Friday, 17 September 2021

 ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टचे स्लॉट बुकींग करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 15 : पक्क्या अनुज्ञप्ती चाचणी (Driving License Test) चे स्लॉट बुकींग करण्यासाठी अर्जदारांनी सकाळी १०.०० वाजता अर्ज ऑनलाईन पध्दतीने http:/sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर सादर करावा. असे आवाहन मुंबई प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

            प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) येथे पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीकरिता जास्तीत जास्त ९० दिवसांपर्यंत स्लॉट बुकींग करता येतो. पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीकरीता असलेल्या ठराविक कोट्याकरिता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्राथम्याने सादर झालेल्या अर्जाचाच स्विकार संगणकाद्वारे केला जातो. ठराविक कोटा पूर्ण झाल्यानंतर त्या दिवसाकरिता ऑनलाईन स्लॉट बुकींग बंद होते. इच्छुकांनी सकाळी १०.०० वाजता प्राथम्याने आपला अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावा.असे प्रादेशिक परिवहन अधिकारीमुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000



 

पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे

- पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू आणि विवेकानंद राय यांचे आवाहन

·       पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक

·       कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घेत पर्यटकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

 

            मुंबईदि. १५ : जम्मू आणि काश्मिरमध्ये पुढील ४ ते ६ महिन्यात विविध सणमहोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असून पर्यटनाशी संबंधीत घटकांचे ९५ टक्के तर पर्यटन विभागातील कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावेपर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू आणि काश्मिर तसेच तेथील लोक उत्सूक आहेतअसे आवाहन काश्मिरचे पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू आणि जम्मूचे पर्यटन संचालक विवेकानंद राय यांनी केले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ट्रॅव्हल एजन्ट्स असोसिएशन ऑफ काश्मिरचे अध्यक्ष फारुख कुथूजम्मू आणि काश्मिरचे मुंबई येथील सहायक पर्यटन अधिकारी बशीर अहमद वानी यावेळी उपस्थित होते.

            काश्मिरचे पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू म्हणाले कीजम्मू-काश्मिर आणि महाराष्ट्रामध्ये खूप जुने संबंध आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरला नेहमीच पसंतीचे स्थान दिले आहे. माता वैष्णोदेवीहजरतबल दर्गा यांसारखी धार्मिक पर्यटनस्थळेपहलगामसोनमर्गदल सरोवरगुलमर्गसारखी विपुल नैसर्गिक सौंदर्य लाभलेली स्थळे यासह इथली खाद्यसंस्कृतीहस्तकलापारंपारिक संगीत-नृत्य हे सर्व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. आता कोरोनापश्चात काळात येथील पर्यटनाला पुन्हा बहर येत असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. पर्यटकांनी लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी केली असल्यास उत्तमच होईल. पण हे केले नसले तरी पर्यटक तिथे येऊ शकतात. तिथे आल्यानंतर अँटीजेन चाचणी करुन पर्यटकांना पर्यटनासाठी संधी देण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

            पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जम्मू आणि काश्मिरमधील पर्यटन विभागाच्या सर्व अधिकारीकर्मचाऱ्यांचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय पर्यटन व्यावसायीकघोडेवालेबोटींग व्यावसायीकशिकारा चालकटूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांचे कर्मचारीहॉटेल स्टाफपर्यटन संबंधीत सेवा पुरवठादार यांचेही प्राधान्याने लसीकरण करण्यात आले असून ते ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. याशिवाय या सर्व घटकांना कोरोना प्रतिबंधासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावीपर्यटकांची कशी काळजी घ्यावी याबाबत प्रशिक्षणेही देण्यात आली आहेततसेच ठिकठिकाणी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण मोहीमा राबविण्यात आल्या आहेत. पर्यटकांची सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असून त्यामुळे पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये न घाबरता पर्यटनासाठी यावेअसे आवाहन डॉ. इटू यांनी केले.

            जम्मूचे पर्यटन संचालक विवेकानंद राय म्हणाले कीजम्मू आणि काश्मिरमध्ये पुढील ४ ते ६ महिने पर्यटनासाठी विविध उपक्रममहोत्सव आदींचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या काळात नवरात्रदसरालोहडीदिवाळीख्रिसमसनववर्षपुढील वर्षात येणारी होळी असे अनेक सण-उत्सव आहेत. पर्यटकांना आकर्षित करणारी बर्फवृष्टीटुलीप फुलांचा महोत्सवकेसर महोत्सवशरद ऋतुतील विविध महोत्सव यासह या काळात अद्भूत असे निसर्ग सौंदर्य पाहण्याची पर्यटकांना संधी आहे. बर्फातील विविध खेळपक्षी निरीक्षणट्रेकींगहेरीटेज टुरीजम यांनाही जम्मू आणि काश्मिरमध्ये आता बहर येत आहे. पर्यटकांची संख्याही हळुहळु वाढत असून कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याने तसेच पर्यटनाशी संबंधीत सर्व घटकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आल्याने विविध निर्बंध मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी जगातील सर्वात सुंदर स्थळ असलेल्या जम्मू  आणि काश्मिरला येत्या काळात अवश्य भेट द्यावीअसे आवाहन त्यांनी केले. सर्व जम्मू आणि काश्मिरवासीय पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सूक आहेतअसे त्यांनी सांगितले.

            यावेळी कोरोनापश्चात काळातील जम्मू आणि काश्मिरमधील बदलत्या पर्यटनाचे तसेच पर्यटकांसाठी घेण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. अधिक माहितीसाठी www.jammutourism.gov.in तसेच www.jktourism.jk.gov.in आणि www.jktdc.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

००००

 मंत्रिमंडळ बैठक : दि. 15 सप्टेंबर 2021

एकूण निर्णय-5

 

मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही

यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणार

 

            महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के आरक्षण ठेवूनओबींसीसह एकूण मागासवर्गीय जागांपैकी एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांहून जास्त होणार नाही अशी सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            या अधिनियमात सुधारणा करण्याचा ग्राम विकास विभागाने प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने चर्चा होवुन मंत्रीमंडळाने खालीलप्रमाणे अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या अध्यादेशात करण्यात येणारी सुधारणा पुढीलप्रमाणे,

        महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 10पोटकलम (2)चा खंड (ग) आणि कलम 30पोटकलम (4) चा खंड (ब) आणि  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या  कलम 12पोटकलम (2) चा खंड (ग)कलम 42पोटकलम (4)चा खंड (ब)कलम 58पोटकलम (1ब) चा खंड (क) आणि कलम 67पोटकलम (5) चा खंड (ब) मध्ये  नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के पर्यंत आरक्षण ठेवणे तसेच सदर आरक्षण ठेवताना  एकूण मागासवर्गीय जागांपैकी  अनुसूचित जाती + अनुसूचित जमाती + ओबीसीं  (ना.मा.प्र.) चे एकत्रित आरक्षण  ५० टक्के पेक्षा जास्त होणार नाही  अशी सुधारणा करण्यात येईल. हा सुधारित अध्यादेश ग्राम विकास विभागातर्फे काढण्यात येईल.

-----०-----

आदिवासीबहुल आठ जिल्ह्यातील क व ड गटातील

पदांसाठी सुधारित आरक्षणास मंजुरी

            अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या भरतीसाठी सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पालघरनाशिकधुळेनंदूरबारयवतमाळचंद्रपूरगडचिरोलीरायगड या 8 जिल्ह्यांमधील आरक्षण जिल्हा व प्रवर्गनिहाय पुढील प्रमाणे-

पालघरनाशिकधुळेनंदूरबार या 4 जिल्ह्यांमध्ये अनु.जाती 10 टक्केअनु.जमाती 22 टक्केविजा-अ 3 टक्केभज-ब 2.5 टक्केभज-क 3.5 टक्केभज-ड 2 टक्केविमाप्र 2 टक्केइमाव 15 टक्केईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 30 टक्के,  यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्केअनु.जमाती 14 टक्केविजा-अ 3 टक्केभज-ब 2.5 टक्केभज-क 3.5 टक्केभज-ड 2 टक्केविमाप्र 2 टक्केइमाव 17 टक्केईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 34 टक्के, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनु.जाती 13 टक्केअनु.जमाती 15 टक्केविजा-अ 3 टक्केभज-ब 2.5 टक्केभज-क 3.5 टक्केभज-ड 2 टक्केविमाप्र 2 टक्केइमाव 19 टक्केईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 30 टक्के, गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्केअनु.जमाती 24 टक्केविजा-अ 3 टक्केभज-ब 2.5 टक्केभज-क 3.5 टक्केभज-ड 2 टक्केविमाप्र 2 टक्केइमाव 17 टक्केईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 24 टक्के, रायगड जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्केअनु.जमाती 9 टक्केविजा-अ 3 टक्केभज-ब 2.5 टक्केभज-क 3.5 टक्केभज-ड 2 टक्केविमाप्र 2 टक्केइमाव 19 टक्केईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 37 टक्के.

-----०-----

 

सातारा मेष पालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेसाठी

जमीन खरेदी व्यवहारातील मुद्रांक शुल्क माफ

            सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील सातारा मेष पालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेच्या जमीन खरेदी व्यवहारातील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            सातारा मेष पालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्थेच्या आणि संबंधित मूळ शेतमालक यांच्या दरम्यान होणाऱ्या जमीन हस्तांतरणासाठी व्यवहार होणार आहे. या व्यवहारातील मुद्रांक अधिनियमानुसार द्यावे लागणारे सुमारे 6 लाख 66 हजार 474 रुपयांचे मुद्रांक शुल्क तसेच या व्यवहारासाठी नोंदणी नियमानुसार द्यावे लागणारे शुल्कही माफ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

-----०-----

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा

आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

            कोकणामध्ये कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेले नुकसान विचारात घेवून कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  या प्रकल्पांतर्गत सुमारे 3 हजार 200 कोटी पैकी 2 हजार कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित 1200 कोटी रुपये पुढील 4 वर्षात (सन 2022-25) राज्याच्या निधीतून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.

            या प्रकल्पात क्षमता बांधणी आणि पूर्वतयारी तसेच सौम्यीकरण निधीचा योग्य व सर्वसमावेशक वापरासाठी 4 वर्षासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संनियंत्रण गट (Project Monitoring Unit) व सल्लागारांची नियुक्ती करण्यात येईल. त्यासाठी  होणारा खर्च क्षमता बांधणी व पूर्वतयारीसाठी उपलब्ध निधीच्या 7 टक्के मर्यादेत व सौम्यीरकणासाठी उपलब्ध निधीच्या 3 टक्के मर्यादेत राज्य योजनेमधून विभागास मंजूर होणाऱ्या तरतूदीतून खर्च करण्यास मान्यताही देण्यात आली.

-----०-----


 

 

अमरावती जिल्ह्यातील पेढी बॅरेज योजनेच्या

खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता

 

            अमरावती जिल्ह्यातील पेढी बॅरेज या उपसा सिंचन योजनेच्या 361 कोटी 61 लाख रुपयांच्या खर्चास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            हा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळनागपूर अंतर्गत टेंभा गावाजवळून वाहणाऱ्या पेढी नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे अमरावती तालुक्यातील 7 गावातील 2 हजार 232 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.  या प्रकल्पाचा लाभ कृषी सिंचनासह पिण्यासाठी पाणीपुरवठा व मत्स्य व्यवसाय यासाठी होणार आहे.

-----०-----


 

दि. 15 सप्टेंबर 2021

 

रत्नागिरीच्या वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी

५ एकर जागा देण्याचा निर्णय

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

 

            मुंबईदि. 15 : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची ५ एकर जागा महसूल आणि वनविभागास हस्तांतरीत करण्यात आली आहेअशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

            राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ला लागून असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागासह आरोग्यमहसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या रुग्णालयासाठी गट नं. ८६६ मधील ५ एकर जागा आरोग्य विभागास हस्तांतरित करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार ही जागा महसूल व वन विभागास प्रत्यार्पित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आहे.

            या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल पडले आहे. उपचाराच्या आधुनिक सेवासुविधा उपलब्ध असलेले हे रूग्णालय रत्नागिरी जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देणार आहे. शिवाय हे रूग्णालय मुंबई-गोवासारख्या व्यग्र राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने अपघातग्रस्तांनाही वेळीच उपचार उपलब्ध करून देणे शक्य होऊ शकेल. 


 महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३

वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना

ऑनलाईन अर्ज करण्यास २ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

            मुंबईदि. १६ : महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना वीजदरात सवलत लागू करण्यात आली असून ही सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत  सर्व संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन आणि २७ अश्वशक्तीखालील घटकांनी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

            राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आलेली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत देण्यात आलेली होतीत्यानंतर यंत्रमाग घटकांच्या संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही मुदत ३१ मे २०२१ पर्यंत वाढविण्यात आलेली होती. मात्रया मुदतीत देखील बहुतांश यंत्रमाग घटकांनी नोंदणी केल्याचे दिसून आले नाही

            सर्व प्रकारच्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन तसेच २५ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयान्वये २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकाराने नोंदणी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ही अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक २ सप्टेंबर २०२१ च्या शासन पत्रानुसार  एक महिन्याची म्हणजे २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित यंत्रमाग घटकांनी अर्ज केला नाही तर त्यांची वीज सवलत जोपर्यंत ते सदर नोंदणी करीत नाहीत तो पर्यंत बंद करण्यात यावीअसे निर्देश शासनाने दिलेले आहेतत्यामुळे सर्व संबंधित यंत्रमाग घटकांनी विहित मुदतीच्या आत आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन (२७ अश्वशक्तीखालील घटक) नोंदणी करणे आवश्यक आहेअसे वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.

०००

 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जोमाने कामे करुन जनतेपर्यंत सेवा- सुविधा पोहोचवाव्यात

                                        - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

·       पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

                                                           

            मुंबई, दि. 16 : पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू  करण्यात आला असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जोमाने कामे करुन जनतेपर्यंत सेवा - सुविधा पोहोचवाव्यात, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

            पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

          उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नगरविकास मंत्री श्री.शिंदे हे विविध विषयांवर काळजीपूर्वक दखल घेत असतात. पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळातील भत्ता न घेता आपली सेवा चोखपणे बजावली आहे, असेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.    

पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगानुसार

सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मान्यता - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

            पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता दिल्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

            नगरविकास मंत्री श्री.शिंदे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची केंद्र व राज्य सरकारप्रमाणे 7 वा वेतन आयोग  लागू करण्याबाबत बऱ्याच दिवसांची मागणी होती. यासाठी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता. याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येईल. प्रशासनामध्ये काम करीत असताना आपली सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहचली पाहिजे. असे नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी सांगितले. प्रशासनातील सर्वांनीच समन्वयाने एकत्र काम केले पाहिजे. तसेच आपली सेवा चोखपणे बजावून जनतेला सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्पर रहावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            सन 2020- 2021 च्या अंदाजपत्रकात 7 व्या वेतन आयोगासाठी 100 कोटी एवढ्या रकमेची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. स्थायी आस्थापना खर्चामध्ये तसेच वेतन वाढीसाठी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे 7 व्या वेतन आयोगानुसार 1.1.2016 ते 31.3.2020 या कालावधीतील फरकाची रक्कम सलग तीन हप्त्यात देण्यात यावी व 1.4.2020 पासून 7 वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईपर्यंत फरकाची रक्कम एकरकमी रोखीने देण्यास महासभेने मान्यता दिली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचा प्रश्न निकाली लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

 वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी करण्याचे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीए आयुक्तांना आदेश

·        त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून करणार पूल दुर्घटनेची चौकशी

·        जखमी कामगाराची मंत्री शिंदे यांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात जाऊन घेतली भेट

 

            मुंबईदि. 17: वांद्रे कुर्ला संकुल ते जेव्हीएलआरला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेची त्रयस्थ मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करतील अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचाराचा खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

            आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वांद्रे कुर्ला संकुल आणि जेव्हीएलआर यांना जोडणाऱ्या निर्माणाधीन पुलाचा गर्डर अचानक कलंडल्याने  14 कामगार जखमी झाले.  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

             ही दुर्घटना दुर्दैवी असून दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईलअसे त्यांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असलेतरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी नवीन तयार होत असलेल्या पुलांचे मूल्यमापनही त्रयस्थ मूल्यमापन संस्थेकडून करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिले.

जखमी कामगाराची रुग्णालयात जाऊन घेतली भेट

            या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या 13 कामगारांना उपचार करून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर केवळ एक कामगार डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहे. मंत्री शिंदे यांनी व्ही.एन देसाई रुग्णालयात जाऊन या कामगाराची विचारपूस केली. तसेच त्याच्यावर नीट उपचार करण्याच्या सूचना डॉक्टराना दिल्या.

            यावेळी एमएमआरडीए आयुक्त व्ही. श्रीनिवास रावस्थानिक पोलीस अधिकारीएमएमआरडीएचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

 प्रा. टी. पद्मनाभन यांच्या निधनाने

वैज्ञानिक जगताची मोठी हानी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

        

         मुंबईदि. 17 :- पुण्यातील आयुका’ संस्थेचे मानद प्राध्यापकज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. टी. पद्मनाभन यांनी भौतिक आणि खगोल विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधनान भारताला जगात नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या संशोधनात्मक पुस्तकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावली. उदयोन्मुख वैज्ञानिकांना संशोधनाची दिशा दाखवली. भारतीय जनमानसात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी त्यांनी दिलेल योगदान कायम स्मरणात राहील.  प्रा. टी. पद्मनाभन यांच्या निधनान भारतीय भौतिकखगोल विज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांचा मार्गदर्शक हरपला आहे. वैज्ञानिक जगताची मोठी हानी झाली आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. टी. पद्मनाभन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

००००

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

 

            मुंबईदि. 17 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधानांना निरोगीदीर्घायुष्य लाभोत्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वसमावेशक विकास घडोअशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

            पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात कीभारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान होण्याचं भाग्य आपल्याला दोनदा लाभलं आहे. स्वतंत्र भारतात जन्म झालेले आपण देशाचे पहिले पंतप्रधान आहात. पंतप्रधानपदी झालेली फेरनिवड ही देशवासियांच्या विश्वासाचंअपेक्षांचं प्रतिक आहे. देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करुन त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचं बळ आपणास मिळो. पंतप्रधान म्हणून आपल्या नेतृत्वाखाली देशाची एकताअखंडतासार्वभौमत्वसंविधानलोकशाही व्यवस्था अबाधित राहो. देशातील महागाईबेरोजगारीकोरोनासह आर्थिकसामाजिक संकटांवर यशस्वीपणे मात करुन देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात आपणास यश मिळोअशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्याही पंतप्रधान म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता होईल. महाराष्ट्राला तसेच समस्त देशवासियांना समान न्यायविकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याचं काम आपल्याकडून होईलअशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.

000

 


 

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

 

            मुंबईदि. 17 :- महाराष्ट्राच्या भूमीत विज्ञानवादीसुधारणावादी विचार रुजवणारे क्रांतिकारी नेतेसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आघाडीचं नेतृत्वं स्वर्गीय केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचंविचारांचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केलं आहे.

            प्रबोधनकार ठाकरे यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेप्रबोधनकार ठाकरे हे सुधारणावादी विचारांचे कृतीशील नेते होते. समाजातील वाईट रुढीपरंपराजातीव्यवस्थाअस्पृश्यतेवर त्यांनी प्रहार केला. बालविवाहकेशवपनहुंडाप्रथेसारख्या रुढींविरुद्ध प्रखर लढा दिला. ते खऱ्या अर्थानं प्रबोधनकार होते. लेखकपत्रकारइतिहास संशोधक म्हणूनही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील आघाडीचं नेतृत्वं म्हणून त्यांचं योगदान खुप मोठं आहे. त्यासाठी ते महाराष्ट्राला नेहमीच आदरणीय राहतीलअशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.

०००


 

मराठवाडा मुक्ती संग्रामातील’ वीरांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

 

            मुंबईदि. 17 :- ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचाशौर्याचासंघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. स्वामी रामानंदतीर्थगोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं महत्वं देशाच्या स्वातंत्र्यलढ्याइतकंच आहे. देशाची एकताअखंडतासार्वभौमतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्यात्याग केलेल्या वीर सुपुत्रांचा देश नेहमीच ऋणी राहील. मी त्यांना वंदन करतोअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांचे स्मरण करुन राज्यातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यासह राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या मराठवाड्यातील नागरिकांबद्दलस्वातंत्र्यसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मराठवाड्याचा इतिहास संघर्षाचा राहिला आहे. हा संघर्षाचा वारसा कायम ठेवून भविष्यकाळात मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करुयाअसं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला केलं आहे.

००००

Featured post

Lakshvedhi