Wednesday, 8 June 2022

भवताल

 दोन महासागरांच्या महासंगमाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी २७)

बेभान वाऱ्याला अंगावर घेत आणि खडकावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज कानात साठवत आम्ही ‘तो’ सुळका चढून वर पोहोचलो... समोरचे दृश्य रोमांचित करणारे होते. डाव्या हाताला उबदार पण काहीसा शांत असा हिंदी महासागर, तर उजव्या हाताला खवळलेला आणि हुडहुडी भरवणारा अटलांटिक महासागर! बस्स, केवळ मान फिरवायचा अवकाश एकाच वेळी दोन्ही अथांग महासागरांचे विस्तीर्ण रूप डोळ्यांत साठवता येत होते. प्राचीन दीपस्तंभाजवळ लावलेली ‘नवी दिल्ली ९२९६ किलोमीटर’ ही पाटी आपण नेमके कोणत्या ठिकाणी आहोत हे सांगत होती. खाली सर्व बाजूंनी सुळक्याच्या पायथ्याकडे झेपावणाऱ्या लाटा आणि सागराच्या गर्जनेमुळे संमोहित झालो होतो... ठिकाण होते आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक असलेला ‘केप पॉईंट’ अर्थात दोन महासागरांचा महासंगम!

आजच्या जागतिक महासागर दिनानिमित्त (८ जून) महासागरांच्या संगमाची ही गोष्ट!

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/CapePoint-Ocean

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही २७ वी गोष्ट)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी - bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा.)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा

-गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि 8: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक कारवाई करावी, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात करावे, ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी असे, निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

            बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्याबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार महेश शिंदे, गृहविभागाचे प्रधान सचिव(विशेष) संजय सक्सेना, वाहतूकचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव, सुनिता साळुंखे-ठाकरे, परिवहनचे वरिष्ठ उपायुक्त अभय देशपांडे, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

            गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुंबई ते पुणे-कोल्हापूर येथील महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडते. अशा वाहन चालकांमुळे वाहतूक ठप्प होणे, अपघात, वाहतूक ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना होणारा त्रास, विनाकारण प्रवासाला होणारा विलंब आदी समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहनचालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी मोहीम राबवावी. बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची नियुक्ती करावी. यामुळे महामार्गावरील वाहतूकीला शिस्त लागेल.

            उपलब्ध मनुष्यबळातून दैनंदिन नियोजन करावे. राबविलेल्या मोहिमेचा परिणाम दिसावा, यासाठी काटेकोर नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या. या महामार्गावरी पोल 36 ते 45 पर्यंत रात्री होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिव्यांच्या खांबांची तसेच इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महामार्गावर निर्माण होणाऱ्या नैसर्गिक अडचणी सोडवूच, परंतु मानवनिर्मित अडचणींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.


००००

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदनसंधीचे सोने करा, देशाचे भविष्य उज्वल करा.

            मुंबई, दि. ८ : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

            मुख्यमंत्री संदेशात म्हणतात की, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे. काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल. त्यासाठीही शुभेच्छा.

0000

राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

            मुंबई, दि. 8 : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

            राज्यात यंदा 94.22 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण दोन टक्के अधिक आहे. मुली या मुलांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत, ही सुद्धा समाधानाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बारावीनंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारकीर्द ठरवण्याचा, भविष्यातील वाटचाल ठरवण्याचा निर्णय घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.


००००



 सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवलात वाढलाभार्थींची संख्या वाढणार याचा आनंद

-.                                                      धनंजय मुंडे

            मुंबई, दि. 8 : 28 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 4 महामंडळाचे भागभांडवल वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी होत असून, राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.

            या शासन निर्णयानुसार महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल पूर्वी 500 कोटी होते, ते वाढवून एक हजार कोटी करण्यात आले आहे. त्याचबरोबर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे भागभांडवल 73 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल 300 कोटींवरून वाढवून एक हजार कोटी आणि राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटींवरून दहा पटीने वाढवून 500 कोटी करण्यात आले आहे.

            महामंडळाच्या भागभांडवल वाढीसाठी राज्य सरकारने भरभरून निधी दिला असून अतिरिक्त निधी टप्याटप्याने महामंडळांना वितरित करण्यात येईल. या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या गरजू लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यांना थेट लाभ मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचा विशेष आनंद असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले आहेत.

००००


 ज्येष्ठ नेते शरद पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यात युक्रेनच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा


युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्येसामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख.

            मुंबई, दि. 8: रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये अजूनही युध्द सुरु आहे. यादरम्यान युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी गेले आहेत. यातील काही विद्यार्थी परत आले असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यात युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता यांच्यासह युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सध्या राज्यामध्ये २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (३ हजार ६५० जागा), महानगरपालिकेची ५ वैद्यकीय महाविद्यालये (९०० जागा), शासन अनुदानित १ वैद्यकीय महाविद्यालय (१०० जागा), खाजगी विनाअनुदानित १९ वैद्यकीय महाविद्यालये (२ हजार ७७० जागा) आणि १२ अभिमत वैद्यकीय महाविद्यालये (२ हजार २०० जागा) यामध्ये एकूण ९ हजार ६२० इतक्या एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध आहेत. या सर्व महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. चे प्रवेश अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट-युजी प्रवेश परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार करण्यात येतात. नीट-युजीच्या गुणवत्तेच्या अभावी अथवा अन्य कारणास्तव राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी युक्रेनसह रशिया, फिलिपाईन्स किंवा इतर देशात वैद्यकीय प्रवेश घेत असतात.

            सध्या अजूनही रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युध्द सुरु असून ही युध्दाची परिस्थिती किती दिवस राहील हे सांगता येणार नाही. शिवाय युध्दासारखी परिस्थिती आल्यामुळे आता भारतासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे बहुतांश पालक आपल्या मुलांना पुन्हा तेथे पाठविण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेता येण्यासाठी केंद्र शासनाचे परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य विभाग याबरोबरच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण विभागमार्फत या तिन्ही ठिकाणी पाठपुरावा करुन या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी परवानगी मागण्यात येईल, असे मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.

            भारतामध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहीत केलेला वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम तसेच युक्रेन या देशातील विद्यापीठांमार्फत शिकविण्यात येणारा अभ्यासक्रम यामध्ये समानता नाही. वैद्यकीय शिक्षण पाठ्यक्रम, शैक्षणिक कालावधी, सत्र निहाय विषय व प्रात्यक्षिक यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे युक्रेन येथून एमबीबीएस अभ्यासक्रम शिक्षणाकरिता गेलेल्या व राज्यात परत येत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांबाबत केंद्र शासनामार्फत ठरविण्यात येणाऱ्या धोरणानुसार योग्य तो निर्णय घेणे योग्य राहील. 15 मे 2022 पर्यंत युक्रेन मधून महाराष्ट्रात परतलेल्या 532 विद्यार्थ्यांची माहिती, वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत संकलित करण्यात आली आहे. तसेच युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांची निवेदने, अडचणी जाणून घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक अजय चंदनवाले हे नोडल अधिकारी असतील, असेही मंत्री श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

            ज्येष्ठ नेते खासदार श्री.पवार म्हणाले, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम करता येईल. तसेच या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांचे ग्रंथालयही वापरता येईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांना दुरस्थ शिक्षण (Foster Education) सुविधा देण्याची तयारी वैद्यकीय शिक्षण विभागाने ठेवली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी दुरस्थ शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, अशा सूचना यावेळी श्री. पवार यांनी दिल्या.

००००



 खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती                        सचिवस्तरावर समिती स्थापन करावी

                                                         - उपमुख्यमंत्री


          मुंबई, दि. 8 : राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कारार्थींना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात अभ्यास करुन धोरण ठरविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

          मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम क्रीडा पुरस्काराच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्तीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची उपस्थिती होती.

          उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशातील इतर विविध राज्यातील खेळाडूंच्या थेट नियुक्तीबाबत असलेल्या धोरणांचा अभ्यास करुन क्रीडा विभाग, गृह विभाग, वन विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग अशा विविध विभागात खेळाडूंची थेट नियुक्ती करण्याकरीता धोरण ठरविण्यात यावे. तसेच आपल्या राज्यातील प्रमुख खेळांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. तसेच मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम क्रीडा पुरस्कारांच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात धोरणात विचार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले की, खेळाडूंच्या शासकीय सेवेत थेट नियुक्ती करताना क्रीडा विभागात सुरुवातीला पाच वर्ष काम करण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरुन राज्यातील खेळाडूंना त्यांच्या अनुभवाचे मार्गदर्शन मिळेल. छत्रपती पुरस्कार विजेत्यांची संख्या आणि रिक्त पदांचा धोरणामध्ये विचार करण्यात यावा. समितीने अहवाल याच महिन्यात द्यावा, असे त्यांनी यावेळी सुचविले.

          क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, खेळाडूंना नियुक्ती देताना खेळाडूंचे शिक्षण आणि पद याबाबत विचार करावा. थेट नियुक्त खेळाडूंसाठी सेवाविषयक नियमही पाहण्यात यावे.

          मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव म्हणाले की, नियुक्त समिती खेळाडूंच्या शासकीय थेट नियुक्तीबाबत अभ्यास करुन या महिन्याच्या शेवटी अहवाल सादर करेल. 

 स्त्रियांच्या सुंदरछटा..😊🥰


डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो. 

तिथे एकाच ठिकाणी 

"दूध,दही,ताक,लोणी,तूप"

बघून वाटलं की अरेच्या,ह्या तर सर्वच 👩स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..! 


पाहूया कसे ते..?


"दूध" 

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:

कुमारिका . 

दूध म्हणजे माहेर . 

दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .

शुभ्र, 

सकस, 

निर्भेळ,

स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं. 

त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.


"दही"


कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू होते . 

दुधाचं नाव बदलून दही होतं! 

दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं!

लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते. 

दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. "कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, 

मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी" स्त्री त्याच्याप्रती एवढी निष्ठा का दाखवते ? 

नवरा हा "पती परमेश्वर" म्हणून ? नव्हे 

तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.


"ताक" 


सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते,म्हणजे "ताक" होतं.


"दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी."

'बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा खवळलेला नवरा असो (पित्त प्रकृती)'


ताक दोघांनाही शांत करतं यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.


"ताक" म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच!


'दूध' पाणी घालून बेचव होतं पण 'ताक' मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नावर कामी येतं .


"लोणी" 


अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं.मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं तेव्हा, 

मऊ,

रेशमी, 

मुलायम,

नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो . 

हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं.रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण कण 'लोणी' होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही . 

तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.

'ताकाला' पुन्हा 'दूध' व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?


"तूप"


लोणी' ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही. 

ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,

नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं "साजूक तूप होतं"


वरणभात असो 

शिरा असो 

किंवा 

बेसन लाडू असो

घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर साजूक तूप पडतं आणि जादू घडते.


🌹 देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.


🌹 घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे 'तूप' संपून जातं.हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.


"दूध ते तूप" 

हा असा अनोखा 👩स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. 


"👩स्री आहे तर 👴श्री आहे हे म्हटलं वावगं ठरूं नये."


"असा हा👱🏻‍♀️स्री चा संपूर्ण प्रवास न थांबणारा,सतत धावणारा,न कावणारा,न घाबरणारा,कुटूंबासाठी झिजणारा,कुटूंबाची काळजी घेणारा" ह्या प्रवासास तथा 

        "👩 स्त्री 👩"

 जातीस मानाचा मुजरा.ll. 

          🙏🌹🙏

Featured post

Lakshvedhi