Thursday, 6 June 2019

सामुहिक हिंसा (Mob Violence) आणि सामुहिक अत्याचार (Mob Lynching) याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना.


सामुहिक हिंसा (Mob Violence) आणि सामुहिक अत्याचार (Mob Lynching) याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना.

महाराष्ट्र शासन
गृह विभाग,
शासन निर्णय क्रमांक : संकिर्ण-०८१८/प्र.क्र. २५४/विशा-१अ
२ रा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : १३ ऑगस्ट, २०१८.
परिपत्रक :
     तहसीन पुनावाला यांनी मॉब लिचिंगच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय येथे रिट याचिका क्र. ७५४/२०१६ दाखल केली आहे. त्या अनुषंगाने दिनांक १७.७.२०१८ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. सदरहू आदेशातील परिच्छेद क्रमांक ४० मध्ये केंद्र शासन व संबंधीत राज्य शासन व इतर यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर निर्देश दिले आहेत. सदर निर्देशातील राज्य शासनाशी संबंधीत बाबी संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

अ)   प्रतिबंधात्मक कारवाई :
१)   मा. सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक यांना त्यांचे जिल्ह्यामध्ये नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यांत येत आहे. सदरहू नोडल ऑफीसर यांना मदत करण्यासाठी त्यांचे जिल्ह्यातील एक पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिका­यांना सामुहिक हिंसा (Mob Violence) आणि सामुहिक अत्याचार (Mob Lynching) याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नियुक्त करण्यात येत आहे. तसेच पोलीस आयुक्त यांच्या कार्यकक्षामध्ये संबंधीत परिमंडळाचे पोलीस उप आयुक्त यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात येत आहे व त्यांच्या मदतीसाठी संबंधीत परिमंडलातील एका सहायक पोलीस आयुक्तीची त्यांना मदतनीस म्हणून या शासन परिपत्रकान्वये नियुक्ती करण्यांत येत आहे. याबाबतच्या सविस्तर नियुक्तीचे आदेश पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी निर्गमित करावेत.
२)   अशा त­हेच्या हिंसात्मक कारवायाय कोणत्या व्यक्ती करण्याची शक्यता आहे किंवा कोणत्या व्यक्ती द्वेष पसरवणे, खोट्या बातम्यांच्या अफवा पसरवणे, प्रक्षोभक वक्तव्ये करणे अशी कृती करण्याची शक्यता आहे. अशा व्यक्ती व अशा घटना याबाबत गुप्त बातम्या/अहवाल प्राप्त करण्यासाठी नोडल ऑफीसरनी एक विशेष कृती दल स्थापन करावे.
३)   (१)  नोडल ऑफीसर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका­यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा त­हेच्या घटना होण्याची शक्यता असलेल्या भागाबाबत अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यांत याव्यात.
(२)  नोडल ऑफिसर यांनी जिल्ह्यातील स्थानिक गुप्तचर विभागाबरोबर महिन्यांत किमान एक याप्रमाणे नियमितपणे बैठका घ्याव्यात. सदर बैठकांमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना बोलाविण्यांत यावे. गुंडगिरी करणारे, जमावाने हिंसाचार करणारे किंवा कायदा हातात घेणारे अशा व्यक्ती ओळखून काढणे, प्रक्षोभक प्रचार करणा­या साहित्याच प्रचार थांबविणे किंवा अशा त­हेच्या गोष्टी थांबविणे यासाठी या बैठकीत नोडल ऑफीसरनी मार्गदर्शन करावे. यासाठी विविध सामाजिक प्रसार माध्यमाचा किंवा अन्य प्रकारचा वापर करावा.
(३)  कोणत्याही जाती किंवा जमाती यांना अशा हिंसाचाराचे लक्ष केले जात असेल तर अशा त­हेचे वातावरण नष्ट करण्यासाठी नोडल ऑफीसर यांनी योग्य निर्णय घेऊन कार्यवाही करावी.
(४) अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी नोडल ऑफीसर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील यांची मदत घ्यावी.
४)   एखादा समूह/गट यांची हिंसक प्रवृत्ती आहे किंवा कायदा हातात घेऊन हिंसा घडविण्याची त्याची प्रवृत्ती आहे असे मत एखाद्या पोलीस अधिका­यांचे झाले तर भारतीय फौजदारी कायदा कलम १२९ अंतर्गत आपले अधिकार वापरुन अशा समुहाला/गटाला इतस्तत: पांगविणे ही सदर अधिका­यांची जबाबदारी राहील.
५)   भुतकाळातील घटना लक्षात घेऊन तसेच पोलीसांना प्राप्त झालेला गुप्तचर अहवाल लक्षात घेऊन संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त घालण्याबाबत पोलीस महासंचालक यांनी सर्व पोलीस आयुक्त व सर्व पोलीस अधीक्षक यांना परिपत्रक काढून सुचना द्याव्यात. अशाप्रकारे गस्त घालण्यामध्ये गांभीर्य असावे की, ज्यायोगे उपरोक्त गुन्ह्यांमध्ये सामील होणारे सामाजिक तत्वे कायद्याच्या चौकटीमध्ये राहतील व त्यामुळे त्यांना कायदा हातात घेण्याचा विचार करण्याची सुध्द्‌ा भिती वाटेल.
६)   जमावाने हिंसा करणे किंवा कायदा हातात घेणे याचा परिणाम कायद्यांतर्गत अत्यंत गंभीर होईल अश अर्थाच्या सुचना जिल्हा पातळीवर प्रसार माध्यमांद्वारे द्याव्यात. तसेच नोडल ऑफीसरने त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटलांची बैठक घेऊन सदर सूचना पोलीस पाटलांनी त्यांच्या गावांत देण्याबाबत सूचना द्याव्यात.
७)   प्रक्षोभक व बेजबाबदार संदेश व चित्रफिती विविध त­हेच्या सामाजिक संकेतस्थळावर प्रदर्शित करुन किंवा सामूहिक हिंसा व कायदा हातात घेण्याच्या घटना करण्यास प्रवृत्त करणा­यांना आळा घालण्यासाठी नोडल ऑफीसरने कार्यवाही करावी.
८)   सामुहिक हिंसा किंवा कायदा हातात घेण्याच्या घटना घडण्यास जबाबदार असणा­या व्यक्ती, बेजबाबदार संदेश किंवा चित्रफिती सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित करणा­या व्यक्तींविरुध्द्‌ भारतीय दंड विधान संहिता कलम १५३ (अ) किंवा इतर संबंधीत कलमांतर्गत प्रथमदर्शनी अहवाल (तक्रार) पोलीसांनी दाखल करावा.
ब)   उपाययोजना :
१)   प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्द्‌ा जर जमावाच्या सामुहिक हिंसेच्या घटना घडल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले तर ज्या ठिकाणी अशी घटना घडली ते स्थळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येते त्या पोलीस ठाण्याने भारतीय दंड विधार संहिता किंवा अन्य कायद्यांतर्गत प्रथमदर्शनी अहवाल (तक्रार) विनाविलंब दाखल करावा.
२)   ज्या पोलीस ठाण्यामध्ये असा प्रथमदर्शनी अहवाल (तक्रार) दाखल झाला आहे अशा पोलीस ठाण्याच्या मुख्य पोलीस अधिका­यांनी सदर घटनेची माहिती संबंधीत जिल्हा नोडल ऑफिसरना त्वरीत द्यावी. सदर घटनेमधील पिडीत व्यक्ती किंवा त्यांच्या कुटूंबियांना आणखी काही त्रास होऊ नये याची काळजी नोडल ऑफिसर यांनी घ्यावी.
३)   अशा त­हेच्या घटनांचा तपास हा नोडल ऑफिसर यांच्या देखरेखेखाली करावा. सदर तपास हा कार्यक्षमरित्या व परिणामकारक झाला पाहिजे व त्याबाबतची प्रथमदर्शनी तक्रार कायद्याने विहित केलेल्या मुदतीच्या आंत दाखल केली गेली पाहिजे. तसेच हा तपास तक्रार झाल्यानंतर किंवा संशयितांना अटक झाल्यानंतर कायद्याने विहित केलेल्या मुदतीच्या आंत करावा. ही जबाबदारी नोडल ऑफिसर यांची राहील.

२)   मा. सर्वोच्च न्यायालय यांनी रिट याचिका क्रमांक ७५४/२०१६ मध्ये दिनांक १७.७.२०१८ रोजी दिलेल्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याची सर्व नोडल ऑफिसर यांनी कृपया योग्य ती दक्षता घ्यावी. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या सदर आदेशाची प्रत सोबत जोडली आहे.
३.   उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करण्यास पोलीस अधिका­यांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे आवश्यक ती कारवाई करण्यांत येईल.
४.   सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आला असून त्याचा संकेतांक २०१८०८१३१६२७३२३९२९ असा आहे.  हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यांत येत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
                                            (भा.बा. इंगळे)
                                      कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

कारागृहातील बंद्यांच्या वकीलभेटी / मुलाखतीबाबतची कार्यपध्दती अवलंबण्याबाबत.

कारागृहातील बंद्यांच्या वकीलभेटी / मुलाखतीबाबतची कार्यपध्दती अवलंबण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : जेएलएम-१३१६/प्र.क्र.८(भाग-१)/तुरूंग-२
मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १४ जून, २०१७

वाचा :-
१-   उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका क्र. ४६/२०१५ व १६७/२०१५ मध्ये मा. उच्च न्यायालयाचे दि. ०१/०३/२०१७ रोजीचे आदेश.
२-   अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा यांचा दिनांक १२/०६/२०१७ चा ईमेल संदेश.

परिपत्रक :-
     राज्यातील कारागृहात बंद्यांना देण्यात येणार्‍या विविध सोयी सुविधा / अडचणी या संदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्र. ४६/२०१५ व १६७/२०१५ मध्ये मा. उच्च न्यायालयान दि. ०१/०३/२०१७ रोजी पारित केलेल्या आदेशाचे अनुषंगाने वकीलांनी कैद्यांना भेटण्यासंदर्भात शासन स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित करणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्र कारागृह नियमावली मधील प्रकरण क्र. ३१. Facilities to Prisoners, नियम क्र. ५ (ii) नुसार बंद्यांना वकील भेट/मुलाखतीची तरतूद आहे. तथापि भेटीच्या वेळे संदर्भात त्यामध्ये तरतूद नसल्याने या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व कारागृहातील बंद्यांना वकील भेटीसंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत :-
१-   वकीलांनी विहित नमुन्यात भेटीचा अर्ज करावा व त्यासोबत बार असोसिएशनच्या ओळखपत्राची छायांकित प्रत जोडावी.
२-   वकीलांनी आपले ओळखपत्र संबंधीत अधिकारी / कर्मचारी यांना दाखवावे.
३-   वकील भेटीचा अर्ज त्याच दिवशी सकाळी ८.०० ते ९.०० दरम्यान मुलाखत नोंदणी कक्षामध्ये स्विकारले जातील व संगणक प्रणालीवर नोंदणी केली जाईल.
४-   कारागृह सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तपासणीच्या अधीन राहून वकीलांना मुलाखत कक्षात प्रवेश देण्यात येईल.
५-   वकील भेटीसाठी वेळ सकाळी ९.०० ते १०.३० अशी राहील.
६-   रविवार व कारागृहातील सुटीच्या दिवशी भेट बंद राहील.
२. उपरोक्त परि. १ मधील सूचना प्रत्येक कारागृहाच्या बाहेरील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात याव्यात व त्याचे काटेकोर पालन करण्यात यावे.
     सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०१७०६१४१७४८२६४९२९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
     महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
                                                  (प्रभाकर संखे)
  कक्ष अधिकारी, गृह विभाग

राज्यातील कारागृहातील कैद्यांना पुरविण्यात येणार्‍या आहार व स्वच्छेतेबाबत तपासणी करण्याकरीता समिती गठीत करण्याबाबत


राज्यातील कारागृहातील कैद्यांना पुरविण्यात येणार्‍या आहार व स्वच्छेतेबाबत तपासणी करण्याकरीता समिती गठीत करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : जेएलएम-१३१६/प्र.क्र.८/तुरूंग-२
मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १९ जून, २०१७
वाचा :-
१-   उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका क्र. ४६/२०१५ व १६७/२०१५ मध्ये मा. उच्च न्यायालयाचे दि. ०१/०३/२०१७ रोजीचे आदेश.
२-   गृह विभाग परिपत्रक क्र. जेएलएम १०१२/प्र.क्र.२०/तुरूंग-२, दि. ६ सप्टेंबर, २०१२.
प्रस्तावना :-
    राज्यातील कारागृहातील न्यायाधिन किंवा सिध्ददोष बंद्यांच्या तक्रारी व आरोप किंवा गार्‍हाण्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना उपरोक्त संदर्भ क्र. २ च्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कारागृह भेटीच्या वेळी कारागृह महानिरीक्षक, कारागृह उपमहानिरीक्षक, जिल्हा न्यायाधिश आणि मानवी हक्क आयोगाचे सदस्य यांना उपरोक्त परिपत्रकात नमूद केलेल्या बाबी पडताळणीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
    मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ मुंबई येथील जनहित याचिका क्र. ४६/२०१५ व १६७/२०१५ मध्ये दि. ०१/०३/२०१७ रोजी आदेश पारित केले आहेत या अनुषंगाने कारागृहातील कैद्यांना पुरविण्यात येणार्‍या आहार व स्वच्छतेबाबत अचानक कारागृहास भेट देऊन तपासणी करण्याकरिता आहारतज्ञ व समाज सेवक यांचा समावेश करून समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
    उपरोक्त आदेशाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे समिती गठीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे :-

अ. क्र
नाव
पदनाम
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नामनिर्देशित केलेले जिल्हा रुग्णालयाचे आहार तज्ञ
अध्यक्ष
समाजसेवक-पुरुष
सदस्य
समाजसेवक-महिला
सदस्य

२.   उपरोक्त समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील :-
१-   समितीने आदर्श कारागृह संहिता, २०१६ मधील तरतुदीनुसार बंद्यांना देण्यात येणार्‍या आहाराची गुणवत्ता, स्वयंपागृहातील आरोग्य व स्वच्छता योग्य असल्याची खात्री करण्यासाठी महिन्यातून कमीत कमी १ वेळेस अचानक भेट देऊन तपासणी करणे व
२-   अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा पुणे समितीने सदर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने उपाययोजना /कार्यवाही करणे.
३-   उपरोक्त समितीतील समाज सेवक यांचे नामनिर्देशन संबंधित जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील या क्षेत्रातील कर्यरत असलेल्या अशासकीय सेवाभावी संस्था यांचेमधून योग्य त्या व्यक्तीचे नांव नामनिर्देशित करावे. संचालक आरोग्य सेवा, मुंबई यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना जिल्हयातील समितीवर जिल्हा रूग्णालयातील एका आहारतज्ञाला अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करण्याच्या सूचना द्याव्यात.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०१७०६०६१६१४१३१७२९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
    महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.  
                                        (प्रभाकर संखे)
कक्ष अधिकारी, गृह विभाग

महिलांच्या अत्याचाराच्या विरूध्द कामगिरी करणार्या नागरीकांना “निर्भय” पुरस्कार देण्याबाबत.

महिलांच्या अत्याचाराच्या विरूध्द कामगिरी करणार्‍या नागरीकांना “निर्भय पुरस्कार देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन निर्णय क्रमांक : डीपीपी-२०१२/प्र.क्र.१०/पोल-१०
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, दुसरा मजला,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : १२ मे, २०१५

प्रस्तावना :-
     राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महिलांवर अत्याचार झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपीस कडक कायदेशीर शिक्षा करणे जितके महत्वाचे आहे त्यापेक्षा सदरचे अत्याचार रोखणे महत्वाचे आहे. महिलांवर अत्याचार होत असताना सजग व जागरूक नागरीकांनी असे अत्याचार रोखण्याकरिता सहभाग घेतल्यास महिलांमध्ये अधिक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. महिलांवर अत्याचार रोखण्यास सहभाग घेणार्‍या नागरीकांना शासनाकडून प्रोत्साहन मिळाल्यास अधिकाधिक नागरीक यामध्ये सहभागी होतील असे शासनाचे मत झाले आहे. सबब, महिलांच्या अत्याचाराच्या विरूध्द कामगिरी करणार्‍या नागरीकांसाठी शासनाच्या वतीने पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
महिलांवरील अत्याचाराविरूध्द कामगिरी करणार्‍या नागरिकांसाठी राज्य शासनाच्या वतीने “निर्भय पुरस्कार देण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
२-   सदरच्या “निर्भय पुरस्काराचे स्वरूप रक्कम रू. १ लाख रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक असे राहील.
३-   “निर्भय पुरस्काराकरिता प्रस्तावाचा नमुना, पात्रतेचे निकष व प्रशस्ती पत्रकाचे स्वरूप याबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सुचना पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी शासनाच्या मान्यतेने अंतिम कराव्यात.
४-   पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये महिलांवरील अत्याचाराविरूध्द कामगिरी केलेल्या नागरीकांची शिफारस “निर्भय पुरस्काराकरिता पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे पाठवावी.
५-   एक वर्षात महिलांवरील अत्याचाराविरूध्द कामगिरी केलेल्या नागरीकांची “निर्भय पुरस्काराकरिता शिफारस पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांनी दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत करावी.
६-   प्रत्येक वर्षामध्ये शासनाच्या वतीने “निर्भय पुरस्कार देण्याकरिता प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता खालीलप्रमाणे समितीची स्थापना करण्यात येत आहे.
 पोलीस महासंचालक                                  -    अध्यक्ष
 पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)        -    सदस्य
 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई                             -    सदस्य
७-   सदर समिती आपली कार्यकक्षा व कार्यप्रणाली स्वत: ठरवेल व प्राप्त प्रस्तावांची छाननी करून पात्र नागरिकांची “निर्भय पुरस्कारासाठी शासनाकडे शिफारस करेल.
८-   सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१५०५१३१३२८५४३८२९ हा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

                                            (द.सं.पाटील)
                                 उप सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन

वृक्ष लागवड व संगोपन कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी आणि सनियंत्रणाबाबत तालुका स्तरावर मा. आमदार महोदयांच्या आध्यक्षतेखाली स्थायी समिती गठीत करण्याबाबत





हिज मास्टर्स व्हॉइस (एच. एम. व्ही.)

मुशाफिरी कलाविश्वातली


'फ्रान्सिस बॅरॉड' हा इंग्रज चित्रकार तसा असामान्य किंवा प्रतिभावंत म्हणून मुळीच ओळखला जात नाही. पण त्याचं एक चित्र मात्र अक्षरश: अजरामर झालं !! या चित्राचं नाव होतं 'हिज मास्टर्स व्हॉइस'.


फ्रान्सिस आपल्या वडिलांप्रमाणंच चित्रकार होतं. त्याचं लंडनमध्ये एका चांगल्या महाविद्यालयात कलेचं शिक्षणही झालं होतं. त्याचा मार्क हा भाऊदेखील चित्रकारच होता. नाट्यगृहात मंचावर सेट उभे करताना सेट जिवंत करण्यासाठी योग्य त्या प्रकारे तो चित्रं रंगवायचा. हा मार्क ब्रिस्टॉलला काम करायचा आणि तिथं त्याचं एक कुत्रंही होता. या कुत्र्याचं नाव होता 'निप्पर'.


दुर्दैवानं मार्क तरुण वयातच वारला. ब्रिस्टॉलला त्याच्यासोबत एक कुत्रंही होतं. त्याची आर्थिक स्थिती तशी वाईटच होती. या मार्कचं बरंचंसं सामान आणि तो कुत्रा मग फ्रान्सिसकडं आला. या सामानात एक फोनोग्राफ आणि मार्कच्या आवाजातले काही रेकॉर्डिंग्जदेखील होते.

फ्रान्सिस कधी कधी त्या फोनोग्राफवर मार्कच्या आवाजातले रेकॉर्डिंग्ज लावायचा. आणि तो कुत्रा फोनोग्राफच्या हॉर्नकडं (त्यामधून येणाऱ्या आपल्या मालकाच्या आवाजामुळं) एकसारखं बघत राहायचा. हे दृश्य फ्रान्सिसच्या मनावर एक प्रकारचा ठसा उमटवायचं. १८८७ मध्ये मार्कचा मृत्यू झाला होता. आणि पुढं १८९५ मध्ये त्या कुत्र्यानंही प्राण सोडले.

आपला स्वर्गवासी भाऊ आणि फोनोग्राफमधून भावाचा आवाज येताना ते लक्ष देऊन पाहणारं त्याचं कुत्रं हे फ्रान्सिसच्या चित्रकार मनाला साद घालत होते. १८९८/९९ च्या दरम्यान फ्रान्सिसनं फोनोग्राफ ऐकतानाचं कुत्र्याचं एक चित्र काढलं. चित्राला शीर्षक दिलं - 'फोनोग्राफ  ऐकत आणि पाहत असताना कुत्रा'. पण नंतर त्यानं चित्राचं नाव बदलून 'त्याच्या मालकाचा आवाज' (His Master’s Voice) असं नवीन नाव दिलं.

आता   फ्रान्सिसला एक चित्र कुठंतरी विकून पैसे मिळवायचे होते. त्यानं आपलं चित्र रॉयल अकॅडेमीमध्ये प्रदर्शित करण्याचा बराच प्रयत्न केला पण त्याला काही यश मिळालं नाही. मग त्यानं आपलं चित्र नियतकालिकांमध्ये देण्याचाही प्रयत्न केला. पण तिथंही त्याचं चित्र घ्यायला कुणी हो म्हणेना. ते कुत्रं काय करतंय हे चित्र बघणाऱ्यांपैकी कुणालाच कळणं शक्य नाही असं सारे लोक त्याला सांगायचे ! पण तो काही आशा सोडायला तयार नव्हता. फ्रान्सिस 'एडिसन बेल' नावाच्या एका फोनोग्राफ बनवणाऱ्या कंपनीकडं आपलं चित्र विकण्याचा प्रयत्न करू लागला. तिथं  "कुत्री फोनोग्राफ ऐकत नाहीत" असं उत्तर त्याला मिळालं.

फ्रान्सिसनं आपल्या चित्रात फोनोग्राफच्या हॉर्नचा रंग काळा दाखवला होता. त्याला कुणीतरी सल्ला दिला की त्या चित्रात जर हॉर्नचा रंग सोनेरी (म्हणजे पितळेच्या हॉर्नचा रंग) दाखवला तर त्याचं चित्र अजून सुंदर दिसलं असतं. आणि त्यामुळं ते चित्र विकलं जाण्याची शक्यता वाढणार होती.

आता फ्रान्सिस फोनोग्राफचं पितळी हॉर्न असणारं मॉडेल शोधू लागला. नव्यानंच स्थापन झालेल्या एका 'ग्रामोफोन' नावाच्या कंपनीमध्ये तो आपलं चित्र घेऊन गेला. त्यानं तिथल्या मॅनेजरला आपलं चित्र दाखवलं आणि एक विनंती केली. त्याला काही काळासाठी त्या कंपनीतलं एक पितळी हॉर्न असणारं फोनोग्राफ चित्रासाठी मॉडेल म्हणून हवं होतं. मॅनेजरनं ते चित्र एकदा पाहिलं आणि त्याला ते चित्र विक्रीसाठी उपलब्ध आहे का ते विचारलं.फ्रान्सिसनं अर्थातच होकार दिला. खरंतर या कंपनीचा प्रॉडक्ट फोनोग्राफ नसून ग्रामोफोन होता. दोन्हींमध्ये थोडासा फरक होता. मॅनेजरनं त्याला चित्रामध्ये फोनोग्राफऐवजी ग्रामोफोन दाखवता येईल का ते विचारलं.फ्रान्सिस आपलं चित्र विकलं जावं यासाठी त्या चित्रात बदल करायला तयार होता !!


१८९९ च्या सप्टेंबर महिन्यात ग्रामोफोन कंपनीनं फ्रान्सिसला एक पत्र पाठवलं. या पत्रात एक प्रस्ताव होता. फ्रान्सिसच्या चित्रासाठी ग्रामोफोन कंपनी त्याला ५० पौंड्स आणि चित्राच्या साऱ्या स्वामित्व हक्कांसाठी त्याला अजून ५० पौंड्स द्यायला तयार होती. फ्रान्सिसनं प्रस्तावाला पटकन होकार दिला !!


१९०० च्या जानेवारीमध्ये हे चित्र ग्रामोफोनच्या जाहिरातींमध्ये सर्वत्र दिसू लागलं !!

फ्रान्सिसनं उर्वरित आयुष्याचा बराचसा भाग ग्रामोफोन कंपनीच्या मागणीप्रमाणं या चित्राच्या प्रतिकृती बनवण्यात घालवला !! फ्रान्सिसच्या मृत्यूनंतरही इतर कलाकारांनी ह्या चित्राच्या प्रतिकृती बनवण्याचं काम केलं. पुढं १९२१ मध्ये ग्रामोफोन कंपनीनं 'एच एम व्ही' (हिज मास्टर्स व्हॉइस) नावाची संगीत विकण्यासाठी दुकानं सुरु केली.

 हे 'एच. एम. व्ही.' हे त्या चित्रावरूनच आलं होतं !!

Featured post

Lakshvedhi