Monday, 2 May 2022

 बर्‍याच वर्षापूर्वी ज्योतिषाने माझी पत्रिका पाहून माझे भविष्य सांगीतले होते की तुझ्या आयुष्यात एक वेळ अशी येईल तुला एवढ काही मिळत जाईल, ते कुठे ठेवू असा तुला प्रश्न पडेल ,आणि मग तू याला पाठवं, त्याला पाठवं करीत वाटत सुटशील,जेवढे तू वाटशील त्याहून जास्त तुझ्याकडे परत येईल.तू कितीही वाटलं तरी ते संपणार नाही. 

 हे भविष्य ऐकून मला आनंद झाला.....

अनेक वर्षें गेली आणि मग मला नंतर समजलं ज्योतिषी *वाॅट्स अप* बद्दल बोलत होता.

🥱🤪😝😭😭😷

 संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या नूतनीकरण कामाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मुंबई, दि. १- संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. आज पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख आदी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर (पश्चिम) येथे २०१० मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला ३० एप्रिल २०२२ रोजी एक तप पूर्ण झाले आहे. २८०० चौरस फूट क्षेत्रफळावरील हे विस्तीर्ण तीन मजली दालन म्हणजे संग्रहालय व कलादालन यांचा संगम आहे. येथे इतिहासावर आधारित फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी यावेळी मान्यवरांना दालनातील प्रदर्शनाच्या कामाबाबत माहिती दिली.                                                                      

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त

विधान भवन येथे ध्वजारोहण

'रशियन हाऊस इन मुंबई' च्या संचालिका विशेष निमंत्रित.

            मुंबई, दि १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या समारंभास 'रशियन हाऊस इन मुंबई' या रशियन विज्ञान आणि सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका डॉ.एलिना रेमिझोव्हा आणि रशियन भाषा विभागाच्या प्रमुख श्रीमती विद्या स्वर्गे-मदाने विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या.

            यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पारंपरिक मराठमोळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. विधान भवनाचा आसमंत सनई-चौघडा व तुतारीच्या निनादाने मांगल्य आणि उत्साहाने बहरून गेला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस सभापती, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अभिवादन केले.

            महाराष्ट्र हे देशपातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे असे आवाहन करून त्यांनी राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव (समिती) तथा वि.का.अ. अनिल महाजन, उप सचिव शिवदर्शन साठे,राजेश तारवी,सभापतींचे सचिव श्री.महेंद्र काज, अवर सचिव वि.श.कोमटवार,रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे,मंगेश पिसाळ, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य सुरक्षा अधिकारी, प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. या प्रसंगी विधानमंडळ सुरक्षा सेवेत उल्लेखनीय योगदान दिलेल्या सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा सहाय्यक यांना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच राष्ट्रपती यांचे गुणवत्ता पदक प्राप्त झालेल्या उप मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्रशेखर गोविंद सावंत यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

'रशियन हाऊस इन मुंबई'च्या संचालिका यांची विधान भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट.

            या समारंभानंतर डॉ.एलिना रेमिझोव्हा यांनी सभापती आणि उपसभापती यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतांना त्यांनी मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या प्रमुख दोन शहरांमध्ये झालेल्या सिस्टर सिटी कराराला या वर्षीं ५५ वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगून त्यानिमित्त आजपर्यंतच्या वाटचालीला उजाळा दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या संदेशात सभापती महोदयांनी भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबंधाच्या गौरवशाली परंपरेचा आवर्जून उल्लेख केला, त्याबद्दल त्यांनी या भेटीप्रसंगी अतिशय आनंद व्यक्त करीत 'रशियन हाऊस इन मुंबई' तर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली आणि या केंद्राला भेट द्यावी, असे निमंत्रण दिले. उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या रशिया भेटीतील अनुभवांना यावेळी उजाळा देत मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग शहरांना लाभलेला समृध्द सांस्कृतीक वारसा, अनुभव, पर्यावरण संवर्धन आणि साहित्य अनुवाद याबाबत आणखी आदानप्रदान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पाहूण्यांना गौरवचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

000000



 


                                                                            

 राज्यपालांचे संगीत कला अकादमीला २५ हजार रुपयांचे बक्षीस.

मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमाला उपस्थित राहून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ऐकला.

यावेळी महाराष्ट्र गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीला 25 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.

यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख, माजी मंत्री दिवाकर रावते, आमदार सदानंद सरवणकर, आमदार सुनील शिंदे, आयुक्त इकबाल सिंह चहल, माजी महापौर महादेव देवळे, श्रद्धा जाधव, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.



 


 दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सदनात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा.

नवी दिल्ली,१: महाराष्ट्र राज्याच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त आज महाराष्ट्र सदनात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भुपाळी, वासुदेव नृत्य, जात्यावरील ओवी, भारूड, गौवळण, लावणी, कोळीनृत्य आदि समृध्द लोककलांच्या दमदार सादरीकरणाने राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.

      कस्तुरबागांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेटहॉल मध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निरुपमा डांगे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार उपस्थित होते.

     महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्ताने आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही महाराष्ट्र दिनाच्या औचीत्याने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारस्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने कोल्हापूर येथील श्रीजा लोककला संस्थेच्या कलाकारांच्या चमुने यावेळी दमदार सादरीकरण केले.

महाराष्ट्राच्या लोककलांचे दमदार सादरीकरण

            भुपाळीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पहाटे घरा-घरांमध्ये जात्यांवर दळण दळतांना गायिल्या जाणाऱ्या ओवींचे सादरीकरण झाले. मंगळागौरी सणाची झलकच यावेळी रंगमंचावर बघायला मिळाली. यावेळी मंगळागौरीचे विविध गाणे गात त्यावर कलाकारांनी ठेका धरला. नारळी पोर्णिमेचा सण व कोळी बांधवांचा उत्साह दर्शविणारे कोळीगीतांचे सादरीकरणही झाले. वारकरी संताचे प्रसिध्द भारूडही यावेळी सादर झाले. 

            लावणी, गौवळण, शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.

        राज्यातील आदिवासी जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, वाघ्या-मुरळी आदींनी रसिकांच्या टाळया मिळविल्या. विविध लोककला व लोकनृत्यांच्या आविष्काराने सजलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे प्रति‍बिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.               

00                                                              

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे अभिवादन.

मुंबई, दि.१: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

            यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, परिवहन मंत्री अॅड अनिल परब, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, अभिनेते आदेश बांदेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

            छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याची कायमस्वरूपी प्रतिकृतीचे उदघाटन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागे ही कायमस्वरूपी गड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे याच प्रतिकृतीच्या मागे मुंबा आईची प्रतिकृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आल्यानंतर प्रवाशांना मुंबा आईचे दर्शन होणार आहे.


000000


 


                                                                           वृत्त 

प्रभात

 ..... *🙏🏻⛳निति हीच संपत्ती⛳🙏🏻* .....

*समाधानाने तोच हसु शकतो जो दुसऱ्याचे कधीच वाईट करत नाही आणि चिंततही नाही...!*

*आणि तोच चांगले झोपू शकतो जो ईतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो...!!*

*त्यासाठीच चांगले विचार हे सर्वात स्वस्त व मोफत औषध आहे...!!!*

*🙏🌺 निर्मल सुप्रभात🌺🙏🏻

 महाविकास आघाडी सरकारच्या भरीव कामगिरीचे प्रदर्शनात पुरेपूर प्रतिबिंब.

                                                  - डॉ. नितीन राऊत

· सीताबर्डी मेट्रो जंक्शनवर शासनाचा विकास संवाद बहरला

· माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

      नागपूर, दि. 01: गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने कोरोनासह विविध नैसर्गिक आपत्तींचा समर्थपणे सामना करत राज्याच्या विकासाचे चक्र अव्याहतपणे सुरु ठेवले आहे. विविध आघाड्यांवर सरकारने दमदार कामगिरी केली असून विविध समाजघटकांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या विकासपर्वाचे पुरेपूर प्रतिबिंब या चित्रमय प्रदर्शनात उमटले असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले. 

राज्यातील विद्यमान सरकारच्या दोन वर्षातील विकास योजनांवर आधारित ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ हे चित्र प्रदर्शन माहिती व जनसंपर्क विभागातर्फे आयोजित करण्यात आले आहे. सीताबर्डी मेट्रो जंक्शन येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अँड. अभिजीत वंजारी, विभागीय‌ आयुक्त डॉ. माधवी खोडे- चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, माहिती संचालक हेमराज बागुल, स्मार्ट सिटीचे प्रकल्प संचालक चिन्मय गोतमारे, मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाविकास आघाडी शासनाने कोविड काळातही समर्थपणे संकटांना तोंड दिले. सर्व समाजघटकांना दिलासा देण्याचा निष्ठेने प्रयत्न केला. राज्य शासनाने दोन वर्षात विकासकामांना गती दिली. त्याचे प्रतिबिंब या प्रदर्शनात दिसून येते. प्रदर्शनाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या विविध योजना, विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहे. या मेट्रो स्टेशन परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली धर्मांतरासाठी चळवळ सुरु झाली. तसेच विविध विद्यार्थी चळवळींचा हा परिसर साक्षीदार आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक स्थळावरून जनतेमध्ये जागरुकता निर्माण होणार आहे, असे मंत्री डॉ. राऊत यावेळी म्हणाले.

        शहरातील सर्व मेट्रो स्टेशनला इव्ही स्टेशन (ईलेक्ट्रीकल व्हेईकल चार्जींग)ची सुविधा उपलब्ध करण्यास यापूर्वीच मान्यता दिली आहे. कस्तुरचंद पार्क येथे ‘अँडव्हॉटेज विदर्भ'चे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये ईलेक्ट्रॉनिक दुचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश राहणार असून पर्यावरणस्नेही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनामधून मिळेल, अशीही माहिती डॉ. राऊत यांनी यावेळी दिली. 

 प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका माहिती संचालक हेमराज बागुल यांनी प्रास्ताविकामधून विशद केली. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने लोककल्याणकारी दृष्टिकोनातून सुरु केलेली विकासयात्रा लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर शहरातील मेट्रो संस्कृतीचे प्रतिक असलेल्या या जंक्शनमध्ये हे प्रदर्शन जाणिवपूर्वक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी तर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी आभार मानले. या चित्रमय प्रदर्शनाला मेट्रो प्रवाशांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

        राज्यस्तरावरील तसेच नागपूर विभागात जिल्हास्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या यशस्वीतेचा या प्रदर्शनात चित्रमय आढावा घेण्यात आला आहे. त्यासोबतच नागपूर मेट्रोच्या विकास कामांची माहिती या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. आजपासून सुरु झालेले हे प्रदर्शन दि. 5 मे पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क खुले राहणार आहे.

Featured post

Lakshvedhi