Wednesday, 29 September 2021

 मेंढरांना त्यांच्या एका नेत्याने सांगितलें की यंदा थंडी पासून रक्षण करण्यासाठी, प्रत्येक मेंढीला एक लोकरीची शाल भेट दिली जाईल. (Free)


मेंढर लैच खुश झाली, आसमंतात बँबँबँबँ शिवाय दुसरा आवाज

ऐकायला मिळेना.


इतक्यात एका कोकराने आईला हळूच विचारले की हा नेता लोकरीच्या शाली साठी लोकर कुठून मिळवेल  .... ??


आणि कळपात अचानक भयाण शांतता पसरली..... !!!


राजकीय नेते सभेत कर्जमाफी, फ्री गहू, तांदूळ, साखर, मोबाइल फोन, साईकल, लेपटॉप,  वीज अशा घोषणा करतात तेंव्हा लोक खुश का हातात ? 


ते विकत घ्यायला, सरकार पैसे कुठून  आणणार हा प्रश्न माणसांना का पडत नाही ?????

🤔


जाऊ दे.... 

माणसाचाही नाईलाज आहे. ....

 

माणूस माकडा पासून बनला आहे .... 


मेंढ्यां पासून नाही

🙏🏻

 [9/29, 7:04 PM] Mahiti Mohite: वृत्त क्रमांक:-992                                                        दिनांक:- 29 सप्टेंबर 2021


*नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली जे.एन.पी.टी.- सिडको परिसराची पाहणी*


*बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी व पार्किंग प्रश्नाबाबतच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात संबधित विभागाला दिले आदेश*


अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):-बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर वाहनांची होणारी वाहतूक कोंडी व पार्किंग प्रश्न यावर लवकरात लवकर उपाययोजना करून याबाबतच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात संबधित विभागाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे निर्देश दिले.

       नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज बुधवार, दि.29 सप्टेंबर 2021 रोजी शिवस्मारक, जे.एन.पी.टी., उरण येथील दास्तान फाटा, द्रोणागिरी सीएफएस येथील पार्किंगच्या जागेची पाहणी केली.  त्यावेळी त्यांनी संबंधित विभागाला ठाणे-बेलापूर रस्त्यावरील सिडको व जे.एन.पी.टी. कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी तसेच पार्किंग प्रश्न यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत आवश्यक ते निर्देश दिले. 

       यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सिडको, जेएनपीटी आणि वाहतूक पोलीस यांच्या मदतीने नियोजन करणे आवश्यक आहे. याकरिता टप्य्याटप्प्याने वाहने सोडण्यात येणार असून सीएफएस आणि तालुक्याबाहेर जाणाऱ्या वाहनांना कलर कोड स्टिकर देण्यात येतील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास भेडसावत आहे. मात्र वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी समन्वय पथक तयार करण्यात आले आहे.  त्याचबरोबर जेएनपीटी आणि दास्तान येथील पार्किंगच्या जागेमध्ये वाहनांची नियोजनबध्द पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल.

      यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, विश्वस्त जे.एन.पी.टी. श्री.दिनेश पाटील, श्री.नरेश रहाळकर, श्री.संतोष ठाकूर, श्री.महादेव घरत, श्री.सदानंदराव भोसले, श्री.बी.एन.डाकी, श्री.गणेश शिंदे, श्री.विनोद म्हात्रे, प्रदीप ठाकूर, के.एम. घरत, अमित भगत, संदेश पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य दिपक ठाकूर, पं.स.सदस्य हिराजी घरत, श्री.नितेश पाटील,  श्री.हितेश पाटील, रमेश म्हात्रे, सौ. ममता पाटील, सौ.ज्योती म्हात्रे, सौ.भावना म्हात्रे, सुजाता गायकवाड, तसेच तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, सिडकोचे अधिकारी, जे.एन.पी.टी. चे अधिकारी, पोलीस अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


000000

[9/29, 7:04 PM] Mahiti Mohite: वृत्त क्रमांक:-991                                                                      दिनांक:- 29 सप्टेंबर 2021


*रायगड जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*


अलिबाग,जि.रायगड,दि. 29 (जिमाका):- शिक्षा मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय, ता. माणगाव, जि.रायगड या विद्यालयात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

        यावर्षी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समितीद्वारा प्राप्त झाली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती https://cbseitms.nic.in/registrationClass6/registrationClass6 व http://www.navodaya.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

       प्रवेश अर्ज निःशुल्क ऑनलाईन भरण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालकांनी नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेऊन इंटरनेटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. हा अर्ज भरत असताना पालकांची सही विद्यार्थ्यांची सही, फोटो आवश्यक आहे.

    सहावीसाठी निवड चाचणी प्रवेश परीक्षेस बसणारा विद्यार्थी सलग तिसरी व चौथी पास असावा. पाचवीत संपूर्ण वर्ष रायगड जिल्हयात शिकणारा असावा. त्याचा जन्म 1 मे 2009 ते 30 एप्रिल 2013 (दोन्ही दिवस पकडून) पर्यंतच असावा. 

      ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख दिनांक 30 नोव्हेंबर 2021 असून त्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत.

      ही परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. 

       अधिक माहितीसाठी (संतोष चिंचकर 9881351601) (कैलाश वाघ 9527256185) व (अण्णासाहेब पाटील 9960582046) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य श्री. किरण इंगळे यांनी केले आहे.

00000000

[9/29, 7:05 PM] Mahiti Mohite: वृत्त क्रमांक:- 989                                                              दिनांक:- 29 सप्टेंबर 2021


*राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती प्रजातींबाबत जनजागृतीपर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न*


अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका):- राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती लागवड साहित्य निर्मिती (औषधी वनस्पती रोपवाटिका), औषधी वनस्पती लागवड काढणोत्तोर व्यवस्थापन प्रक्रिया व मूल्यवर्धन इ. घटकांसाठी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तथापि अशा शेतकऱ्यांना या घटकांचा लाभ घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व्हावे, यासाठी एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक आत्मा श्रीम.उज्ज्वला बाणखेले यांनी दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत आयोजित केली होती. 

या कार्यशाळेच्या माध्यमातून औषधी वनस्पती लागवड साहित्याची निर्मिती कशी करावी, औषधी वनस्पतींचे फायदे व कोणत्या वातावरणात या वनस्पती लागवड केल्यानंतर आपणास त्यापासून भरघोस उत्पन्न मिळू शकते,याबाबतचे मार्गदर्शन डॉ. दिगंबर मोकाट, प्रमुख शास्त्रज्ञ, विभागीय औषधी वनस्पती प्रोत्साहन केंद्र, पुणे विदयापीठ, पुणे यांनी केले आणि इतर काही महत्वाच्या मुद्यांवर प्रशिक्षणही दिले. तसेच औषधी वनस्पतींची लागवड, काढणी पश्चात व्यवस्थापन व प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबत मिळणाऱ्या सबसिडी योजनेबाबत श्री.ए.आर. सासिवेकर, अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ पुणे यांनी अत्यंत महत्वपूर्ण माहिती या कार्यशाळेत दिली. त्याचप्रमाणे औषधी वनस्पती लागवड केल्यानंतर पणन (Marketing) सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील व शेतकऱ्याच्या यासंदर्भातील अडचणी याबाबत श्री. प्रशांत नायर, दातार अँड सन्स, पनवेल यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. 

      राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती प्रजातींच्या लागवडीकरीता अनुकूल वैविध्यपूर्ण हवामान, मानवी आरोग्याकरिता औषधी वनस्पतीचे महत्त्व, वाजवी उत्पन्न देणाऱ्या औषधी वनस्पतींची नगदी पिके, औषधी वनस्पती क्षेत्रात स्वयंरोजगार निर्मिती इत्यादी बाबींच्या अनुषंगाने औषधी वनस्पती क्षेत्र विकासास भरपूर वाव आहे. तथापि याचा विचार करता जिल्हयातील औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्याचे नियोजन राष्ट्रीय आयुष अभियान औषधी वनस्पती योजनेंतर्गत करण्यात येत आहे. 

    या कार्यक्रमास 50 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सन 2021-22 करिता रायगड जिल्ह्यात 45.90 हेक्टर लागवड क्षेत्राचे नियोजन केले असून त्याकरिता 694.80 लाख इतका निधी प्रस्तावित केला आहे,अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले यांनी दिली आहे.

0000000

 Only God can paint the sky like this!

This is Marine Drive, South Mumbai, on 25 September evening.

👇👇👇👇👇

 


Tuesday, 28 September 2021

 जीएसटी’ प्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सोपीदोषविरहीत करण्यासाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन

 

          मुंबईदि. 27 :- वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रूटी दूर करुन ती सहजसोपी करण्यासंदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रीगट स्थापन करण्यात आला आहे. मंत्रीगटाने शिफारस केलेल्या आणि जीएसटी परीषदेने मंजूर केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर देखील हाच मंत्रीगट देखरेख ठेवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले. 

          उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीगटात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीयाहरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौतालाआंध्रप्रदेशचे अर्थमंत्री  बुग्गना राजेंद्रनाथआसामचे अर्थमंत्री अजंटा निओगछत्तीसगडचे व्यापार करमंत्री टी. एस. सिंगदेवओडीसाचे अर्थमंत्री निरंजन पुजारीतामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पलानीवेल थैगाराजन यांचा समावेश आहे. हा मंत्रीगट सध्याचीजीएसटी भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणेकरदात्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करणेकरवसुलीतील गैरप्रकार थांबवणे,  माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन करप्रणाली सक्षमदोषविरहीत बनवणेकेंद्र व राज्यांच्या करयंत्रणेमध्ये समन्वयासाठी यंत्रणा प्रस्थापित करणे आदी विषयांसंदर्भात वेळोवेळी शिफारशी करणार आहे. मंत्रीगटाने केलेल्या व जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या शिफारशींच्या कालबद्ध अंमलबजावणीवरही हाच मंत्रीगट लक्ष ठेवणार आहे. 17 सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी  परिषदेच्या 45 व्या बैठकीनंतर हा मंत्रीगट स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भातील परिपत्रकही जारी करण्यात आला आहे.

 गरजू व्यक्तींना मदत केल्याबद्दल राज्यपालांकडून सिंधी समाजाचा गौरव

·        सिंधी हेरिटेज फाउंडेशनच्या वतीने युवकांना स्वयंरोजगार कीट'चे वाटप

 

            मुंबई, दि. 27 : सिंधी समाजातील अनेक लोक स्वातंत्र्यानंतर स्थलांतर करून भारतात आले.  सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थिती असून देखील या समाजातील लोकांनी बुद्धीमत्ता व परिश्रमांच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली. संत झूलेलाल यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कोरोना काळात सिंधी समाजाने सर्व समाजातील गरजू व्यक्तींना केलेली मदत कौतुकास्पद आहेअसे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

            सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्‍या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व्यक्तींना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारतकीट देण्याच्या उपक्रमाचा आरंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. २७) राजभवन येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी आमदार संजय केळकरआमदार गणपत गायकवाडसिंधी हेरीटेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नारायण बबलानीआंतरराष्ट्रीय अध्यक्ष मुकेश बजाजमहिला अध्यक्षा दिव्या बजाज आदी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

            कोरोना संकटाप्रमाणे अतिवृष्टीभूस्खलनचक्रीवादळ यांसारखी संकटे अधून मधून येत असतात. अश्यावेळी केवळ सरकारकडून मदतीची अपेक्षा न करता समाजातील दानशूर लोकांनी परोपकाराचे काम केले पाहिजे असे सांगून सर्व समाजाने एकत्रितपणे काम केल्यास कोरोनासारख्या कोणत्याही संकटाचा समर्थपणे सामना करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

            कोरोनामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था सावरत असून देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने अग्रेसर होत आहे असे सांगून ७२० बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार कीट देण्याच्या सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्या निर्णयाचे राज्यपालांनी कौतुक केले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते आमदार संजय केळकरआमदार कुमार आयलानीआमदारगणपत गायकवाडडॉ.गुरुमुख जगवाणीथंडाराम तोलानीरमेश बजाजदयाल हरजानीअनिला सुंदरकाजल चंदिरामाणीअजीत मन्यालडॉ.मनीष मिराणीमुरली अदनानीराजू खेतवानीदिनेश तहलियानीजीतू जगवानीप्रेम भारतीय व उल्हासनगरच्या सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

0000

 

Corona Warriors Felicitated

Governor presents Atmanirbhar Bharat Kits to unemployed youths

 

            Governor Bhagat Singh Koshyari presented Atmanirbhar Bharat 'Self Employment' Kits to youths at a function organized by the Sindhi Heritage Foundation at Raj Bhavan, Mumbai on Monday (27th Sept).

            The Governor also felicitated Corona Warriors on the occasion. MLA Sanjay Kelkar, Founder President of the Sindhi Heritage Foundation Narayan Bablani, International President Mukesh Bajaj and Divya Bajaj were present.

            The Governor felicitated Sanjay Kelkar, MLA, Kumar Ailani, MLA, Ganpat Gaikwad, MLA, Thadaram Tolani, Dr. Gurumukh Jagwani, Ramesh Bajaj, Dayal Harjani, Anila Sunder, Kajal Chandiramani, Dr. Ajeet Manyal, Dr. Manish Mirani, Murli Adnani, Raju Khetwani, Dinesh Tahliyani, Jeetu Jagwani, Prem Bhartiya and members of the Ulhasnagar team of Sindhi Heritage Foundation on the occasion.

0000

Featured post

Lakshvedhi