कडू गोळी चावली नाही गिळली जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल..._
"देवाने सर्वांना आयुष्य
हिऱ्यासारखं दिलंय,
फक्त एक अट घातलीये
जो झिजेल तोच चमकेल...!"
देवाला आपण घाबरले नाही तरीही
चालेल पण आपण आपल्या कर्मा
पासून घाबरून रहा,
कारण ,
शिव्या किंवा ओव्या,
शाप किंवा आशिर्वाद,
निंदा किंवा स्तुती,
सुख किंवा दुःख ,
यापैकी ,जे आपण दुस-याला देऊ ते
न चुकता परत आपल्याकडे येणार
हा चैतन्यशक्तीचा स्वभावधर्म म्हणजेच
निसर्गाचा नियम आहे व या नियमाला
देव पण चुकलेला नाही..











