण होते. ज्यांची लग्न ठरली आहेत त्यांची विवाह प्रतिक्षा संपणार.. त्यांचा दांपत्य जीवनाच्या शुभारंभासाठी आता मुहुर्त सुरू झालाय.*

        *पूर्वजांनी वातावरण बदलाच्या पूर्ण अभ्यासांती संपन्न असा हा लग्नासाठीचा मुहुर्तकाळ निश्चित केलाय. आज पासून सुरू होणार ते मंजुळ सनई चौघड्याचे सूर आणि हवीहवीशी वाटणारी.. सुखावणारी.. आनंदी अशी मंगलाष्टकेही बराच काळ ऐकू येणार. तुळशी विवाह ही त्याची रंगीत तालीम.. नांदीच आहे.*

        *तुळसी विवाह झाल्याने आता लग्नास आतुरांच्या भुवया उंचावल्यात. त्यांना शुभेच्छा देत चला मग म्हणायला "शुभमंगलss सावधान.." !!*

        *श्रीकृष्णाच्या सुस्वभावावर.. रुपावर.. पराक्रमावर भाळून रुख्मिणीने त्याला मनोमन वरले. पत्नी म्हणून स्विकारण्याची विनंती केली. श्रीकृष्णाने लग्नासाठी संमती दिल्याने रुख्मिणी मोहरुन गेलीय. तिला समोर कृष्णमुर्तीच दिसतेय. पण तरीही घरच्यांना वियोग होणार म्हणून उदास झाली. पण श्रीकृष्णाच्या बासरीचे मधुर सूर ऐकताच ती चिंतामुक्त झाली.*

        

🌸🌿🎷🥁💝🥁🎷🌿🌸

अंधेरी पूर्व मतदारसंघ पोटनिवडणूकघरुन मतदान'

 अंधेरी पूर्व मतदारसंघ पोटनिवडणूकघरुन मतदान' उपक्रमात नोंदणीकृत मतदारांपैकी९१ टक्के ज्येष्ठ मतदारांनी केले मतदान

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने राबविला यशस्वी उपक्रम.

            मुंबई उपनगर, दि. ४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आलेल्या "घरून मतदान" या उपक्रमांतर्गत 'अंधेरी पूर्व' मतदारसंघातील ४३० मतदारांनी सहमती दर्शवली होती‌. यापैकी तब्बल ९१ टक्के मतदारांनी म्हणजेच ३९२ मतदारांनी घरून मतदान करून आपले लोकशाही विषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.


            मुंबई उपनगर जिल्ह्यातील 'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यंदाच्या या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या निवडणूक इतिहासात 'घरुन मतदान' हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत असणाऱ्या व ८० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत घरुनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.


            देशभरात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत 'अंधेरी पूर्व' मतदारसंघात करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत अधिक माहिती देताना श्री.पाटील यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील ८० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांची एक स्वतंत्र यादी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तयार करण्यात आली होती. या यादीमध्ये साधारणपणे ७ हजार मतदारांची माहिती होती. या यादीतील सर्व मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा असल्याची माहिती देण्यासह या सुविधेंतर्गत नोंदणी करण्याचा पर्याय असल्याचे सांगण्यात आले होते. या पर्यायानुसार ४३० ज्येष्ठ मतदारांनी घरून मतदान या प्रक्रियेसाठी आपले नाव नोंदविण्याची सहमती दिली. त्यानंतर ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या ३ दिवसांच्या कालावधी दरम्यान 'अंधेरी पूर्व' मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेली ७ व्यक्तींची चमू या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी गेली‌. घरी पोहचल्यानंतर या चमूद्वारे तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात आले. या तात्पुरत्या मतदान केंद्रात घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्तीने नाव नोंदविले आहे, त्या व्यक्तीने आपले मत हे 'गुप्त मतदान' पद्धतीने नोंदविले. ज्येष्ठ नागरिकांनी केलेले हे मतदान भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सीलबंद करून जमा करण्यात आले आहे.


            या तपशिलानुसार 'घरून मतदान' या सुविधेंतर्गत 'अंधेरी पूर्व' मतदार संघातील ज्या ४३० ज्येष्ठ मतदारांनी नाव‌ नोंदविले होते, त्यापैकी ३९२ मतदारांनी घरून मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. याचाच अर्थ या वर्गवारीतील मतदारांपैकी तब्बल ९१.१६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मतदान प्रक्रियेत आपला उत्साहवर्धक सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पाटील यांनी दिली.


0000

Featured post

Lakshvedhi