Thursday, 6 June 2019

नातं कोणतंही असो

नातं कोणतंही असो

मतभेद कितीही असो 

संबध तोडण्याची भाषा  

मुळीच कधी करू नको

प्रत्येक माणूस वेगळा 

विचारसरणी वेगळी

मनुष्य जन्मा तुझी 

कहाणीच आगळी-वेगळी


बापा सारखा मुलगा नसतो 

मुला सारखी सून नसते

नवरा आणि बायकोचे तरी

कुठे तेवढे पटत असते ?

जरी नाही पटले तरी

गाडी मात्र हाकायची

अबोला धरून विभक्त होऊन

सारीच गणितं चुकायची

काही धरायचं असतं

काही सोडायचं असतं

एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून 

एकमेकाला सोडायचं नसतं

चुकल्यावर बोलावं

बोलल्यावर ऐकूण घ्यावं

एकांतात बसल्यावर

अंतरंगात डोकवावं

राग मनात ठेवला म्हणून

कोणाचं भलं झालं का ?

बिनसावलीच्या झाडा जवळ

पाखरू कधी आलं का ?

समोरची व्यक्ती चुकली तरी 

प्रेम करता आलं पाहिजे 

झालं गेलं विसरून जाऊन 

गच्च मिठी मारली पाहिजे

स्वागत होईल न होईल

जाणं येणं चालू ठेवा 

समोरचा जरी चुकला तरी 

म्हण " खुशाल ठेव देवा !"

आयुष्य खूप छोटं आहे 

हां हां म्हणता मृत्यू येईल

प्रेम करायचं राहिलं म्हणून

शेवटी खूप पश्चताप होईल

लक्षात ठेवा नात्या पेक्षा

दुसरं काहीही मोठं नाही

आपलं माणूस आपल्या जवळ  

या सारखी श्रीमंती नाही !

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi