Thursday, 6 October 2022

लहान मुलांसाठी 'खिलखिलाहट' रुग्णवाहिका

 मुंबई उपनगर जिल्ह्यात 'पालकमंत्री आपल्या भेटीलाया उपक्रमात 170 नागरिकांनी मांडल्या विविध तक्रारी

लहान मुलांसाठी 'खिलखिलाहटरुग्णवाहिका उपलब्ध करून देणार

- मंत्री मंगलप्रभात लोढा

 

            मुंबईदि. 6 : लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर 'खिलखिलाहट' रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

        घाटकोपर येथील एन वॉर्ड येथे  पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या दारीया उपक्रमात अर्जदार पूनम नायर यांनी लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका मिळत नसल्याने तत्काळ उपचार मिळत नाहीत,  अशी तक्रार केली होती त्यावर उत्तर देताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक ,आमदार पराग शहा, ‘एन वॉर्ड’ चे सहायक आयुक्त संजय सोनवणे,अपर जिल्हाधिकारी नीलिमा धायगुडे,निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईकउपायुक्त देविदास क्षीरसागरयासह  सर्व विभागाचे अधिकारी,  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             मंत्री श्री.लोढा म्हणाले,गुजरात शासनाने लहान मुलांसाठी 'खिलखिलहाटही  रुग्णवाहिका योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर मुंबई उपनगर परिसर येथे 'खिलखिलाहाटरुग्णवाहिका सुरू करणार आहे. जिल्ह्यातील समस्या जाणून घेवून त्यावर कार्यवाही करण्यात येइल.ज्या नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत त्यांच्या टोकन क्रमांकानुसार अर्ज निकाली काढू असे नागरिकांना त्यांनी सांगितले.

     नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून त्यावर जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री.लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

             पालकमंत्री  यांनी  सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

‘आर साऊथ वॉर्ड’ येथे उद्या 'पालकमंत्री आपल्या भेटीला'

            दि.6 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत 'पालकमंत्री आपल्या भेटीलाहा उपक्रम राबवण्यात येणार आहे.तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त  नागरिकांनीआपल्या तक्रारीच्या अर्जासह 'पालकमंत्री आपल्या भेटीलाया उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

            शुक्रवार दि.07/10/2022 रोजी आर साऊथ वॉर्ड येथेशनिवार 08/10/2022 रोजी के ईस्ट वॉर्ड,सोमवार दि.10/10/2022  रोजी आर सेंट्रल वॉर्ड,बुधवार दि. 12/10/2022 रोजी एल वॉर्ड,गुरुवार दि. 13/10/2022 रोजी एस वॉर्ड,शुक्रवार दि.14/10/2022 रोजी  एम ईस्ट वॉर्ड,शनिवार  दि.15/10/2022 एच वेस्ट वॉर्ड,सोमवार दि.17/10/2022 रोजी आर नॉर्थ वॉर्ड येथे,बुधवार,दि 19/10/2022 रोजी पी नॉर्थ वॉर्ड येथे,गुरुवार दि 20/10/2022 रोजी पी साऊथ वॉर्ड येथे,सोमवार येथे 31/10/2022 रोजी एम वेस्ट वॉर्ड येथे,बुधवार दि.02/11/2022 रोजी के वेस्ट वॉर्ड येथे,गुरुवार दि. 03/11/2022 रोजी एच ईस्ट वॉर्ड येथे,शुक्रवार, दि.4/11/2022 रोजी टी वॉर्ड येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील.नियोजित रोजी सकाळी 10 वाजता मुंबई उपनगर जिल्ह्यात हा उपक्रम  सुरु होईल.

             जिल्हाधिकारी: https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in  वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.


नवसंशोधन

 सर्व क्षेत्रात नवसंशोधन झाल्यास देश प्रगतीची शिखरे सर करील

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ संपन्न

            मुंबई, दि. ६ : नवीनताशोध व संशोधनाची  कास सोडून केवळ इतरांचे अनुकरण केल्यामुळे देशाची पीछेहाट झाली. मात्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीनता व नवसंशोधनावर भर देताना आंतर शाखीय अध्ययनाला महत्व दिले आहे.  केवळ विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात नवसंशोधन न होता ते कला व मानव्यशास्त्र विषयात देखील झाल्यास आज पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेला भारत प्रगतीची नवी शिखरे सर करेलअसे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 

            राज्य शासनाने नव्याने स्थापन केलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालात्यावेळी ते बोलत होते.

            मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या दीक्षांत समारंभाला राज्याचे माजी लोकायुक्त न्या. मदनलाल टहलियानीविद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रजनीश कामतकुलसचिव प्रा. युवराज मलघेसंचालिका परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ विजया येवलेविज्ञान संस्थेचे संचालक डॉ जयराम खोब्रागडेसिडनहॅम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ माधुरी कागलकर तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकार मंडळांचे सदस्य तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

            आज देशात  संपूर्ण स्वदेशी बनावटीची हेलिकॉप्टर व विमाने निर्माण होत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये देखील आमूलाग्र संशोधन होत आहे. या पार्श्वभूमीवर स्नातकांनी मोठे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून कठोर परिश्रमनिर्धारसमर्पण भावना व शिस्तीने काम केल्यास कोणतेही लक्ष्य प्राप्त करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

            डॉ होमी भाभा यांच्या योगदानाचा गौरव करताना विद्यार्थ्यांनी डॉ भाभा यांच्या प्रमाणे विलक्षण कार्य केल्यास पुढील २० वर्षात विद्यापीठाच्या उत्तम माजी विद्यार्थ्यांचे प्रभा मंडळ तयार होईल असे राज्यपालांनी सांगितले. 

            भ्रष्टाचार ही कीड असून ती समूळ नष्ट करण्यासाठी नैतिक मूल्ये बळकट करणे आवश्यक आहे याचा विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जीवन मूल्य व संस्कारांना महत्व देण्यात आले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            दीक्षांत समारंभात सुवर्ण पदक विजेत्यांमध्ये ९० टक्के मुली असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना आगामी काळात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त  केला.

            आपल्या दीक्षांत भाषणात  माजी  लोकायुक्त न्या. मदनलाल टहलियानी यांनी, विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी व कुटुंबासाठी अर्थार्जन करताना सेवात्याग व इतरांचे हित ही मूल्ये जपल्यास कामाचे समाधान मिळेल व समाजाचे हित देखील साधेल असे सांगितले.

            दहशतवादी अजमल कसाब यांच्यावरील खटला आपण विक्रमी गतीने चालविला व कमी वेळेत निकाल दिला कारण या खटल्यामध्ये प्रत्येक दिवसागणिक देशाचे करोडो रुपयांचे नुकसान होत होते, असे त्यांनी सांगितले.  

            भ्रष्टाचार हा कर्करोग असून प्रत्येकाने किमान आपण स्वतः भ्रष्टाचार करणार नाही हा निर्धार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

            विद्यापीठाचा अहवाल सादर करताना कुलगुरू प्रा. रजनीश कामत यांनी डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाची स्थापना  हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी दूरदर्शी निर्णय असल्याचे सांगितले.

            विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकमहर्षी कर्वेडॉ. होमी भाभारँग्लर व्ही. व्ही. नारळीकरअर्थतज्ज्ञ दीपक पारेख यांसारखे स्नातक निर्माण झाले असे त्यांनी सांगितले.

            विद्यापीठ आणि ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली असून बॅचलर ऑफ सायन्स इन डाटा सायन्स हा अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.     

            दीक्षांत समारंभात ४१३ स्नातकांना पदवी देण्यात आली तसेच १३ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.

००००

 

Maharashtra Governor presides over the First Convocation of

Dr. Homi Bhabha State University

 

            Mumbai Dated 6 : The Governor of Maharashtra and Chancellor of public universities in the State Bhagat Singh Koshyari presided over the first Convocation of the newly created Dr. Homi Bhabha State University, Mumbai on Thursday (Oct 6).

            The Convocation Ceremony held at the Cawasji Jahangir Convocation Hall of University of Mumbai was attended by former State Lokayukta Justice M L Tahaliyani, Vice Chancellor Dr Rajanish Kamat, Registrar Prof Yuvraj Malghe, Director, Board of Evaluation and Assessment Vijaya Yeole, Director of Institute of Science Dr Jairam Khobragade, Principal of Sydenham College Dr Madhuri Kagalkar, members of various boards of authorities of the university and graduating students.

            In all 413 students were awarded degrees at the Convocation. Thirteen students receiving gold medals and certificates of merits were also felicitated.

0000


शेतकरी आत्महत्या

 राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सेंद्रिय शेतीला लोकचळवळीचे स्वरूप देणार

 

            मुंबईदि. 6: शेतकरी आत्महत्या रोखणे व सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी ‘डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियान’ ची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली.

            नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत मुख्यमंत्री श्री. शिंदे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहकेंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमरकेंद्रीय रसायन व खत मंत्री मनसुख मांडविया आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.

राज्यात 10 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेराज्यात सुमारे 5.27 लाख हेक्टर क्षेत्रात प्रमाणित सेंद्रिय शेती केली जाते. राज्यातील आदिवासी भागासह 10 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली येत असून केंद्राच्या कृषी विकास योजना आणि भारतीय नैसर्गिक शेती प्रणाली योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. रासायनिक औषधे आणि खतांचा वापर कमी व्हावा यासाठी विज्ञानाधारित सेंद्रिय शेतीसाठी राज्यात प्रयत्न सुरू आहेत. रासायनिक खते आणि औषधांशिवाय जमिनीचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन नैसर्गिक शेती पद्धतीचा वापर वाढविण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करीत आहे. यामुळे कमी खर्च आणि अधिक फायदेशीर शेती होण्यास मदत होईल. त्याचा लहान शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

सेंद्रिय शेती व डिजीटल शेतीसाठी मास्टर्स ट्रेनर कार्यक्रम सुरू करणार

            राज्यात आतापर्यंत 1628 शेतकरी गटातील 61 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना माफक दरात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती प्रमाणित करण्यासाठी राज्य शासनाची स्वतंत्र प्रमाणन संस्था स्थापन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत आहेअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. नैसर्गिक आणि डिजिटल शेती संदर्भात प्रशिक्षणाची गरज असून यासाठी मास्टर्स ट्रेनर कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात येईलअशी ग्वाही देतानाच त्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

            कृषी व्यवसायास प्रोत्साहन देणे आणि कृषी उत्पादनांची मूल्य साखळी विकसित करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीवरही भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ई - पीक पाहणीत एक कोटी हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांची माहिती

            डिजिटल शेतीसाठी प्रयत्न करण्यात येत असून राज्यातील 2 कोटी 20 लाख 45 हजार 901 शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख माहितीचे डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी ई - हक्क प्रणालीवर फेरफार नोंदीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा असून अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्याची सोय असल्याचे त्यांनी सांगितले. ई-पीक पाहणी उपक्रमातून एक कोटी हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांची माहिती मिळाली आहे. प्रधानमंत्री शेतकरी  विमा योजनेच्या ऑनलाइन पोर्टलवर 1 कोटी 12 लाख शेतकऱ्यांचा डाटाबेस उपलब्ध आहे. जमिनीच्या नोंदीनुसार या डेटाबेसची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया राज्यात सुरू असून हा डाटाबेस इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरेलअसा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

००००


जा रे ओ harjai

 माधवराव आणि मालतीच्या दुसऱ्याही मुलीचं लग्न व्यवस्थित पार पडलं. 

वऱ्हाडास निरोप दिल्यानंतर दोघे थोडं निवांत बसले असतांना माधवराव म्हणाले....

 *"तुला आठवतं ? मुली लहान होत्या तेव्हा तू भांडतांना म्हणायचीस, 'मुलींकडे पाहून इथं राहतेय, नाहीतर केव्हाच सोडून गेले असते....!!!!'*


😜😂🤣😁

दसरा आला... आता चला आपट्याची झाडे 🍃तोडूया

 ✨ दसरा आला... आता चला आपट्याची झाडे 🍃तोडूया..!


❄️ परंतु खरंच का आपटा दसऱ्याला तोडल्यानंतर त्याची पाने वाटतात ? आपण खरंच निसर्गप्रेमी आहोत का ? याचा विचार देखील एकदा केला पाहिजे.

दसऱ्याचे सोनं म्हणून आपण आपट्याची पानं सर्रास तोडतो आणि या गावाला वाटत सुटतो.. खरं सोनं असतं तर असं वाटलं असतं ?

परंतु मित्रांनो, आपट्याचे झाडाचे पान देखील सोन्या इतकच महत्त्वाच आहे.

आपट्याला शास्त्रीय भाषेत bahunia racemosa म्हणतात. ढीगभर फायदे आहेत या झाडाचे. खडकाळ मुरमाड टेकड्यांवर किंवा माळरानावर जर आपट्याचे झाडाचे रोपण केले तर इथं हे झाड खूप चांगलं वाढतं. माळरानावर येणारा एक आदर्श वृक्ष म्हणून आपटा गणला जातो.

आपटा हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते. गुजरातमध्ये पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. जुन्या काळात तोटयाच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासुन तयार होत असत.

अश्‍मंतक याचा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय. धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः। मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।

पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा. आपट्याच्या पानाच्या मुळे गुरांच्या दुधात वाढ होते शिवाय आपट्यामुळे निसर्ग संवर्धनाची कार्य देखील खूप चांगले होते.

परंतु आपण करतो काय तर विजयादशमीच्या मुहूर्तावर फक्त कोल्हापूर सारख्या भागात जवळजवळ वीस ते पंचवीस टणांपेक्षा जास्त आपटा तुटला जातो आणि अगदी तीन चे चार तासात ही सर्व पाने जमिनीवर रस्त्यावर पसरलेली असतात...

म्हणजे त्यांचं महत्त्व संपते..?

जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला आपटा आपण मातीत मिसळतो...! हे आपलं दुर्दैव आहे...!

आता आपट्याची झाड कालांतराने कमी होत आहेत, त्यामुळे आपट्यावरून आपण कांचन या वृक्षावर आलेलो आहे. काही दिवसानंतर कांचनार जरी संपला तर कदाचित आपण वड, पिंपळ यांची पाने वाटण्यासाठी देखील मागे पुढे पाहणार नाही, अशी आपली गत झालेली आहे...

वास्तविक पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या वृक्षावर लपवली होती, असे इतिहासात उल्लेख आहेत. ते शमीचे झाड कसं आहे हे देखील बऱ्याच लोकांना माहीत नाही. त्याकरिता शमी, कांचन आणि आपटा या तिन्हीचे फोटो इथे देत आहे आणि मला असं वाटतं की इथून पुढे आपट्याची पाने तोडून न वाटता सरळ "आपट्याचे झाडच" किंबहुना "शमीचे देखील झाड" सोनं म्हणून दिलं तर नक्कीच त्या झाडाचं संगोपन आणि संवर्धन होऊ शकेल.. आणि पर्यायाने आपण निसर्गाच्या बांधणीत हातभार लावू..!

सण आला य ग




 शहापूर, तालुका अलिबाग, रायगड 

रावण sahita

 रावण जळत असताना रावणाने

हसून गर्दीकडे बघितलं

तपासा स्वतःच्या चारित्र्याला

मोठ्यानं त्यानं विचारलं. 


केलाय मी गुन्हा 

सीतेचं अपहरण करण्याचा

प्रयत्न नाही केला

मर्यादेची सीमा ओलांडण्याचा.


दिवसाढवळ्या रस्त्यावर

अब्रूचे लचके तोडतात

सभ्यपणाचा आव दाखवून

दरवर्षी मला जाळतात.


तुम्हा मानवां पेक्षा

राक्षस ठरलो भारी

केला नाही अपमान

सीतेचा माझ्या दारी.


हुंड्याच्या लालसेपोटी

तुम्ही हजारो सीता जाळल्या

वंशाच्या दिवट्या साठी

गर्भात कळ्या मारल्या


हक्क नाही तुम्हांला

मला बदनाम ठरवण्याचा

प्रयत्न करा तुम्हीं

स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा!


तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा

पण पेटवण्याआधी तुमच्यातील राम मला दाखवा !


👍🏻

Featured post

Lakshvedhi