राज्यातील
कारागृहातील कैद्यांना पुरविण्यात येणार्या आहार व स्वच्छेतेबाबत तपासणी करण्याकरीता
समिती गठीत करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन परिपत्रक क्रमांक : जेएलएम-१३१६/प्र.क्र.८/तुरूंग-२
मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १९ जून, २०१७
वाचा :-
१- उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका क्र. ४६/२०१५
व १६७/२०१५ मध्ये मा. उच्च न्यायालयाचे दि. ०१/०३/२०१७ रोजीचे आदेश.
२- गृह विभाग परिपत्रक क्र. जेएलएम १०१२/प्र.क्र.२०/तुरूंग-२, दि. ६ सप्टेंबर,
२०१२.
प्रस्तावना :-
राज्यातील
कारागृहातील न्यायाधिन किंवा सिध्ददोष बंद्यांच्या तक्रारी व आरोप किंवा गार्हाण्यावर
करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना उपरोक्त संदर्भ क्र. २ च्या परिपत्रकान्वये देण्यात
आल्या आहेत. त्यानुसार कारागृह भेटीच्या वेळी कारागृह महानिरीक्षक, कारागृह उपमहानिरीक्षक,
जिल्हा न्यायाधिश आणि मानवी हक्क आयोगाचे सदस्य यांना उपरोक्त परिपत्रकात नमूद केलेल्या
बाबी पडताळणीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
मा.
उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ मुंबई येथील जनहित याचिका क्र. ४६/२०१५ व १६७/२०१५ मध्ये
दि. ०१/०३/२०१७ रोजी आदेश पारित केले आहेत या अनुषंगाने कारागृहातील कैद्यांना पुरविण्यात
येणार्या आहार व स्वच्छतेबाबत अचानक कारागृहास भेट देऊन तपासणी करण्याकरिता आहारतज्ञ
व समाज सेवक यांचा समावेश करून समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
उपरोक्त
आदेशाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे समिती गठीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत
आहे :-
अ. क्र
|
नाव
|
पदनाम
|
१
|
जिल्हा
शल्य चिकित्सक यांनी नामनिर्देशित केलेले जिल्हा रुग्णालयाचे आहार तज्ञ
|
अध्यक्ष
|
२
|
समाजसेवक-पुरुष
|
सदस्य
|
३
|
समाजसेवक-महिला
|
सदस्य
|
२. उपरोक्त समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील :-
१- समितीने आदर्श कारागृह संहिता, २०१६ मधील तरतुदीनुसार बंद्यांना देण्यात
येणार्या आहाराची गुणवत्ता, स्वयंपागृहातील आरोग्य व स्वच्छता योग्य असल्याची खात्री
करण्यासाठी महिन्यातून कमीत कमी १ वेळेस अचानक भेट देऊन तपासणी करणे व
२- अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा पुणे समितीने
सदर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने उपाययोजना /कार्यवाही करणे.
३- उपरोक्त समितीतील समाज सेवक यांचे नामनिर्देशन संबंधित जिल्हाधिकारी यांनी
जिल्हयातील या क्षेत्रातील कर्यरत असलेल्या अशासकीय सेवाभावी संस्था यांचेमधून योग्य
त्या व्यक्तीचे नांव नामनिर्देशित करावे. संचालक आरोग्य सेवा, मुंबई यांनी जिल्हा शल्य
चिकित्सकांना जिल्हयातील समितीवर जिल्हा रूग्णालयातील एका आहारतज्ञाला अध्यक्ष म्हणून
नामनिर्देशित करण्याच्या सूचना द्याव्यात.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या
www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०१७०६०६१६१४१३१७२९ असा आहे. हे परिपत्रक
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे
राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(प्रभाकर संखे)
कक्ष
अधिकारी, गृह विभाग
No comments:
Post a Comment