Thursday, 29 September 2022

हृदयी जागा


 

Good day

 Even a correct decision is wrong when it's too late,

Life is a game of timing, respect time and time will respect you.

सुप्रभात

: 🌹 सुप्रभात 🌹

ताकत अपनी आवाज मे नही,

     अपने विचारो मे रखो,

    क्योंकी फसल बारिश से

     होती है....बाढ से नही |

 *आत्मविश्वासाने मारलेली उडी नेहमीच यश देते मग ती पाण्यात असो वा आयुष्यात !!*


Ambe ma

 

समीता समीर माळोदे 

Good day





 

गृहनिर्माण

 मुंबईचा कायापालट करण्यासाठी कामांना गती द्यावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला गृहनिर्माण विभागाचा आढावा

 

            मुंबई दि. 28 : मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांना पूर्ण करून मुंबईचा कायापालट करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी तसेच कामकाजात पारदर्शकता आणावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            गृहनिर्माण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी बांद्रा येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी  गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकरएमएमआरडीए चे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासबृहन्मुंबईपोलीस आयुक्त विवेक फणसळकरम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेगृहनिर्माण विभागाशी संबंधित शासनाकडे प्रलंबित असलेले विषय तातडीने मार्गी लावण्यात येतील. म्हाडा किंवा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईलअसा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

            लोककल्याणासाठी हे शासन कार्यरत असून गृहनिर्माण विभागाचे निर्णय हे कोणत्याही दबावाखाली घेतले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कामकाजात सुसुत्रता आणुन अधिकाधिक पारदर्शकता वाढविण्यावर भर देण्यात यावा असेही ते म्हणाले.

            पुढील काही काळातच दृष्य स्वरूपातील बदल झाले पाहिजेत यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य शासनातर्फे केले जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई मंडळाने काढलेल्या सारसंग्रह या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी झालेल्या सादरीकरणातील प्रमुख मुद्दे

·        समूह विकासाच्या योजना म्हाडा मार्फत राबविणार.

·        बिडीडी चाळीचे काम वेगाने व्हावे यासाठीचा आढावा

·        धोरणात्मक निर्णय घेऊन  लोकांना मोठ्या प्रमाणात सदनिका मिळतील यावर लक्ष केंद्रीत करणार

·        गिरणी कामगारांना घरे देण्यासंदर्भात चर्चा

·        ठरवलेल्या जागांवरचे काम पुर्ण करणे तसेच नव्या बांधकामात गिरणी कामगारांसाठी लॉटरी काढणार.

·        एसआरए च्या बंद पडलेल्या ६८ योजना खासगी विकासकाकडून काढून म्हाडा मार्फत विकसीत करणार.

·        बॅंकांमध्ये किंवा अन्य न्यायिक कारणांनी रखडलेल्या योजनांना पुन्हा सुरू करणार

·        एसआरए योजनांमधील रहिवाश्यांचे थकीत भाडे आणि संभाव्य भाडे देता यावे यासाठीची योजना आणणार.

·        कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात प्रस्ताव सादर करणार

·        धारावी पुनर्विकासासाठी निविदा काढणार

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/28.9.22

 


आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन

 भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटनउषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

 

लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा हा ऐतिहासिक क्षण;

या महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

संगीत महाविद्यालयातून भारतीयवैश्विक संगीत शिकता येणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

            मुंबई, दि. 28 : लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा आजचा हा क्षण ऐतिहासिक आणि भाग्याचा असून या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आज रवींद्र नाट्यमंदीर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन २०२० चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना तर सन २०२१ चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला.

            सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटीलउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलउद्योग मंत्री उदय सामंतशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरआमदार सदा सरवणकरआमदार आशीष शेलारज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कीमीनाताई खडीकरपद्मश्री सोनू निगमआदिनाथ मंगेशकरसंगीतकार मयुरेश पैज्येष्ठ गायक अनुप जलोटाज्येष्ठ गायक पंकज उधासज्येष्ठ गायक रूपकुमार राठोडसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन

            भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या बोधचिन्हाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेलतादीदी आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचा स्वर हृदयात घर करून आहे. मराठी मातीमध्ये जन्मलेले हे रत्न अवघ्या भारत देशाचे झाले. करोडो रसिकांच्या मनात त्या एक दंतकथा म्हणून राहिल्या होत्या त्यांचा स्वर कानावर पडत नाही असा एकही दिवस जात नाही असे सांगून त्यांनी स्वरमाऊलीला अभिवादन केले. दीदींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे आज वितरण झाले. या पुरस्काराच्या जोडीने संगीत महाविद्यालयासाठी पावले टाकलीगेल्या मंत्रिमंडळ बैठकीतच आम्ही निर्णयही घेतला. या महाविद्यालयासाठी सध्या तात्पुरत्या स्वरुपात पु.ल.देशपांडे कला अकादमीची जागा उपलब्ध करून दिली असून ग्रंथालय संचालनालयाची कालिना येथील 7 हजार चौरस मीटर जागा कला संचालकांकडे सुपूर्द करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

            आज दोन वर्षांचे पुरस्कार ज्यांना प्रदान केले जात आहेतत्या ज्येष्ठ गायिका उषा ताईआणि ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसाद ही दोन्ही नावं नतमस्तक व्हावीत अशीच आहेत. त्यांनी आपल्या नावानेच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे आणि अजूनही गाजवताहेत. या दोन्हीही महान कलाकारांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

            उषाताईंनी केवळ हिंदी आणि मराठीच नाहीतर वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या भाषांमधून गाणी गाऊन त्यांनी स्वत:ला तर जोडलेच पण खऱ्या अर्थानं 'भारत जोडोकेला. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीने संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे. त्यांच्या बासरीचे सूर ही केवळ त्यांचीच नाही तर सगळ्या हिंदुस्तानची ओळख आहे. त्यांच्या बासरीत देशाच्या सीमांच्या भिंती तोडण्याची शक्ती असून नित्य नवे शिकण्याचा त्यांचा संकल्प कौतुकास्पद असल्याचेही कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

            महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण हे वेगवेगळ्या कलांना आधार देणारेप्रोत्साहन देणारे तितकेच भक्कम असावे असा सरकारचा प्रयत्न आहे. मान-सन्मान आणि कलावंताच्या मदतीसाठी सदैव सज्ज आणि सतर्क आहोतच मात्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर पडावी. जगाने आपल्या महाराष्ट्राच्या कलावंतावर कौतुककुतूहलाचीआदर-सन्मानाची पखरण करावी यासाठी आम्ही कुठेही मागे राहणार नाहीअशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

संगीत महाविद्यालयातून भारतीयवैश्विक संगीत शिकता येणारजागतिक स्तरावर या महाविद्यालयाची कीर्ती पसरेल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीदिनी आज हे संगीत महाविद्यालय सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. उषाताईंनी आवाज आणि चित्राच्या माध्यमातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले तर पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीने आंतरराष्ट्रीय सीमा पार केल्या. पंडीत नेहरूंप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लता दीदींच्या स्वराची भुरळ पडलीईश्वराचे रूप मानल्या जाणाऱ्या स्वरसूरताल यांचा सुंदर मिलाफ दीदींच्या आवाजात होता असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय महाविद्यालय सुरू होणे गरजेचे होते ते आज सुरू झाले आहे. या महाविद्यालयातून भारतीय आणि वैश्विक संगीत शिकता येणार असून जागतिक स्तरावर या महाविद्यालयाची कीर्ती पसरेलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. महाविद्यालयासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच निधीची कमतरता पडू देणार नाहीअशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

वडिलांच्या आणि दीदींच्या नावाने सर्वोच्च पुरस्कार मिळाले - उषा मंगेशकर

            सत्कार स्वीकारल्यानंतर उषा मंगेशकर म्हणाल्या कीमला आजपर्यंत महाराष्ट्रासह अनेक राज्यांकडून पुरस्कार मिळाले. पण माझ्या वडिलांच्या म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा आणि भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हे दोन सर्वोच्च पुरस्कार आहेतअसे मी मानते. आजपर्यंत ज्यांना दीदींच्या नावे पुरस्कार मिळाला त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

पुरस्काराने मान - सन्मान मिळाला - पंडित हरिप्रसाद चौरसिया

            पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले कीलता दीदी या सुरांची महाराणी होत्या आणि त्यामुळे मी त्यांच्या गायनाचा कालआज आणि उद्याही भक्त राहणार आहे. या पुरस्काराने मला मान- सन्मान मिळाला असून राज्य शासनाचा आभारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

            यावेळी आदिनाथ मंगेशकर म्हणाले कीआज सुरू झालेले महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर व्हावे. येणाऱ्या काळात हे महाविद्यालय संगीताची गंगोत्री बनेल असा विश्वास व्यक्त करून लता दीदी यांच्या जयंतीदिनी हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले.

स्वर-लता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

            या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वर-लता या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक हरिहरनज्येष्ठ सितार वादक निलाद्री कुमार व गायक अभिनेत्री आर्या आंबेकर आणि इतर कलाकार यांनी आपली कला सादर केली.

००००

वर्षा आंधळे/काशीबाई थोरात/विसंअ/28.9.22


Featured post

Lakshvedhi