Saturday, 5 November 2022

जयसिंगपूर मधील रेल्वेक्रॉस पुलाबाबत सकारात्मक कार्यवाहीचे मुख्यमंत्र्याचे निर्देश.

 जयसिंगपूर मधील रेल्वेक्रॉस पुलाबाबत सकारात्मक कार्यवाहीचे मुख्यमंत्र्याचे निर्देश.

            मुंबई, दि. ४ : जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील रेल्वे क्रॉस पुलाबाबत परिसरातील रहिवाशी क्षेत्र आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            या पुलाबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. बैठकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, परिवहन विभागाचे सह सचिव सिद्धार्थ खरात, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता अरोरा आदी सहभागी झाले.


            जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर आरओबी पूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. वर्दळीचा मार्ग आणि आजूबाजूचे रहिवाशी क्षेत्र यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टीने पूल व्हावा, अशी मागणी होती. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या पुलाबाबत स्थानिक रहिवाश्यांची सुरक्षितता, वाहनांची मोठी वर्दळ हे लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi