Saturday, 21 May 2022

 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित

            पुणे, दि. 19 : राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचे https://scea.maharashtra.gov.in/ संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे. संकेतस्थळाला नागरिकांसह सहकारी संस्थांचा चांगला प्रतिसाद असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य चे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.

            राज्यातील निवडणूकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (२५० सभासद व त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून), तसेच, निवडणूकीस पात्र असलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणूक कामकाजाचे सनियंत्रण या प्राधिकरणामार्फत करण्यात येते.

कामकाजात यापुढील काळात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सहकारी संस्था आणि कृषि उत्पन्न बाजार समित्या यांच्या सभासद, निवडणूक कामकाजाच्या विविध टप्प्यांची माहिती दर्शकांना सुलभरितीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

            सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाशी निगडित असलेले सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, साखर आयुक्त, पणन संचालक, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्त, उद्यम विकास आयुक्त, मत्स्यव्यवसाय आयुक्त, गृहनिर्माण विभाग या संकेतस्थळाची माहिती (लिंक) देण्यात आली आहे.


            राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची संरचना, सहकारी संस्था व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांची कार्यपद्धती, त्या संबंधित अद्ययावत कायदे व नियम, सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांची हस्त-पुस्तिका, राज्यातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तसेच तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांची संपर्क यादी, प्रत्येक जिल्ह्याच्या नामिकेतील क तसेच ड वर्गातील सहकारी संस्थांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी, नागरिकांची सनद, माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत स्वयं-प्रकटन, वारंवार विचारले जाऊ शकणारे प्रश्न, महत्वाचे नमूने , सांख्यिकी माहिती इत्यादी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे सहकार, कृषी, पणन क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.

            राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव (सहकार) अनुप कुमार, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका जयश्री भोज यांच्या मार्गदर्शनाखाली संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. येत्या काळात संकेतस्थळावरील सुविधा अधिक विस्तारित करण्याचा मानस असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दिली आहे.


००००



: *देण्याची सवय लावून घेतली की, येणं आपोआप सुरू होत......*

*मग तो 'मान' असो, 'प्रेम' असो वा 'वेळ' असो.......!!*

🌞 *सकाळ* म्हणजे नविन दिवस,

नविन सुरुवात

काल जे घडले ते विसरून

पुन्हा नव्या ने आयुष्य सुरु करा.

     *आयुष्य* सुंदर आहे

त्याला आणखी सुंदर बनवायचा

प्रयत्न करा. 

*आज उद्या करता करता*

*आयुष्य संपून जातं,*

*मनासारखं जगायचं तेवढं*

*मात्र राहून जात...*


  


 – दादाजी भुसे


            खरीप हंगाम 2022 मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे 151.33 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. खरीप हंगामात खोडमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहीत धरून तिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पुरेसा पाऊस होणार आहे. परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये, असे आवाहनही कृषीमंत्र्यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.


            शेतमाल निर्यातीसाठी असलेल्या मालाच्या दर्जा तपासणी (ट्रेसिबिलीटी) नोंदणीच्या प्रणालीमध्ये देशातील 72,280 शेतकऱ्यांपैकी महाराष्ट्रातील 62,344 शेतकरी आहेत. भारतातील 129 भौगोलिक मानांकनापैकी महाराष्ट्रातील 26 आहेत. देशात भौगोलिक मानांकन नोंदणीकृत शेतकरी 5,260 आहेत. त्यापैकी 4390 शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी, कांदा, मिरची या पिकांच्या निर्यातीत आघाडीवर आहे. देशाच्या एकूण निर्यातीच्या 65 टक्के फळे, 55 टक्के भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो. देशात सर्वाधिक 4500 शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेत (पीएमएफएमई) महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. ही आपल्या महाराष्ट्राची बलस्थाने आहेत.


-----०००-----



 



 


यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने

नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

            मुंबई, दि. 19 : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. तसेच शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणारे, शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            ‘राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक 2022’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, कृषी विद्यापाठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या पोषणावर विशेष लक्ष देणार

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, ज्या राज्यात शेतकरी सुखी, ते राज्य सुखी. शेतकरी बांधव कष्ट करत असताना स्वत:च्या, कुटुंबाच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण राज्य शासन आता शेतकरी बांधवांना मोफत देणार आहे. शेतकरी बांधव आपल्या कुटुंबातले घटक आहेत. त्यामुळे यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले पाहिजे. रोग, कीडींचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. शेतमालाला हमी भाव आहे, पण हमखास भाव मिळाला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

            शेतकरी बांधवांसमोर पीक विम्याचा प्रश्न आहे. पीक विमा समाधानकारक नाही. केंद्राकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाचे खरीप हंगामाचे नियोजन समाधानकारक आहे. त्यामुळे आपणा सर्वांच्या प्रयत्नाने, सहकार्याने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

कृषी विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार – अजित पवार

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील शेतकरी बांधवांना खते, बियाणे वेळेत मिळाली पाहिजेत. खते कमी दरात वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने केंद्र सरकारच्या संपर्कात रहावे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करावे. कृषी विभाग योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो, ही बाब समाधानाची आहे. या विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करू देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्याच्या विकासात कृषी विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. फलोत्पादनात आपल्या राज्याने मोठं काम केले आहे. राज्याच्या दृष्टीने येणारे चार महिने महत्वाचे आहेत. खरीप हंगामात येणाऱ्या समस्यांवर मात करत हा खरीप हंगाम यशस्वी करायचा आहे.


           कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, राज्यातील शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित बियांणांचा पुरवठा करण्याबरोबर कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घेतली आहे. सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने पेरा वाढण्याची शक्यता असून त्यासाठी बियाणांची उपलब्धता वाढविण्याचे नियोजन केले आहे. राज्यामध्ये खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठीचा महत्वाचा घटक आहे.



कलिगड

 


भारतीय कला संस्कृती

 काही दुर्लक्षित चमत्कार...


भारतीयांनी, कृपया जाणून घ्या:-


*श्री रॉबर्ट विल्यम इरोपियन प्रवासी लिहीतात*

कृपया वाचा ...

*अंगकोर वटचे विष्णू मंदिर* व्हॅटिकन सिटीच्या 4 पट आहे !!

मंदिर पूर्ण बघायला आठवडा लागतो!!

*ते जगातील 7 आश्चर्यांपैकी एक का नाही?*

एलोराचे *कैलाशनाथ मंदिर* आणि तिथली इतर मंदिरे शतकानुशतके अवाढव्य दगडात कोरलेली आहेत !!

*ते जगातील 7 आश्चर्यांपैकी एक का नाही?*

कुंभकोणम येथील *ऐरावतेश्वर मंदिर* मध्ये मंदिराच्या प्रत्येक इंचावर कोरीवकाम आहे !!

*ते जगातील 7 आश्चर्यांपैकी एक का नाही?*

तंजावरमधील *बृहदेश्वर मंदिर* मध्ये 120 टन वजनाचे गोपुरम 60 किमीच्या उतारावर आहे !! मंदिर किचकट कोरीव कामांनी भरलेले आहे !!

*जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?*

कोणार्कचे *सूर्यमंदिर* 24 क्लिष्ट डिझाइन केलेली चाके, 12 फूट व्यासाची जी घोडे काढलेली दिसतात. हे सात घोडे आठवड्याचे प्रतिनिधित्व करतात, चाके 12 महिने उभी असतात तर दिवसाचे चक्र चाकांमधील आठ स्पोकद्वारे दर्शवले जाते. आणि हे संपूर्ण चित्रण सांगते की वेळ सूर्याद्वारे कशी नियंत्रित केली जाते !!

*जगातील 7 आश्चर्यांपैकी एक का नाही?*

*राणी का वाव* हे त्याच्या प्रकारातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठे उदाहरण आहे आणि पाण्याचे पावित्र्य अधोरेखित करणारे उलटे मंदिर म्हणून डिझाइन केलेले आहे, पायरी विहीर शिल्पकलेच्या फलकांसह पायऱ्यांच्या सात स्तरांमध्ये विभागलेली आहे; भगवान विष्णूची 500 हून अधिक प्रमुख शिल्पे आणि 1000 हून अधिक किरकोळ शिल्पे धार्मिक आणि पौराणिक प्रतिमा एकत्र करतात !!

*जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?*

फक्त *हंपीच्या अवशेषांमध्ये* टेकड्या आणि दऱ्यांमध्ये पसरलेली ५०० हून अधिक स्मारके आहेत. यामध्ये आकर्षक मंदिरे, राजवाड्यांचे अवशेष, राजेशाही मंडप, बुरुज, ऐतिहासिक खजिना, जलीय संरचनांचे पुरातत्व अवशेष आणि प्राचीन बाजारपेठांचा समावेश आहे.

*जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?*

*मोढेरा सूर्य मंदिर* हे एक उत्कृष्ट कोरीवकाम केलेले मंदिर परिसर आहे आणि भव्य शिल्प कुंड हे सोलंकी काळातील गवंडी कलेतील दागिने आहेत ज्याला गुजरातचा सुवर्णयुग म्हणूनही ओळखले जात होते. मंदिराचे डिझाइन घटक वास्तू - शिल्पाच्या तत्त्वांचे पालन करतात. कुंड (जलाशय) आणि प्रवेशद्वार पूर्वेकडे सूर्याच्या किरणांचे स्वागत करत आहे आणि संपूर्ण रचना सूर्यदेवाला अभिषेक म्हणून फुलांच्या कमळासारखी दिसणारी मंडपावर तरंगते. मुख्य संकुल तीन भागात विभागले गेले आहे, प्रवेशद्वार म्हणजे ‘सभा मंडप’, ‘अंतरा’ला जोडणारा रस्ता आणि ‘गरबागृह’, गर्भगृह.

*जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?*

*पट्टडकल* हे केवळ चालुक्यकालीन वास्तुशिल्पीय कार्यांसाठीच लोकप्रिय नव्हते तर 'पट्टदाकीसुवोलाल' या शाही राज्याभिषेकासाठी एक पवित्र स्थान देखील होते. येथील मंदिरे रेखा, नगारा, प्रसाद आणि द्रविड विमान शैलीचे मंदिर वास्तुकलेचे परिपूर्ण मिश्रण आहेत. पट्टाडकल येथील सर्वात जुने मंदिर हे विजयादित्य सत्याश्रयाने बांधलेले संगमेश्वर आहे (इ.स. ६९७-७३३).

*जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही?*

*रत्नेश्वर मंदिर,* वाराणसीच्या मणिकर्णिका घाटाजवळ वसलेले, सुमारे 9 अंशांनी झुकते तर पिसाचा झुकणारा टॉवर सुमारे 4 अंशांनी झुकतो. काही अहवालांनुसार, मंदिराची उंची 74 मीटर आहे, जी पिसा टॉवरपेक्षा सुमारे 20 मीटर उंच आहे. ऐतिहासिक रत्नेश्वर मंदिर शतकानुशतके जुने आहे आणि वाराणसीमधील सर्वात छायाचित्रित मंदिरांपैकी एक आहे.

*मग हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक का नाही?*

*उत्तर: *कारण आपल्याला कळण्याचीही पर्वा नसते!!*

इतरांना * *त्यांच्या स्थापत्यकलेचा चमत्कार दाखवण्यात विशेष अभिमान वाटतो;* *तर हे* *चमत्कार अस्तित्वात आहेत हे देखील आम्हाला माहीत नाही.*

भारताचा भव्य इतिहास आणि वारसा जाणून घ्या


🙏🌸🇮🇳

 कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात प्रथम अवयवदान


ॲड. रिना बनसोडे यांनी जगाचा निरोप घेताना अवयवदानाचा दिला आदर्श.

            मुंबई, दि. 19 :- कोविड-१९ नंतर मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील प्रथम अवयवदान जे.जे. रूग्णालयात काल करण्यात आले असून समाजसेविका ॲड. रिना बनसोडे यांनी अवयवदान करून जगाचा निरोप घेतला आणि समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे, ॲड. बनसोडे यांच्या अवयवदानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

            मुंबईच्या अॅडव्होकेट रिना बनसोडे (वय ४३ वर्षे) यांनाजे. जे. रुग्णालयात १५ मे पासून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मेंदू सर्जरी विभागप्रमुख डॉ.वर्णन वेलहो यांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत होते. काल १८ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान डॉक्टरांनी श्रीमती बनसोडे यांना ब्रेन डेड घोषित केले होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना समाजसेवा विभागामार्फत संपूर्ण माहिती देऊन अवयवदानाबद्दल अवगत करण्यात आले. अवयवदानासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी सकारात्मकता दर्शविल्यानंतर अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या टिमने अवयवदानाची प्रक्रिया लगेचच सुरु केली. रुग्णाच्या किडनी, कॉर्निया, हृदय तसेच छोटे आतडे यांचे दान झाले. मुंबईमधील जे. जे. हॉस्पीटल, ग्लोबल हॉस्पीटल, कोकीलाबेन हॉस्पीटल, नानावटी हॉस्पीटल येथील गरजु रुग्णांना नियमानुसार हे अवयव देण्यात आले. विशेष म्हणजे मुंबईतील हे पहिलेच यशस्वीरित्या झालेले छोट्या आतड्याचे अवयव दान आहे. ज्या रुग्णालयात अवयवदान झालेले छोटे आतडे दिले त्या हॉस्पीटलमधील गरजू रुग्णाला छोटया आतड्याची अत्यंत आवश्यकता होती आणि हे छोटे आतडे लगेचच मिळाल्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्या रुग्णास लाभ झाला असे सूत्रांनी सांगितले. झेडटीसीसीच्या नियम आणि मार्गदर्शक सुचनेनुसार कोवीड-१९ नंतर मुंबईमधील सार्वजनिक रुग्णालयामध्ये झालेले हे पहिलेच अवयवदान आहे. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या मृत्युनंतरही आपण इतरांचे जीवन वाचवू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण समाजसेविका असलेल्या अॅड. रिना बनसोडे यांनी जगाचा निरोप घेताना समाजासमोर ठेवून गेल्या. त्यांच्या नातेवाईकांनीही या अवयवदानात मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

००००

Featured post

Lakshvedhi