🌹⚜️🚩🔆🌅🔆🚩⚜🌹
🌻 *आनंदी पहाट* 🌻
*स्वप्नपुर्तीच्या मंजूळ*
*सनईसूरांची*
*तुळसी विवाह प्रारंभ*
🏵🔆🌸🌿🎷🌿🌸🔆🏵
*महाप्रसाद जननी*
*सर्व सौभाग्यवर्धिनी,*
*आधि व्याधि हरा नित्यं*
*तुलसी त्वं नमोस्तुते*
*भारतीय संस्कृतीने चराचरावर प्रेम करायला शिकवलेय. येथील सर्वच नदी, डोंगर, पशु, वृक्ष.. वनस्पतींचा जीवनात उपयोग असल्याने त्यांचे श्रद्धेने पूजन करायला सांगितलेय. वड, पिंपळ, अर्जुन आदि आयुर्वेदीय वृक्ष घरासमोर लावणे शक्य नसले तरीही सर्वच वनस्पतींचे प्रतिक म्हणून दारोदार तुळस आहे.*
*कार्तिक महिना हा तुळस लागवडीसाठी उत्तम महिना. आज तुळसीचे औषधी महत्व अखिल विश्वाने मान्य केलेय. तुळस ही प्राणवायूची संजीवनी घरोघरी आहेच. तुळसीचे रोपण.. संगोपन.. दर्शन.. स्पर्श.. ध्यान.. नमन.. पूजन सारेच मंगलदायी.*
*तुळसीला पाणी देत.. प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक मानले जाते. आज तुळसीशी भावनिक नाते जोडणारा विष्णू अवतार शालीग्रामाशी तुळसीचा लग्नसोहळा सानंद पार पडणार. या विवाहात मांडव ऊसाचा. तर बोर.. आवळा पूजनात हवेच. सर्वात मोठे दान म्हणजे कन्यादान. तुळसी विवाहाने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते ही धारणा.*
*समाजात कुणाचे वर.. वधू संशोधन सुरू असेल तर त्यांना लग्नाची घाई करण्याची आठवण होते. ज्यांची लग्न ठरली आहेत त्यांची विवाह प्रतिक्षा संपणार.. त्यांचा दांपत्य जीवनाच्या शुभारंभासाठी आता मुहुर्त सुरू झालाय.*
*पूर्वजांनी वातावरण बदलाच्या पूर्ण अभ्यासांती संपन्न असा हा लग्नासाठीचा मुहुर्तकाळ निश्चित केलाय. आज पासून सुरू होणार ते मंजुळ सनई चौघड्याचे सूर आणि हवीहवीशी वाटणारी.. सुखावणारी.. आनंदी अशी मंगलाष्टकेही बराच काळ ऐकू येणार. तुळशी विवाह ही त्याची रंगीत तालीम.. नांदीच आहे.*
*तुळसी विवाह झाल्याने आता लग्नास आतुरांच्या भुवया उंचावल्यात. त्यांना शुभेच्छा देत चला मग म्हणायला "शुभमंगलss सावधान.." !!*
*श्रीकृष्णाच्या सुस्वभावावर.. रुपावर.. पराक्रमावर भाळून रुख्मिणीने त्याला मनोमन वरले. पत्नी म्हणून स्विकारण्याची विनंती केली. श्रीकृष्णाने लग्नासाठी संमती दिल्याने रुख्मिणी मोहरुन गेलीय. तिला समोर कृष्णमुर्तीच दिसतेय. पण तरीही घरच्यांना वियोग होणार म्हणून उदास झाली. पण श्रीकृष्णाच्या बासरीचे मधुर सूर ऐकताच ती चिंतामुक्त झाली.*
🌸🌿🎷🥁💝🥁🎷🌿🌸
No comments:
Post a Comment