Thursday, 6 June 2019

10+2 TECHNICAL ENTRY SCHME COURSE-42










11 comments:

  1. My Dear Friends,
    East or West,
    HOME is the Best
    Take some more Rest,
    Don't call any Guest
    Enjoy your home Fest,
    Don't have an outgoing Zest
    This is our life Saving Test
    So, let us be in our Nest;
    a humble Request..

    As covid is reaching Everest.🙏😊😄prateema vadke

    ReplyDelete
  2. ❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️
    *अडाण्याची हुशारी*
    जुन्या काळातील एक किस्सा ज्यावेळी नवीन ट्रॅक्टर फक्त
    मुंबईतच मिळत असे अन् मुंबईला जाण्यासाठी रेल्वेशिवाय
    पर्याय नव्हता.अशाकाळात दोन शेतकरी नगदी रक्कम घेऊन ट्रॅक्टर आणण्यासाठी मुंबईला निघाले.रेल्वेस्टेशनवर
    जाऊन तिकीट काढून रेल्वेत बसले आणि रात्री आठच्या सुमारास मुंबईत पोहोचले.स्टेशनवर उतरले, काय करावं समजेना,जवळ नगदी पैसे, कावरे बावरे होऊन इकडे तिकडे बघत होते.दुकाने सकाळी दहा वाजता उघडणार,रात्री पैसे घेऊन कोठे झोपायचे? आता काय करावं हा विचार मनात करत होते.असा विचार करता करता ते बाहेर पडण्यासाठी गेटजवळ आल्यावर त्याने जोडीदाराला सांगितले की तू गप्प बस.कांही बोलू नकोस.आणि गेटजवळच्या टी.सी.जवळ जाऊन घाबरून इकडे तिकडे पाहू लागला.टी.सी.ने त्याला विचारले,"ए तिकीट दिखाव!त्याचा तो करारी आवाज ऐकून
    दोघेही गर्भगळीत झाले आणि म्हणाले नय साब तिकीट पड्या हाय! झूठ बोलता टिकिट नही निकाला,विदाऊट आया और बोलता पड्या है!चल अंदर चल जेलमे बैठ
    अभी रात के बारा बजे है,सुबह कल केस दर्ज होगा,|
    जोडीदार घाबरला पहिला त्याला म्हणाला उगं गुमान बस
    काईच बोलू नगस.टी.सी.ने त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलीसांनी त्यांना कोठडीत येऊन बसवलं.खायला
    नियमाप्रमाणे राईसप्लेट आणून दिले.आणि दोघं तट्टाड झोपले.सकाळी उठून तोंड धुवून चहा पिला दहा वाजता बरोबर टि.सी.आला आणि म्हणाला चलो
    शेतकरी म्हणाला कुठं नेताव आमाला.चलो
    विदाऊट तिकीट सफर करना गुनाह है अब तुमारे केस दर्ज होगा.टि.सी.पुढं आणि हे दोघं त्याच्या मागं!गेटजवळ आले
    टी.सी गुश्श्यात चालत होता.अवो सायब जरा थांबा की
    तशी हळूच दोन तिकिटं काढून त्याला शेतकऱ्यानं दाखवली
    . तिकीटं निरखून टी.सी.पाहू लागला आणि म्हणाला रात को क्यों नही दिखाया? शेतकरी म्हणाला साब हामारे पास इतने सारे रूपय है,हाम यहाँ नये आये हैं|कुछ भी मालूम नही रात को कहां जाएंगे,चोरो का डर|इसीलिए हमने सोचा यही सोएंगे|ऐसे तुम सोने नही देते,ईसलिए हमने दिमाग चलाया
    टि.सी.ने कपाळाला हात मारून घेतला.बाबारे तुम हमारे गुरू बन जाव हम कुछ तुमसे सीखेंगे
    शेतकरी म्हणाला धन्यवाद साहेब रातभर हमारे लिये खडा पहारा दिया और खाने को भी दिया,सुबह सुबह चा्य
    पिलायी|इतना सारा तो साले लॉजवाले भी नही करते|
    टी.सी.म्हणाला जा बाबा जा अब और दिमाग मत खा|
    मोठ्यानं हसत दोघं शेतकरी स्टेशन बाहेर पडले
    म्हणून म्हणतो शेतकऱ्यांना अडाणी अन् कमी समजायचं नाही,नाद करायचा नाय!!!
    🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

    ReplyDelete
  3. 💉 लस घेतल्यानंतर ताप का येतोय?🩺

    लस घेतल्यानंतर ताप का येतोय? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसलाय, मग काही लोकांना तो येतोय काहींना येत नाही नाही, काहींना पहिला डोज घेतल्यावर येतोय तर काहींना दुसरा डोज घेतल्यावर येतोय. काहींना दोन्ही डोज घेतल्यावर सुद्धा येत नाही, काहींना अंगदुखी पण होतेय, का होतेय असे? नक्की लस शरीरामध्ये गेल्यावर कोणती क्रिया होतेय. ताप किंवा अंगदुखी हि लसीमुळे होतेय कि अजून दुसरे काही कारण असतेय?
    या प्रश्नाच्या उत्तरसाठी आधी आपण आपल्या शरीरातील काही क्रियांची थोडक्यात माहिती घेऊ. आपल्या शरीरच्या रोजच्या काही क्रिया निश्चित असतात, जसे कि आपण जेवण करतो, त्याचे पचन होते. आपण जे जेवण घेतो ते सगळे पदार्थ शरीरच्या बाहेरचे असतात पण ते शरीराला माहित असतात तसेच त्यातील जे गरजेचे आहे (प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स) तेच आपल्या रक्तात घेतले जातात आणि नको असलेले बाहेर टाकले जातात. याउलट आपल्या शरीरात तोंडावाटे किंवा नाकावाटे धूळ गेली तर त्याविरुद्ध शरीराची लगेच प्रतिक्रिया येते जसे कि शींका येणे किंवा सर्दी होणे. याचे कारण म्हणजे धूळ हि शरीराला गरजेची नाही. तसेच काही आपल्या शरीरात व्हायरस किंवा बॅक्टरीया गेल्यानंतर होते. आपली प्रतिकारशक्तीच्या काही पेशी त्याना लगेच ओळखतात आणि त्यांची माहिती प्रतिकारशक्तीच्या इतर पेशींना देईल जाते जेणेकरून नको असलेले व्हायरस किंवा बॅक्टरीया शरीराबाहेर काढले जातील, हे काम प्रतिकारशक्तीच्या काही पेशी अँटीबॉडीज तयार करून करतात. त्याचबरोबर या शरीराबाहेरील शत्रूंचा हल्ला झाला आहे याची माहिती मेंदूला पण दिली जाते, मेंदूतील एक भाग प्रतिकारशक्तीला याच्याविरुद्धची तयार करण्याचे काम करतो. हि सर्व क्रिया वेगाने पार पडत असते. या सर्व क्रियांची माहिती रक्तावाटे शरीरातील सर्व भागांना दिली जाते, तसेच अतिशय वेगाने याची तयारी करता यावी म्हणून आपली रक्तपुरवठा करणारी यंत्रणा रक्ताचा पुरवठा वेगाने करते त्यामुळे काही वेळांसाठी आपला रक्तदाब सुद्धा वाढतो. अचानक अशा प्रकारची परिस्थिती उध्दभवल्यामुळे प्रतिकारशक्ती आणि मेंदू एकत्रितपणे काम करून शरीराचे तापमान वाढवतात जेणेकरून बाहेरून आलेला शत्रू यामुळे विचलित होऊन तो निघून किंवा त्याचे शरीरातच विघटन होईल. याला प्रतिकारशक्तीची पहिली प्रतिक्रिया असेही म्हणता येईल.
    आता लस दिल्यानंतर काय होते पाहूया. लस म्हणजे लुळे पांगळे झालेले व्हायरस-बॅक्टरीया किंवा त्यांचा एक छोटासा भाग असतो. लस टोचल्यानंतर काही क्षणातच ती रक्तात गेली कि तिथे असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींना त्याची माहिती मिळते. लगेचच वर सांगितल्याप्रमाणे क्रिया होण्यास सुरवात होते, कारण रोगप्रतिकारक शक्ती लसीमधील व्हायरस किंवा बॅक्टरीयाच्या घटकांना बाहेरूनच आलेले शत्रू म्हणून ग्राह्य धरते.
    लसीमध्ये असलेले घटक जसे जसे रक्तात मिसळत किंवा शरीभर पसरले कि शरीराची म्हणजेच रोगप्रतिकारकशक्ती आणि मेंदूची प्रतिक्रिया म्हणजेच ताप यायला सुरवात होते, काही वेळांसाठी मग रक्त वेगाने शरीरात फिरू लागते आणि रक्तदाब वाढतो त्यामुळे अंगदुखीला सुरवात होते. या सर्व क्रिया प्रतिक्रिया काही तासांपासून ते दोन-तीन दिवस चालू राहतात आणि एखादा का लसीतील घटकांची प्रतिकारक शक्तीला ओळख झाली आणि अँटीबॉडीज तयार व्हायला सुरवात झाली कि ताप अंगदुखी कमी व्हायला सुरवात होते. साधारणपणे सर्वच प्रकारच्या लसींना यायचं प्रकारची प्रतिक्रिया शरीराकडून मिळते. काही लोकांना तीव्र प्रतिक्रिया मिळते तर काहींना सौम्य मिळते. लहान मुलांना सुद्धा सर्व प्रकारच्या लसी दिल्यानंतर हा त्रास होतो. पण एकच लस अनेकवेळा दिली तर प्रत्येकवेळी हा त्रास होत नाही कारण आपल्या प्रतिकारकशक्तीकडे याची मेमरी तयार झालेली असते आणि शरीर लगेच ओळखतेकि हि पूर्वीचीच लस किंवा व्हायरस-बॅक्टरीया आहे. जसे कि पोलिओची लस वर्षातून दोन वेळा दिली तरी मुलांना कोणताही त्रास होत नाही. कारण त्या लसीची मेमरी पहिल्याच डोसनंतर मुलांच्या प्रतिकारशक्तीकडे तयार झालेली असते.
    एप्रिल महिन्याच्या सुरवातीला आलेल्या रिपोर्टनुसार जगामध्ये जवळपास ३५% लोकांना लस घेतल्यानंतर ताप आलेला आहे तर ८५% लोकांना लस घेतलेल्या ठिकाणी एकदोन दिवस दुखले आहे तर १५% लोकांना संपूर्ण अंगदुखी झालेली आहे. १०% लोकांना सर्दी आणि पोटात सुद्धा दुखले आहे. तर ज्या लोंकाना काही ऍलर्जी आहे त्याना लगेच चक्कर येणे आणि अंगाला घाम येणे असे प्रकार घडले आहेत पण ते तुरळक आहेत.
    *या सगळ्यांचा अर्थ एकच होतो तो म्हणजे लस घेतल्यानंतर ताप-अंगदुखी म्हणजे तुमच्या शरीराने लसीचे स्वागत करून तिच्याविरुद्ध प्रतिक्रिया देऊन भविष्यात येणाऱ्या खऱ्या व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे काम सुरु केले आहे.*

    🖊 *नानासाहेब थोरात*
    वरीष्ठ संशोधक,
    ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन

    ReplyDelete
  4. *उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात. घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू*

    मुंबई :‘कोरोना’ (Coronavirus) रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने रात्री उशिरा जारी केला आहे. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रूग्णालयांवर सरकारी अंकुश प्रस्थापित झाला आहे.

    धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या खासगी अथवा सामाजिक संस्थांच्या रूग्णालयांसाठी हा आदेश लागू राहणार आहे. ही रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

    खासगी रूग्णालये एकेका (Coronavirus) रूग्णांकडून आठ दिवसांसाठी ५ लाख, २५ लाख रुपये अशी अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळत होते. सरकारने आता या पिळवणुकीला चाप लावला आहे.

    सरकारी व महापालिकांच्या रूग्णालयांमधील जागा मोठ्या प्रमाणात व्यापल्या आहेत. त्यामुळे कोविड (Coronavirus) रूग्णांना नाईलाजाने खासगी रूग्णालयांमध्ये भरती व्हावे लागत आहे. परंतु रूग्णांच्या या मजबुरीचा गैरफायदा खासगी रूग्णालये घेत होती.

    अक्षरशः लाखो रूपये उकळले जात होते. मुख्यमंत्री उद्ध व ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. दोन्ही मंत्र्यांच्या सुचनेनुसार हा आदेश आम्ही जारी केला असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिली.

    या आदेशानुसार आम्ही खासगी रूग्णालयांसाठी अत्यावश्यक सेवा कायदाही (मेस्माही) लागू केला आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांतील डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचारी संप करू शकत नाहीत. ही सेवा बजावणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.

    या आदेशात आपत्ती निवारण कायदाही लागू केला आहे. त्यामुळे सरकारचा आदेश खासगी रूग्णालयांनी मानला नाही, तर त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशीही माहिती सुधाकर शिंदे यांनी दिली.

    *खासगी रूग्णालयांसाठी बंधनकारक केलेले दर*
    सध्यापर्यंत खासगी रूग्णालये कोविड ( Coronavirus ) रूग्णांकडून एका दिवसासाठी ५० हजार किंवा त्यापेक्षा मनमानी पद्धतीने दर आकारत होते. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार एका दिवसासाठी जास्तीत जास्त ४ हजार, ७.५ हजार व ९ हजार रुपये अशा पद्धतीने दर आकारणी करणारे स्तर बंधनकारक करण्यात आले आहेत. आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरांनुसार सरकारने हे दर निश्चित केले असल्याचे आदेशात म्हटले आहे.

    *एका दिवसांत आदेश जारी*
    मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांनी एका दिवसांत स्वतः टाईप करून या आदेशाचा तब्बल १८ पानांचा मसुदा तयार केला. वांद्र्यावरून स्वतः गाडी चालवत ते आरोग्य सचिव, आरोग्य मंत्री यांच्याकडे गेले. त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या. त्यानंतर रात्री शिंदे मुख्यमंत्र्यांकडे गेले. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर रात्री उशिरा हा आदेश जारी करण्यात आला आहे.

    🙏🙏जाहीर आवाहन🙏🙏
    हिच ती पोस्ट जी संपुर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली आहे...आपल्यासाठी परत टाकत आहे...!
    मला खात्री आहे कि माझ्या या प्रयत्नाचा गरजूंना नक्कीच फायदा होईल.
    आपल्याला नम्र विनंती आहे कि सदरची माहीती आपण आपल्या फेसबुक,व्हाटस अप,इन्स्टाग्राम,मेसेंजर, अकाऊंट वर व्हायरल,शेअर करावी. आपल्या ओळखीच्या मंडळींना फोनवरुन ही माहीती द्यावी ही कळकळीची प्रार्थना!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    आपला नम्र
    -डॉ.सुधीर क्षीरसागर
    9822094196

    ReplyDelete
  5. कोव्हीड - 19 आपत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना विशेष अनुदान

    नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रामार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या दिव्यांग मुले व व्यक्तींची नावे नोंदणी करण्याकरीता "स्वीकार" संकेतस्थळाची www.nmmcsweekar.in निर्मिती करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दिव्यांग मुले तथा व्यक्तींकरिता कोव्हीड - 19 मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीचा हात म्हणून विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याचा कल्याणकारी निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात येत असून 31 मे 2021 पर्यंत यासाठीचे अर्ज व कागदपत्रे दाखल करावयाची आहेत.

    अन्नधान्य व आरोग्य किट खरेदी करण्याकरीता प्रति व्यक्ती रु.1221/- तसेच विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरीता अर्थसहाय्य योजनांतर्गत विशेष अनुदान रु.3000/- उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

    ज्या दिव्यांग मुले व व्यक्तींनी नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी केंद्रामार्फत सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांतर्गत सहभाग घेतलेला आहे, त्या दिव्यांग व्यक्तींच्या बँक खात्याचा तपशील व रहिवाशी दाखला ईटीसी केंद्राकडे उपलब्ध आहे. त्यामुळे अशा दिव्यांग व्यक्तींनी पुन्हा अर्ज किंवा कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या बँक खात्यामध्ये विशेष अनुदान रक्कम थेट हस्तांतरित करण्यात येईल.

    तथापि, ज्या दिव्यांग मुले व व्यक्तींनी महापालिकेच्या ईटीसी केंद्रामार्फत सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये सहभाग घेतलेला नाही, त्यांच्या बँक खात्याचा तपशील व आवश्यक कागदपत्रे ईटीसी केंद्राकडे जमा नाहीत. त्यामुळे अशा दिव्यांग व्यक्तींनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या "स्वीकार" संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरुन कागदपत्रांसह जमा करणे अनिवार्य आहे.

    अर्ज छपाईची उपलब्धता नसल्यास अर्ज ज्या स्वरुपात आहे त्या स्वरुपात कागदावर लिहून जमा करावा. पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, वास्तव्याचा दाखला अशाप्रकारची कागदपत्रे सोबत जोडावीत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्पष्ट उल्लेख असलेला पत्ता व त्यावर दिव्यांग व्यक्तीचे नाव असलेले आधारकार्ड / रेशनकार्ड / लाईटबील / मालमत्ता कर पावती/ बँकेचे खाते पुस्तक / निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत असणे आवश्यक आहे. या विशेष अनुदानाकरिता अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची अंतिम दिनांक 31 मे 2021 अशी आहे.

    नागरिकांची सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीकोनातून अर्ज व कागदपत्रे nmmcetcscheme@gmail.com यावर Online किंवा अर्ज प्रत्यक्षरित्या जमा करावयाचा असल्यास सोमवारी कोपरखैरणे व बेलापूर विभाग कार्यालयात, मंगळवारी घणसोली व नेरुळ विभाग कार्यालयात, बुधवारी ऐरोली व तुर्भे विभाग कार्यालयात व गुरुवारी दिघा व वाशी विभाग कार्यालयात सुरक्षित अंतराच्या नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करुन अर्ज जमा करावयाचा आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील ईटीसी केंद्राचे रुगपांतर कोव्हीड केअर सेंटरमध्ये करण्यात आलेले असल्यामुळे त्याठिकाणी अर्ज सादर करण्यास येऊ नयेत असे सूचित करण्यात येत आहे.

    तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त दिव्यांग मुले व व्यक्तींनी या विशेष अनुदानाचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

    ReplyDelete
  6. गटारात गेलेला बॉल तीन-चार वेळा जमिनीवर टप्पे आपटून किटाणूमुक्त करणारी पिढी आहोत आपण.

    _हिम्मत हारु नका. 💪_

    *#Fight Against Corona*

    ReplyDelete
  7. *टूटे हुए कांच की तरह चकनाचूर हो गए....*


    *तुम को चुभ ना जाए इसलिए हम तुम से दूर हो गए...*share. Sami Tambadkar

    ReplyDelete
  8. 🌹⚜🌸🔆🌅🔆🌸⚜🌹

    *꧁ 🌻आनंदी पहाट🌻 ꧂*

    *सर्वश्रेष्ठ दानाची*

    ⚜⚜⚜
    *जागतिक दृष्टिदान दिन*
    ⚜⚜⚜

    💞🔆🥀👁️❣️👁️🌸🔆💞

    *जगात भलेही कुणाचा कुणावर विश्वास नसेल पण परमेश्वराचा मात्र त्याने जन्म दिलेल्या मानवी समुहावर नितांत विश्वास आहे.*
    *जग विविधतेने भरलेले आहे. जगात काहींना दृष्टी पासून वंचित राहावे लागते. पण मानवी सहृदयतेवर परमेश्वराला विश्वास असतो की या बांधवांना ते नित्य जीवनात वेळोवेळी मदत करतील.*
    *विज्ञानाने हे अंधत्व दूर व्हावे म्हणून शोध लावला. चांगली दृष्टी असणाऱ्याच्या मृत्यूनंतर काही तासात नेत्रदान केले तर अंधांच्या जीवनाची पहाट आनंदी होवू शकते. यामध्ये कोणताही धोका नाही*
    *समाजात गावोगाव ही नेत्रदान चळवळ सुरु आहे. कॉर्निया प्रत्यारोपणाने अंध व्यक्ती हे जग बघू शकतात. आपण भरुन दिलेल्या स्वेच्छा नेत्रदान पत्राप्रमाणे हे नेत्रदान अर्थातच श्रेष्ठदान करुन जग सोडतानाही पुण्य कमावता येते.*
    *आज सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा 'दृष्टीदान दिन' साजरा होतो. दरवर्षी समाज जागृतीने या दृष्टीदान चळवळीला प्रोत्साहन दिले जाते. सामाजिक कार्यकर्ते नेत्रदान जनजागृती अभियान राबवितात, तरीही होणारे मृत्यू आणि त्यानंतर होणारे नेत्रसंकलन यामध्ये मोठी तफावत आहे.*
    *ही तफावत कमी करण्यास मृत्यूनंतरची नेत्रदान प्रक्रिया सुलभ आहे हे प्रबोधन हवे. नेत्रदानाचा संकल्प करा.. मृत्युंजय बना.. आपल्या डोळ्याद्वारे एखाद्यास आपल्या डोळ्यांनी जगाचे सौंदर्य बघू द्या. यासाठी जनजागृती करायची.*
    *डोळस असो वा अंध मानवी भावभावना.. भरारीची स्वप्न समानच. प्रेम हे कधीच आंधळे नसते तर विश्वासावर अवलंबून असते. जसा भक्त ईश्वराला न बघताच भाविकतेने त्याच्यावर प्रेम करतो.. नदी सागराला न बघता त्याच्यावर प्रेम करते आणि एकदिवस तिथवर पोहोचतेच तसे हे प्रेम.*
    *मग नेत्रदानाने जर एखाद्याला आपल्या प्रियकराचे प्रत्यक्ष रुप बघायला मिळाले, तर त्याच्या एवढा जगात आनंद दुसरा कुठलाही असूच शकत नाही.*

    🌹🔆🥀👁❣👁🥀🔆🌹

    *_तुला पाहते रे, तुला पाहते_*
    *_तुझी मूर्त माझ्या उरी राहते_*
    *_तुला पाहते रे, तुला पाहते_*
    *_जरी आंधळी मी तुला पाहते !_*

    *_तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे_*
    *_तुझ्या हासण्याने मनीं प्रीत जागे_*
    *_तुझ्या गायने मी सुखी नाहते !_*

    *_किती भाग्य या घोर अंधेपणीही_*
    *_दिसे स्वप्‍न झोपेत, जागेपणीही_*
    *_उणे लोचनांचे सुखे साहते !_*

    *_कधी भक्त का पाहतो ईश्वराला ?_*
    *_नदी न्याहळी का कधी सागराला ?_*
    *_तिच्यासारखी मी सदा वाहते !_*

    🌺🥀🌸🌿🌺🌿🌸🥀🌺

    *गीत : ग. दि. माडगूळकर* ✍
    *संगीत : सुधीर फडके*
    *स्वर : आशा भोसले*
    *चित्रपट : जगाच्या पाठीवर (१९६०)*

    🎼🎶🎼🎶🎼 🎧

    *👁️ !! नेत्रदान श्रेष्ठ दान !! 👁️*

    *!! नियम पाळा, सुरक्षित रहा !!*

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
    *१०.०६.२०२१*

    🌻🥀🌸🌹🤝🌹🌸🥀🌻

    ReplyDelete
  9. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन



    मुंबई, दि. 15 : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 1 जून 2021 पासून MHRD (www.mhrd.gov.in) या संकेतस्थळावरील http://nationalawardstoteachers.education.gov.in/newuser.aspx या लिंकवर नावनोंदणी सुरु झालेली आहे.

    शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (नपा/मनपा/जिप) मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळा (प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक) शाळांमधिल शिक्षक, पात्र मुख्याध्यापक ऑनलाईन आवेदन भरण्यास पात्र आहेत.

    इच्छुक शिक्षकांनी दिनांक 20 जून 2021 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालय यांनी केले

    ReplyDelete
  10. *जय भारत,जय महाराष्ट्र*🇹🇯 एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....*
    *कारण.... दुस-यातला चांगले पणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.*
    *आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!!*

    *शुभ िदन* 🌺🍃🌺🍃lakshvedhimm. blogspot. com, 📞9876824365 mail. lakshvedhimm @gmail.com 👏🤘✊🤟👆🤛

    ReplyDelete
  11. प्रत्येकाने आपल्या निवासी तसेच कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करावे

    - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

    म्हाडा कार्यालय परिसरात मिनी फॉरेस्टचा शुभारंभ



    मुंबई, दि. 1 : राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपण राहत असलेल्या परिसरात तसेच कार्यालयांनी त्यांच्या परिसरात शक्य असेल त्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

    माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्व प्रकारची कार्यालये, गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात निसर्ग उपवन (मिनी फॉरेस्ट) निर्माण करावे या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वांद्रे येथील म्हाडा कार्यालय परिसरात मिनी फॉरेस्ट निर्माण केले जात आहे. राज्यात आजपासून सुरू होत असलेल्या वन महोत्सवाच्या निमित्ताने या मिनी फॉरेस्टचा शुभारंभ श्री.ठाकरे यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

    ‘मिशन ग्रीन मुंबई’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या मिनी फॉरेस्टची निर्मिती करण्यात येत असून येथे वाहनांच्या पार्किंगच्या सुमारे दोन हजार चौ. फूट जागेत ४० प्रकारची ३०० झाडे लावण्यात येत आहेत. श्री.ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून यात योगदान देणाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.

    यावेळी माध्यमांशी बोलताना श्री.ठाकरे म्हणाले, नुकतेच कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले तापमान हे वातावरणात होणाऱ्या बदलाचे संकेत आहेत. महाराष्ट्रातही वातावरणीय बदलांचे परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. हे का घडत आहे त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून त्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी केले.

    मुख्यमंत्री निधीसाठी ३१ लाखांची मदत

    सध्या महाराष्ट्र विविध संकटांचा सामना करीत आहे. या परिस्थितीत शासनाला मदत म्हणून म्हाडाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून जमा केलेल्या ३१ लाखांचा धनादेश श्री घोसाळकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मंत्री श्री.ठाकरे यांच्याकडे यावेळी सुपूर्त केला.

    ReplyDelete

Featured post

Lakshvedhi