Saturday, 21 August 2021

 आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी


मुलुंड शासकीय आयटीआय आणि आयटीसी हॉटेल लिमीटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार


युवक-युवतींना प्रशिक्षणाबरोबरच शाश्वत रोजगाराची संधी


                                             -   कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक


 


मुंबई, दि. २१ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमीटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फुड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हीस असिस्टंट या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना आयटीसी हॉटेल लिमिटेडमार्फत सहा महीन्यांपर्यंत अद्ययावत असे ऑन द जॉब ट्रेनिंग घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.


युवक-युवतींना फक्त प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना शाश्वत रोजगाराची उपलब्धता होणेही गरजेचे आहे. त्यासाठी आयटीआयसोबत विविध औद्योगिक आस्थापनांचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक नामांकीत संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले.


सामंजस्य करारावर मुलुंड आयटीआयचे प्राचार्य प्रदीप दुर्गे आणि आयटीसी हॉटेल लिमिटेडचे व्यवस्थापक (एचआर) धनंजय कुलकर्णी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे मुलुंड आयटीआयमधील फुड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हीस असिस्टंट व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण प्राप्त होऊन हॉस्पीलिटी सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्राप्त होणार आहे. ड्युएल सिस्टीम ट्रेनिंग पद्धतीअंतर्गत हा सामंजस्य करार करण्यात आला असून यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयमधील सैद्धांतिक प्रशिक्षणाबरोबरच औद्योगिक आस्थापना, कॉर्पोरेट तथा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची सुविधा प्राप्त होते. 


याप्रसंगी मुलुंड आयटीआय संस्थेच्या अंतर्गत डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच संगणक कार्यशाळेचे (आयटी लॅब)  मंत्री श्री. मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर मियावाकी वृक्षारोपणाची पाहणी आणि वृक्षारोपणही करण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक डॉ. अ. म. जाधव, संस्थेचे उपप्राचार्य संदीप परदेशी, निरीक्षक अनिल सदाफुले यावेळी उपस्थित होते.


दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी आयटीआयसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरु असून इच्छूक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


००००

 *बाभळीची पावडर उपलब्धता* 


 *मुंबई, बोरिवली पश्चिम*


 आजकाल, जवळजवळ प्रत्येक घरात आईवडिलांचे, वयस्कर लोकांमधे गुडघेदुखीची समस्या असतेच असते. आणि त्याकरीता डॉक्टर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊन मोकळे होतात. ज्यामुळे त्यांता धंदा जोरात चालावा ज्याची किंमत आपल्याला दोन ते तीन लाख रुपये लागते.

आणि एवढं महागडं ऑपरेशन करून ही काहींना फारसा फरक पडत नाही, दुखायचं बरं वाटंत नाही,


 यासाठी सर्वात स्वस्त, चांगला आणि सोपा उपाय म्हणजे:- *बाभूळ बि ची पावडर* कोमट पाण्यात  एक चमचा पावडर मिसळा आणि दुपारी आणि रात्री जेवणानंतर या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी घ्या...

*शस्त्रक्रियेची अजिबात गरज नाही...*

*गुडघेदुखी पुर्णपणे बरी होते व रूग्ण ठणठणीत होऊन चालायला लागतो...*


*लाखो रूपयांचे व शरिरीक नुकसान ही होण्याचे वाचते...*


 200 ग्रॅम पॅकिंग पावडर मिळते.

 फक्त ₹.30.00  प्रति पॅक


*ही पोष्ट मी आपणांस रूग्णसेवा, जनसेवा या हेतूने पाठवित आहे, यामध्ये माझे  कमिशन किंवा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही... कॄपया गैरसमज नसावा...*


 पावडर मिळण्याची जागा

 👇👇👇👇👇👇👇


  *उमेश पी दोशी*

 फ्लॅट: 52, B3 मानसरोवर CHSL, मानेक नगर, पंजाबी लेन, OPP- येस बँक, बोरिवली पश्चिम, मुंबई - 400092.

 मो - 9370231838

 **********************

 स्वस्तिक जैन जागृती परिवार (साबरमती) अहमदाबाद यांच्या सहकार्याने सेवाकार्य चालू आहे, जैन साधू भगवंतो-साध्वीजी महाराज मार्फत दिले जाईल. *बाभूळ बी पावडर* घेतल्याने वेदना दूर होतात, कोणतेही दुष्परिणाम नाहीत. हे सेवेचे काम आहे.. ही माहिती पुढे पाठवा, जेणेकरून कोणीतरी मोठी रक्कम खर्च करण्याचे टाळू शकेल.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 बाजीरावांचा आम्हाला ठाउक नसलेला इतिहास! वाचून अंगावर रोमांच उभे राहीले नाहीत तरच नवल!!!!!


आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक

आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की,

बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त

मस्तानी. ह्या मस्तानीचं गारुड एवढं काही

गडद आहे की, त्यापलिकडचा बाजीराव

आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो.

वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा

पेशवा झालेला हो! अवघं ४० च वर्षांचं शापित

आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची

कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा! त्या

२० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी

स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं! जो संकल्प

थोरल्या महाराजांनी मनी धरला होता,

ह्या रणधीराने तो पूर्तीस नेला. महाराष्ट्रास

वाकुल्या दाखवत ४०० वर्षे खिजवणारी

दिल्ली जाळली, लुटली आणि फस्तच नव्हे, तर

अंकित केली ती ह्याच बाजीरावाने! मेघ

बेबंदपणे बरसू लागले की जसं जंगलात एकही पान

कोरडं राहू शकत नाही, तसा हा हिंदवी

स्वराज्याचा पंतप्रधान अवघ्या मुलुखभर तांडव

करत होता! राजमुद्रेतील शिवछत्रपतींना

अपेक्षित असलेले 'वर्धिष्णू' आणि 'विश्ववंदिता'

शब्द सार्थ करत होता. एवढ्या मग्नतेने की,

त्यापोटी वैयक्तिक आयुष्य, तहान-भूक सारं

सारं तुच्छ ठरलं आणि ह्या असमशौर्यधाम

वीराला मृत्यू आला तोही मोहीम

करतानाच!! पण हे आम्हाला शिकवलंच जात

नाही. शालेय इतिहासाच्या पुस्तकात

आमच्या राष्ट्रपुरुषांना स्थान दिलं न

दिल्यासारखं केलं जातं आणि रानटी मुघल

आक्रमकांच्या स्तुतीपोटी मात्र पानेच्या

पाने भरली जातात, ही इथली अवस्था आहे. अन्

वर आम्हीच चिंता करतो की, आमची पिढी

स्वदेशाभिमानी आणि कसदार का बरं होत

नाही!!

वास्तविक बाजीराव हा शतकानुशतकांतून

कधीतरीच उदित होणारा निष्णात सेनापती.

साक्षात रणपंडित!! ४० वर्षांचं आयुष्य, २०

वर्षांची कारकीर्द आणि ४१ लढाया; करा

कल्पना!! ह्या ४१ लढायांपैकी एकसुद्धा लढाई

न हरलेला नरपुंगव होता बाजीराव!! ४१ वेळा

अजिंक्य राहिलेल्या आणि तेही आपल्या

शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराज्यासाठी युद्ध

करत अजिंक्य राहिलेल्या महारथीचा

आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे!

पण आम्ही करंटे मात्र बाजीरावाला प्रेमवीर

म्हणून रंगवतो. नाहीतर मग त्याची जात

पाहातो! वस्तुतः महापुरुषांची 'जात' नसते

पाहायची, तर त्यांनी जनसामान्यांच्या

मनामनात पेटवलेली अभिमानाची 'वात' आणि

त्यायोगे सबंध समाजाने टाकलेली 'कात'

पाहायची असते. हे आपण जेव्हा शिकू, तेव्हाच

इतिहास नावाचा खजिना आपल्या खऱ्या

स्वरुपात खुला होतो. उदाहरणार्थ - ब्रिटीश

फिल्डमार्शल Bernard Montgomery याने आपल्या

History of Warfare ग्रंथात बाजीरावाने

लढलेल्या पालखेडच्या युद्धाचं वर्णन 'A

masterpiece of strategic mobility' ह्या गौरवपूर्ण

शब्दांत केलंय! का बरं म्हणाला असेल तो असं?

मुळात दख्खनचा प्रांतपाल म्हणून आलेल्या आणि

नंतर स्वतःचीच असफजाही राजवट सुरु केलेल्या

निज़ामाने मराठ्यांच्या कोल्हापूर आणि

सातारा गाद्यांमधील दुफळीचा फायदा घेत

१७१९ चा सय्यद बंधूंशी झालेला मराठ्यांचा

करार मानायला नकार दिला. वर शहाणा

कोल्हापूरचे संभाजी आणि सातारचे शाहू

दोघांनाही म्हणू लागला 'तुमच्यातला खरा

छत्रपती कोण ते मी ठरवून देतो आणि त्यालाच

कराराप्रमाणे चौथाई-सरदेशमुखी घेता येईल'.

पंतप्रतिनिधींच्या कारस्थानामुळे कोल्हापूरचे

संभाजी निज़ामाला सामील झालेले.

महाराष्ट्राला लागलेला दुहीचा शाप, दुसरे

काय! पण शाहुंनी मात्र ह्या अपमानास्पद

गोष्टींना थारा द्यायचं नाही असं ठरवलं

आणि त्यावेळी कर्नाटकच्या मोहिमेवर

असलेल्या बाजीरावांना पाचारण केलं. ह्या

काळात निज़ाम स्वतः ऐवज़खानासोबत पुणे

जिल्ह्यात धुमाकूळ घालत होता. त्याचा

सरदार तुर्कताज़खान नाशिक व संगमनेर भागात

धुडगूस घालत होता. आणि रंभाजी निंबाळकर

साताऱ्यावर बरसत होता. स्वराज्यावर असं

चहुबाजूंनी संकट आलेलं असताना राऊंनी एक

अनोखाच निर्णय घेतला. १७२७ च्या दसऱ्याला

त्यांनी जे सीमोल्लंघन केलं ते विद्युद्वेगाने थेट

औरंगाबादच्या दिशेने आणि काही

समजायच्या आतच गोदावरीपल्याडच्या

निज़ामी प्रांताचा पार चुथडा करुन टाकला.

गडबडून गेलेला निज़ाम सारे सोडून

बाजीरावांच्या मागे! बाजीराव मात्र

वायुवेगाने हालचाली करत संचार करत होते.

वाटेत लागणारा निज़ामचा सर्व मुलूख फस्त

करत होते. बाजीरावांचा रोख पाहून

निज़ामाला वाटले की ते बुऱ्हाणपूरवर हल्ला

करणार. येडा सगळी तयारी करुन बसला, तर

बाजीराव त्याला वाईट चकवा देत पार

भरुचला उगवले!! वर अफवा पसरवून दिल्या की,

निज़ामशी हातमिळवणी करुन मी गुजरातवर

आक्रमण करतोय. निज़ामाशी उभा दावा

असलेला अलिमोहनचा सुभेदार सरबुलंदखान

हबकला, तर बाजीरावांनी त्याला अभय

दिल्याचे नाटक केले. कश्यात काही नसताना

निज़ाम हकनाक बदनाम झाला. तळतळून त्याने

पुणे प्रांत बेचिराख करुन टाकला. संभाजींना

छत्रपती घोषित केले. हेतू केवळ एकच की,

बाजीराव खुल्या मैदानात यावेत. कारण,

निज़ामाचा सगळा भर तोफखान्यावर.

त्याच्या वेगाला मर्यादा. बाजीराव सडे

स्वारी करणारे, मिळेल ती चटणी-भाकर

खाणारे आणि परमुलूख लुटून रसद मिळवणारे.

त्यामुळे त्यांच्या हालचाली जलद! ते कश्याला

निज़ामाला भिक घालताहेत? उलट निज़ाम

पुण्यावर आहे म्हटल्यावर बाजीराव थेट

औरंगाबादच्या दिशेने निघाले. पन्नाशी

उलटलेला पाताळयंत्री निज़ाम दुसऱ्यांदा

अवघ्या पंचविशीतल्या राऊस्वामींच्या

डावाला बळी पडला! आपला सारा

तोफखाना मागे अहमदनगरलाच ठेवण्याशिवाय

त्याला गत्यंतरच उरले नाही. तसाच

औरंगाबादच्या दिशेने धावला! नियती

खळखळून हसली असेल त्यावेळी!!

निज़ामाच्या एकूण एक हालचालींची वार्ता

गुप्तचरांमार्फत राऊंकडे पोहोचत होती.

बाजीरावांनी ताबडतोब गंगापूर आणि

वैजापूर लुटले व पालखेड येथे जाऊन स्थिरावले.

बिथरलेला निज़ाम पालखेडवर चालून आला.

मराठ्यांच्या चतुर पेशव्याला पालखेडचा भूगोल

व्यवस्थित ठाऊक होता. गावाच्या पूर्वेला

एकच नदी. ती राऊंनी ताब्यात घेतली.

गावाला पाणीपुरवठा करणारे सारे मार्ग

रोखले. निज़ामाची रसद मारली. मुलूख तर

केव्हाच फस्त केलेला. दग्धभू धोरण. सैन्य

घोड्याच्या नालेच्या आकारात विभागलेले.

निज़ाम चालून आला आणि अन्न नाही पाणी

नाही अश्या अवस्थेत बाजीरावांनी

लावलेल्या सापळ्यात अडकला. कुत्रे हाल

खाईनात अशी अवस्था झाली त्याची.

पोटात कण नाही आणि चारी बाजूंनी काळ

बनून उभे ठाकलेले मराठे!! दि. २५ फेब्रुवारी १७२८.

अतिप्रचंड सैन्य घेऊन आलेल्या निज़ामाने

अवघ्या पंचवीस सहस्र सैन्यासोबत लढणाऱ्या

पंचविशीतल्या तरुण पोरासमोर बिनशर्त

शरणागती पत्करली. बाजीरावांच्या

मेहेरबानीवर अत्यंत अपमानास्पद अवस्थेत

जायला वाट करुन दिली गेली त्याला. पुढे ६

मार्चला मुंगी-पैठणच्या शमानुसार त्याला

मराठ्यांची चौथाई-सरदेशमुखी तर परत

द्यावीच लागली, शिवाय मान तुकवून

शाहूंनाच छत्रपती म्हणून स्वीकारावे लागले!!

चातुर्याने हालचाली केल्या तर आपले

कमीतकमी नुकसान करुन रणमैदानात काय काय

चमत्कार करुन दाखवता येतात; याचे उत्तम

उदाहरण म्हणजे ही पालखेडची न झालेली

लढाई!! शिवरायांच्या युद्धनीतीचा विकास

ह्या हालचालींमध्ये दिसून येतो.

बाजीरावांनी ह्या युद्धाचे ठिकाणही

स्वतःच ठरवले, वेळही स्वतःच ठरवली आणि

कावेबाज म्हणून समजल्या गेलेला निज़ामाला

आपल्या तालावर अक्षरशः हवे तसे नाचवले!

याच मोहिमेने बाजीरावांचा आणि

मराठेशाहीचा डंका सर्वत्र वाजण्यास सुरुवात

झाली. अश्या कर्तबगार पेशव्याची आज

जयंती. यानिमित्ताने आज हा

मस्तानीपल्याडचा बाजीराव आठवूयात.

अभिमानाने फुलून जाऊयात!!

 राज्य बाल न्याय नियमानुसार निवड समिती गठीत


            मुंबईदि.२१: जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्षसदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणुकीकरिता राज्य शासनास शिफारस करण्यासाठी मा.उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती डॉ. शालिनी शशांक फणसाळकर- जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षासाठी निवड समिती गठीत करण्यात आली आहेअशी माहिती  महिला व बाल विकास आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे.
            दिनांक २३ जुलै २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 च्या नियम 90 (1) मधील तरतुदीनुसार ही निवड समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर समितीवर अध्यक्षपदी डॉ. फणसाळकर- जोशी तर सदस्य म्हणून अनिरुद्ध पुरुषोत्तम पाटीलगजानन नामदेव मुंढेश्रीम. निर्मला सांमत-प्रभावळकरविकास रावजी सावंतराज्य बाल हक्क संरक्षण आयोगमुंबई आणि महिला व बाल विकास आयुक्तपुणे असे एकूण 6 सदस्य आहेत. समिती बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 (2016 चा 2) मधील तरतुदीनुसार जिल्हा स्तरावरील वैधानिक स्वरुपाच्या बाल कल्याण समितीवर अध्यक्षसदस्य आणि बाल न्याय मंडळावर सदस्यांच्या नेमणूकी करिता राज्य शासनास शिफारस करणार आहे.


0000


 🌹 *श्रीगणेश स्थापना* 🌹


मला परवापासून अनेक सदस्यांचे गणेश स्थापना मुहूर्त व अकस्मात येणाऱ्या अडचणीबद्दल फोन , मेसेज आले . मला आलेले प्रश्न व त्यांची दिलेली उत्तरे सर्वांना माहितीसाठी पाठवत आहे .


*अशोककाका कुलकर्णी*

*९०९६३४२४५१*


*प्रश्न क्र १ :-* गणेश स्थापना मुहूर्त कोणता ?

*उत्तर:-* गणेश स्थापना हे तिथीप्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शु. चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्ही पर्यंत कधीही स्थापना करता येते . उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून दुपारी स्थापना झाली तरी चालेल . त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, स्थिर राशींचा कालावधि, भद्रा (विष्टि करण), चौघडीया मुहूर्त (अमृत, लाभ) इत्यादि पाहण्याची गरज नाही .


*प्रश्न क्र २ :-* घरातील महिला गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जन करावे की नाही ?

*उत्तर :-* याला काहीही शास्त्रीय आधार नाही . आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते , अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्या वेळी  गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे , असा भोळा समज त्यामागे आहे . 


*प्रश्न क्र ३* अशौच ( सोयर व सुतक ) आल्यास गणपती नंतर बसवला तर चालेल का ?

*उत्तर :-* पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे कुलाचार नाही , त्याचा एखाद्या वर्षी लोप झाला तरी चालतो , पुढील वर्षी बसवता येतो .

पार्थिव गणेश स्थापना  करण्याचा भाद्रपद शु चतुर्थी हा एकच दिवस असल्याने, त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी अशौच संपत नसेल, तर त्या वर्षी गणपति बसवू नये. येथे स्थापना दिवस महत्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही. 


*प्रश्न क्र ४ :-* आता अशौचामुळे शक्य नसल्यामुळे अश्विन नवरात्रात गणपती बसवला तर चालेल का ?

*उत्तर:-* आश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थीस राहिलेले गणपति पूजन करू नये त्याला काहीही  शास्त्राधार नाही . अनेकजण गौरी पण अडचण आल्यास नवरात्रात बसवतात . ते पण शास्र मान्य नाही .


*प्रश्न क्र ५* यंदा कोरोनामुळे गावी दहा दिवस थांबता येणार नाही तर पाच दिवसात विसर्जन केले तर चालेल का ?

*उत्तर :-* अडचणीच्या काळात दीड दिवस , तीन , पाच , सात दिवसात विसर्जन करू शकता . 

गणेश स्थापना झाल्यावर अशौच आले तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून घ्यावे , अशौच आल्यावर घरात पार्थिव गणपती ठेऊ नये .


*प्रश्न क्र ६:-* मागील वर्षी आम्ही बसवलेली गणेशमूर्ती भंगली होती मग आम्ही नवीन आणून बसवली . ते योग्य आहे का ? 

*उत्तर :-* गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच विसर्जन करावे , दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठा करू नये . जर प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसवू शकता .


*प्रश्न क्र ७* आमचे वडील स्वर्गवासी झाले पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का ?

*उत्तर :-* चौदा दिवस झाल्यावर उदक शांती झाल्यावर सर्व व्रते देवकार्य करता येते . त्यामुळे आरास न करता , साध्या पद्धतीने व भक्ती भावाने गणेश स्थापना करावी .


*प्रश्न क्र ८ :-* आम्ही दरवर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे  गौरी गणपतीचा सण साजरा करतो , पण यंदा कोरोनामुळे जाणे शक्य नाही . आम्ही वेगळ्या गौरी गणपती बसवू शकतो का ?

*उत्तर :-* हो , जे भाऊ वेगळे वास्तव्यास आहेत , ज्यांची चूल वेगळी आहे त्या सर्वांना वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो . प्रतिवार्षिक व महालय श्राद्ध सुद्धा वेगळे करावे लागते . 


*प्रश्न क्र ९* पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा ?

*उत्तर:-* घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे प्रतिष्ठा व पूजन करावे व ती मूर्ती वाहत्या पाण्यात , जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे . त्यामुळे त्याबद्दलचे विशिष्ट नियम नाहीत .


*प्रश्न क्र १०:-* या वर्षी सार्वजनिक गणपती स्थापना करता येत नाही मग घरामध्ये स्वतःचा एक व सार्वजनिक एक असे गणपती बसवले तर चालतील का ?

*उत्तर :-* गणेशस्थापणा हे एक व्रत आहे , त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले . त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती . त्यामुळे घरात फक्त वैयक्तिक व्रताचा गणपती बसवावा . दोन गणेशस्थापणा एकाच घरात करू नये .


*अशोककाका कुलकर्णी*


*( कुणालाही याबद्दल काही शंका असल्यास संपर्क करावा .)*

*९०९६३४२४५१*

 आगामी काळात प्रशासकीयपोलीस व महसूल सेवांमध्ये

महिलांचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक असेल: राज्यपाल

 

            मुंबई, दि. 20 : भारतात महिलांनी हजारो वर्षे अन्याय व कष्ट सहन केले. परंतु काळ बदलला असून आज अंतराळवीर,  वैमानिकसैन्यदलातील अधिकारी झाल्या आहेत. आगामी काळात भारतीय प्रशासकीय सेवापोलीस सेवामहसूल सेवा आदी भारतीय सेवांमध्ये महिलांचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक असेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी  व्यक्त केला.

            समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 9 महिलांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात स्त्री शक्ती सन्मान’ प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.  अभियान’ या सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            मातृशक्तीचे जीवनात फार मोठेस्थान असल्याचे नमूद करून महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्रे तसेच अर्थ विषयक वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला लेखिका लिखाण करताना दिसतातही आपल्याकरिता सुखद बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्या नफिसा हुसैनसमाजसेविका व माजी सरपंच देवकी डोईफोडेधावपटू मैथीली अगस्ती,  दिव्यांग जलतरणपटू जिया रायमहिला उद्योजिका स्वाती सिंहसाप्ताहिक विवेकच्या संपादिका अश्विनी मयेकरअभिनेत्री राजेश्वरी सचदेवहिंदी साहित्यिक डॉ. भारती गोरे व पार्श्वगायिका रीवा राठौड यांना स्त्री शक्ती सन्मान देण्यात आला.

            कार्यक्रमाला आमदार आशिष शेलारउद्योजक विनीत मित्तल व अभियानचे अध्यक्ष अमरजीत मिश्र उपस्थित होते.

0000

 

Governor presents Stree Shakti Samman to women achievers

 

      Mumbai, 20 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Stree Shakti Samman’ to nine women achievers from various walks of life at Raj Bhavan, Mumbai on Friday (20th Aug).

      Former Member  of National Commision for Women Nafeesa Hussain, Divyang swimmer Jiya Rai, entrepreneur Swati Singh, Athelete Maithali Agasti, playback singer Reewa Rathod, film star Rajeshwari Sachdeva, Hindi writer Dr Bharti Gore, former Sarpanch Devki Doiphode and editor of weekly ‘Vivek’ Ashwini Mayekar were felicitated by the Governor on the occasion.

      The felicitation was organised by ‘Abhiyan’ a social and cultural organization. MLA Ashish Shelar, industrialist Vinit Mittal and Founder of ‘Abhiyan’ Amarjeet Mishra were present.

0000

 🙏🏻 *गुळवेल हे वरदान व राष्ट्रीय औषध म्हणून जाहीर केले त्याबद्दल उपयुक्त माहिती...*


🙋🙏🏻


🙋‍♂🌴🙋🙋‍♂🌴🙋🙋‍♂👇🏻

👇🏻👇🏻


गुळवेल 

==========

दिव्य औषधी ‘गुळवेल’ ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे. कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे. गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी करते.


 गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्‍या बारीक दोर्‍यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते.

गुळवेल ही दिसायला मनीप्लांटसारखी परंतु, अतिशय दाट अशी विशाल वेल असते. पाने हृदयाच्या आकाराची असतात. यास पिवळी फुले येतात व लाल रंगाची छोटी छोटी गोल फळे झुबक्यांमध्ये लागतात. याचे कांड रसभरीत असते, ज्याचा औषधीकरिता उपयोग केला जातो.


गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी) अशी आयुर्वेदीय समर्पक नावे आधुनिक संशोधनाने यथार्थ ठरली आहे.


गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या झाडांवर व कुंपणांवर पसरलेल्या असतात.

खोड - वेलीच्या खोडास लांब धाग्यांसारखी, हिरवी मुळे फुटून ती खाली लोंबत असतात. खोड बोटांएवढे जाड असून, त्यावरील साल पातळ, त्वचेसारखी असते, नंतर तिचे पापुद्रे निघतात. खोडांवर लहान-लहान छिंद्रे असतात. खोड आडवे कापल्यास आतील भाग चक्राकार दिसतो.

पाने - साधी, एक आड एक, हृदयाकृती. गडद हिरवी व गुळगुळीत असतात. पानांचे देठ लांब. पानांवर 7 ते 9 शिरा दिसतात व पानांची रुंदी 5 ते 10 सें.मी असते.

फुले - लहान पिवळसर-हिरवी नियमित व एकलिंगी असतात. पानांच्या बेचक्‍यातून आलेल्या लांब, नाजूक, खाली लोंबणाऱ्या पुष्पमंजिरीत येतात. नर व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. पुष्पमंजिरीत नरफुले गुच्छात तर मादी फुले एकांडी येतात. पाकळ्या सहा, पुंकेसर सहा, बीजांडकोश तीन कप्पी, पराग धारिणी तीन विभागी.

फळे - गोलाकार, मोठ्या वाटाण्याएवढी, कठीण कवची. पिकल्यावर लाल, गुच्छाने येतात. बी एक, खडबडीत कवच असणारी.

गुळवेलीला नोव्हेंबर ते जून या कालावधीत फुले, फळे येतात.

===================================================

गुळवेल प्रतिकारशक्ती तंत्रास सशक्त करते  :

शरीराचे प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास वारंवार सर्दीपडसे, ताप येणे, अशक्तपणा ही लक्षणे निर्माण होतात. गुळवेलच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. वारंवार आजारी पडणार्‍या व्यक्तींना गुळवेलामुळे फायदा होतो.

शरीरातील प्रतिकार शक्ती तंत्र  विकृत झाल्यास अनेक व्याधी निर्माण होतात. विभिन्न एलर्जीजन्य आजार उदा. तसेच . गुळवेल त्रिदोष शामक आहे. गुळवेल रोगप्रतिकार तंत्रास सामान्य करते. अशा व्याधींवर गुळवेल अतिशय उपयोगी आहे.


=================================================

* गुळवेल हे संधीवात व अन्य वात व्याधींवर उपयोगी आहे.

* गुळवेल शक्तिवर्धक व वाजीकर आहे.

* विभिन्न चर्मरोग विशेषत: अश्रश्रशीसळल ऊशीारींळींळी वर प्रभावी आहे.

* मूळव्याध, महिलांचे प्रमेहादी विकारावर उपयोगी.

* मानसिक व्याधींवर उपयोगी.

* गुळवेल रक्तातील कोलेस्टेरॉल व रक्तशर्कराचे प्रमाण कमी करते.


=================================================

गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात.

गुळवेल कुटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे.

ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे.

ती रक्तसुधारक असून, पित्तवृद्धीच्या काविळीत गुणकारी व त्वचारोगात उपयोगी आहे.

मधुमेह, वारंवार मूत्रवेग तसेच प्लिहावृद्धीत उपयुक्त आहे.

गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे.

गुळवेलीचे सत्त्व व काढा वापरतात. गुळवेलीचा पाण्यातील अर्क ज्वरनाशक म्हणून वापरतात. गुळवेलीचा काढा शक्तिवर्धक असून, दुर्बल करणारे रोग, खंडित ताप आणि अपचनात वापरतात. गुळवेल सत्त्व दीर्घकालीन आम्लअतिसारात वापरतात. आतड्यांचा प्रक्षोम आणि शक्ती क्षीण झालेली असताना तसेच संधिवाताची लक्षणे दूर करण्यासाठी ही औषधी वनस्पती महत्त्वाची मानली जाते.

सौम्य विषमज्वरात आणि जीर्णज्वरात गुळवेलीचा चांगला उपयोग होतो.

गुळवेलीने भूक लागते, अन्नपचन चांगले होते, रोग्याचा फिक्कटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते. कुपचन, पोटदुखी व काविळीत गुळवेल गुणकारी आहे.

ही वनस्पती त्वचारोगातही उपयुक्त आहे, यामुळे अशाची खाज व दाह कमी होतो.

==================================================


सेवन विधी :-

गुळवेलचे खोड औषधीकरिता उपयोगात आणतात. करंगळीएवढ्या जाडीचे एक फूट लांब कांड घेऊन त्यास कुटावे. त्यात ५-१० तुळशीची पाने घालावी व २ कप पाण्यात उकळावे. १/४ म्हणजेच १/२ कप होईपर्यंत आटवावे, नंतर गाळून १ चमचा मध घालून प्यावे. दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे.

बाजारामध्ये गुळवेल सत्व, अमृतारिष्ट इत्यादी नावाने गुळवेल उपलब्ध आहे, परंतु ताजी गुळवेल वनस्पती अधिक प्रभावी आहे.

मोसमी फ्लूसारख्या तापांकरिता ५-७ दिवस व अन्य व्याधींसाठी ३ आठवडे ते १/२ महिने किंवा अधिक काळाकरिता सेवन करावे.


====================================================

गुळवेलीच्या भाजीचे औषधी गुणधर्म

गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी करतात. या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगले होते.

कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ताप येऊन गेल्यानंतर गुळवेळीची भाजी खाणे फायद्याचे ठरते. कावीळ कमी होण्यास मदत होते.

मधुमेहामध्ये ही भाजी पथ्यकर आहे. साखरेचा इष्टानिष्ट परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचेवर खावी.

वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेळीची भाजी हितावह ठरते.

त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते. रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे.

कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो. तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.

===================================================

औषध उपयोगी अंगे- खोड व पाने

> मात्रा - वाळलेले खोड  व पानाचे पूर्ण 1-3 चमचे दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावे.

> काढा - 4-8 चमचे दिवसातून 2-3 वेळा घेऊन वर पाणी प्यावे.

> गुळवेल सत्त्व - पाव ते अर्धा चमचा दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावी.

====================================================

उपयोग


हृदयरोगात उपयोगी - गुळवेलीमुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध लोकांनी व हृदयविकाराच्या रुग्णांनी गुळवेलसत्त्व किंवा अमृतारिष्ट घ्यावे.

 मुरलेल्या जुन्या तापामध्ये- गुळवेलसत्त्व फार गुणकारी ठरते.

 यकृतविकार, कावीळ- गुळवेलसत्त्व अर्धा चमचा अधिक हळद अर्धा चमचा अधिक मध 1 चमचा दिवसातून 3-4 वेळा देणे.


मधुमेहात उपयुक्त - गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते. तसेच मधुमेहामध्ये होणारे मज्जादाह(न्यूरायटिस), अंधत्व (आॅप्टिक न्यूरायटिस) इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते.


शुक्रधातूवर्धक (व्रण्य)- स्त्री-पुरुषांच्या जननसंस्थेच्या विकारावर गुळवेल फार उपयोगी आहे. गुळवेलीचे चूर्ण घेऊन वर दूध साखर घ्यावे.


 रसायन कार्यासाठी - प्रत्येकाने दररोज सकाळ व संध्याकाळ 1-1 चमचा घेऊन वर गाईचे दूध पिल्यास आरोग्य चांगले राहून तारुण्याचे रक्षण होते. मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमधील प्रा. डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी केलेल्या संशोधनात गुळवेलीमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते व निरोगी राहते असे आढळून आले आहे.


पंडुरोग रक्तक्षय- गुळवेल रक्त घटक वाढवते. गुळवेलसत्त्व वा अमृतारिष्ट घ्यावे.

 

 मानसिक ताणतणाव कमी होतो- गुळवेलीमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. असे आता अधुनिक शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाले आहे. गुळवेलीचा परिणाम अ‍ॅड्रिनल या अंत:स्रावी ग्रंथीवर होऊन त्या ग्रंथीच्या अ‍ॅड्रिनॅक्लीज या अंत:स्रावावर नियंत्रण येते. या अंत:स्रावामुळे यकृतातून रक्त प्रवाहात जी शर्करा मिसळली जाते. गुळवेलीमुळे इन्शूलिन या अंत:स्रावाची शर्करेवर चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्तामधील साखरेचे नियंत्रण राखले जाते. त्याचा मधुमेहीला चांगलाच उपयोग होतो.

===================================================

गुळवेलीचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्व थोडक्यात-


 यकृतोत्तेजक कार्य - यकृत हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. सुमारे 500 महत्त्वाची कार्ये व 1000 विविध पाचक स्राव निर्माण करणारे शरीरातील हे एकमेव इंद्रिय आहे. गुळवेलीमुळे यकृताचे कार्य चांगले होऊन आपले आरोग्य चांगले रहाते, कारण यकृतामुळे शरीराच्या सर्वच अवयवांचे कार्य सुधारते.


 हृदय कार्य - गुळवेलीमुळे हृदयाचे रक्ताभिसरण सुधारतेच, शिवाय मानसिक ताण कमी होत असल्याने सध्याच्या तणाव युगातील (stress-age) सततच्या मानसिक ताणतणावामुळे हृदयावर होणारे दुष्परिणामही टळून हृदय बळकट बनते.


 रसायन कार्य - आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यामुळे गुळवेलीचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. म्हणूनच आपण प्रत्येकाने अगदी तुळशीप्रमाणेच गुळवेलही आपल्या परसात लावून दररोज गुलवेलीची ताजी 4-6 पाने चावून खावीत. ते शक्य नसल्यास गुळवेलसत्त्व खात्रीच्या जुन्या आयुर्वेदिक कंपनीचेच वापरावेत, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. दररोजच्या गुळवेलीच्या सेवनाने आपले तारुण्यरक्षण होऊन म्हातारपण दूर राहीलच, पण व्याधीचाही प्रतिकार होऊन शरीर निरोगी, सतेज राहील यात शंका नाही.

===================================================

ज्वरघ्न गुळवेल :-

गुळवेलचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म ती ज्वरनाशक, ज्वरध्न आहे. गुळवेल ही डेंग्यू, चिकन गुनिया, फ्लू, स्वाईन फ्लू इत्यादी विभिन्न व्हायरल इन्फेक्शन वर रामबाण औषधी आहे. मागील वर्षी दिल्लीमध्ये डेंग्यू तापाची साथ पसरली होती. तेथील द्वारका या वसाहतीतील उदाहरण उल्लेखनीय आहे. या वसाहतीतील शेकडो कुटुंबांमध्ये डेंग्यूचा प्रकोप झाला. डेंग्यूने फणफणणारा १०४ फॅ.पर्यंतचा ताप, संपूर्ण अंगात विशेषत: सांध्यात भयंकर वेदना होत्या. रक्ताची चाचणी केली असता डेंग्यू असल्याचा रिपोर्ट आला. त्याच वसाहतीमध्ये बाबा रामदेवांचे पतञ्जली योग केंद्र कार्यरत होते. त्यांच्या प्रमुखांनी सर्वांना गुळवेल घेण्याचे सुचविले. तसेही डेंग्यू किंवा तत्सम व्हायरल तापांसाठी आधुनिक वैद्यक शास्त्रात औषध नाही आणि समाधानाची बाब म्हणजे सर्वांना आराम मिळाला. अशा व्हायरल तापाने ग्रस्त अनेक रुग्णांचा केवळ गुळवेलमुळे आजार दूर झाल्याचा अनुभव आहे.

डेंग्यूसारख्या व्हायरल तापामध्ये रुग्णांच्या रक्तातील श्‍वेत रक्तपेशी प्लॅटिलेट्‌स  चे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. अशा रुग्णांना प्लाझ्मा  रक्तघटक दिल्या जातो. परंतु अशा रुग्णांना गुळवेल दिल्यास त्यांच्या श्‍वेत रक्तपेशीव प्लॅटिलेट्‌स लवकर सामान्य होतात.

===================================================


कॅन्सर व गुळवेल :-

कॅन्सरवर गुळवेलच्या संशोधनाचे परिणाम आशादायी आहेत. कर्करोगाच्या रुग्णास किमोथेरपी  चिकित्सा सुरू असताना त्याचे दुष्परिणाम  अतिशय कष्टदायक असतात. मळमळ, उलट्या, तोंडास फोडे येणे, भूक न लागणे, शरीराचा दाह होणे, अशक्तपणा इ. दुष्परिणाम भोगावे लागतात. मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलने केलेल्या संशोधनाद्वारे हे तथ्य समोर आले आहे की, अशा रुग्णांना गुळवेल दिल्यास वरील दुष्परिणाम कमी होतात व रुग्ण लवकर बरा होतो.


====================================================


बाजारात मिळणारी गुळवेलीची औषधे -


अमृतारिष्ट, गुडुच्यादी चूर्ण, गुडुच्यादी क्वाथ (काढा). गुडुची लोह (पंडुरोगात अत्यंत उपयोगी) गुडुची सत्त्व. गुडुची तेल - त्वचारोग व वेदना कमी करण्यासाठी बाहेरून लावावे.

====================================================


पाककृती - गुळवेलीची भाजी

साहित्य - गुळवेलीची कोवळी पाने, चिरलेला कांदा व लसूण, तेल, तिखट. मीठ इ.

कृती - गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन, चिरून घ्यावीत. तेलात कांदा व लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यावी. नंतर त्यामध्ये चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे. वाफ देऊन भाजी शिजवून घ्यावी.

🙏🏻 🙏🏻  *🎙आपल्या सर्वांच्या चांगल्या आरोग्यासह  महत्वपुर्ण माहितीस्तव*🙏🏻...👉🏻👈🏻

*वसंत कोलते*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

Featured post

Lakshvedhi