Monday, 3 June 2019

रिलॅक्स

रिलॅक्स 
आमचे एक शेजारी होते...
वय वर्षे पंच्याऐंशीं ते नव्वद....

मात्र कॉम्प्युटर अन स्मार्टफोन अगदी एखाद्या तरुणाला लाजवतील, इतक्या सफाईने वापरीत.

गेली पाच वर्षे काका अंथरूणावरच बेडरीडन होते.
(वाक्य खटकण्यासारखं आहे, रियल फॅक्ट सारखं)
पण काकांच्या अंथरुणावर त्यांचं एक
स्पेशल बेड होतं, म्हणून असा शब्दप्रयोग...

छंद फक्त एकच. स्मार्टफोन.
हल्ली त्यांना फेसबुकचा नाद लागला होता.
दर तासाला स्टेटस अपडेट करायचे.
स्टेटस तरी काय??

बीपी अमुक,.. शुगर तमुक, ...
नुकतंच दोन दिवसानंतर पोट साफ झालं,
फीलिंग फिदरी. इत्यादी इत्यादी...

झोपल्या-झोपल्या काकांनी अनेक विविध क्षेत्रातले आभासी मित्र जोडले होते...

डॉक्टर, वकील, इंजिनियर, इतकंच काय तर
मृत-सामग्री केंद्राचे मालक, वैकुंठ रथाचे ड्रायवर,
तेरा दिवसांचे काँट्रॅक्ट घेणारे, सर्व उपयोगी क्षेत्रातले लोक काकांचे आभासी मित्र होते..

रोज सकाळी मेसेंजर वर मेसेज यायचे..

"तैयारीकू लगू क्या??"

काका त्यांना ,"वेट अँड वॉच.." चा सल्ला द्यायचे..

एक मात्र विशेष मैत्रीण भेटली होती काकांना..
त्यांच्या प्रत्येक स्टेटस वर कॉमेंट करणारी..

शब्द संपले की, ती एखाद्या पायाच्या नखाने जमीन कुरतडणाऱ्या मांजरीचा फोटो टाकायची..

उत्तरादाखल काका टाळ्या पिटणारं माकड टाकायचे..

काकुला वाटायचं, आपल्याला माकड म्हणतो हा थेरडा.

ती वस्सकन फेंदारलेल्या मिश्यांची मांजर टाकायची..

एकंदरीत काय, यमराजाची वाट पाहणं सुकर झालं होतं फेसबुकमुळे..

आणि एक दिवस..
साक्षात यामराजाची फ्रेंड रिक्वेस्ट आली.
रेड्याचा व्हाट्सअप्प वर मेसेज आला..
"कमिंग टुडे..आवरतं घ्या.."

आदल्या रात्रीच काकांचं फोरजी बंद पडलं..
नियतीचे संकेत काकांना समजले..
रात्रभर बायको, मुलगा आणि सून..
गंगाजल घेऊन बाजूला बसले होते..

काका  शेवटचं स्टेटस अपडेट करत होते..
"आम्ही जातो आमुच्या गावा.."

सकाळी सकाळी काका गेले...

क्रियाकर्म आटोपले. ...

पिंडदानाचा दिवस आला.
दोन कावळे हजर होते. पण पिंडाला एकही शिवेना...

काकांच्या सर्व इच्छा पुरवायचे वचन दिल्या गेले,
पण कावळे अगदी ढिम्म...

मुलांनी काकांच्या अंगवस्त्रांना अंतर न देण्याचं वचन दिलं, पण कावळे अगदी ढिम्म..

सुनांनी त्यांना "सासूबाईंचा दर्जा देऊ.." हे मान्य केलं,
पण कावळे आपले हूं नाही की चुं नाही..

सगळे वैतागले. इतक्या समृद्ध माणसाचं मन कशात अडकलं असेल, समजायला मार्ग नव्हता..

शेवटी काकांचा नातू आला आणि म्हणाला,
आजोबा, तुमच्या अंतिम पोस्टला एकशे साठ लाइक  आले, आणि मुख्य म्हणजे तुमची
बेस्ट फ्रेंड आजी ची कॉमेंट पण आली,
"Comng Soon, B Happy"

अशी...

आणि काय आश्चर्य???

कावळ्यांचे अख्खे खानदान
पिंडावर तुटून पडले हो..

माणसे मात्र यंत्रे झाली..

घरे झाली सुबत्ता आली !
नाती मात्र फाटत गेली.. 
प्रेम, जिव्हाळा,माया, ममता
सारी सारी लुप्त झाली.

चार-चार बेडरूम्सची घरे झाली!
पण वडिल, आई वृद्धाश्रमी गेली..
आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..
सा..रे मुले विसरून गेली.. 

आजीआजोबांची नातवंडं
पाळणाघरातली children झाली
सोडायला आई, आणायला बाबा
घरच्या मायेला पारखी झाली..

प्रत्येकाची वेगळी खोली !
प्रत्येकाला 'space' झाली !
एवढ्या मोठ्ठया घरात फक्त
देवालाच जागा नाही उरली..

सारी 'extremely busy' झाली
विचारपूस करी ना कोणी..
रक्ताचीही नाती आता
WhatsApp मध्ये बंद झाली..!

Insta आणि Twitter वर
प्रत्येकाची accounts झाली !
घरातल्याच माणसांमधल्या
संवादांची होळी झाली..

हॉटेलिंगची फॅशन आली !
घरची जेवणे बंद झाली..
Modular च्या kitchen मध्ये
सगळी..बाहेरच जेवुन आली !

घरात पॉश गाडी आली ! 
अंगावर पॉश साडी आली ! 
लाखालाखांची पॅकेजेस आली !
हीच सुखाची व्याख्या झाली!

Lifestyle 'क्लास' झाली 
माणुसकी मात्र खलास झाली..
खोल्यांची संख्या वाढत गेली
माणसे मात्र कुढत गेली..

मी, मला, माझे माझे 
स्वार्थामुळे भाषा झाली..
Ego आणि freedom पायी
Divorce घ्यायची वेळ आली!

Divorce होताच order सुटली
मुलाला आई कोर्टात भेटली.!
"आई हवी की बाबा हवे ?"☝
चिमुकल्यांची मनेच तुटली..

पैशामुळे नीती गेली..
नीतीमुळे मती गेली..
अहो पैशासाठी माणसाने
दुधातही भेसळ केली ..! 

फेसबुक, गुगल, सगळे असून
का डिप्रेशन ची पाळी आली? 
प्रत्येकाला शुगर, बीपी .. 
हार्ट चीही गोळी आली ! 

इंटरनेट ने क्रांती केली ! 
मोबाईल ने जादू केली ! 
स्वत:च्याच कोषामध्ये
माणसे आता मग्न झाली.. 

माणसे जाऊन यंत्रे आली !
यंत्रांची मग तंत्रे आली ! 
यंत्रे-तंत्रे सांभाळताना
माणुसकीची फरफट झाली..

सुखं सांगायला कोणी नाही..
दु:ख ऐकायला कोणी नाही..
'Sharing' च्या या जमान्यात
माणसे मात्र यंत्रे झाली..
माणसे आता..यंत्रे झाली.....

दुष्काळ हटवायचा असेल तर प्रत्येकानं दोन रोपं लावली पाहिजेत…


रिक्षा चालक प्रकाश माने झाले वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत




मुंबई, दि. 1 : दुष्काळ हटवायचा असेल नातर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे  दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली रिक्षा अगदी अनोख्या पद्धतीने सजवली आहे. त्यांनी आपल्या रिक्षाला जिथे शक्य आहे तिथे रोपं लावून ती हिरवाईने नटवली आहे.
आपल्या या आगळ्यावेगळ्या रिक्षाबद्दल सांगताना श्री. माने म्हणालेवेगवेगळ्या रोपांनी सजवलेली माझी रिक्षा जेव्हा रस्त्यावरून धावते तेव्हा ती लोकांना खूपच आवडते. रिक्षात बसणारे लोक म्हणतातआम्हाला रिक्षात नाही तर उद्यानात बसल्यासारखं वाटतं. मनाला खूप प्रसन्नता आणि आनंद मिळतो.  लोकांच्या या प्रतिक्रिया मला खूप प्रोत्साहित करतात.
आपल्या सगळ्यांनाच झाडांची आणि निसर्गाची खूप ओढ असते. दररोजच्या धकाधकीच्या प्रवासात लोक माझ्या रिक्षात कधी पंधरा मिनिटेकधी अर्धा तास तर कधी एक तास बसतात.. मग मी त्यांना  कुठल्या प्रकारे आनंद देऊ शकतो याचा मी विचार केला आणि मग प्लास्टिकचे फुलंरंगीबेरंगी पताका लावण्यापेक्षा ती अधिक सजीवपणे उठून दिसण्यासाठी माझ्या रिक्षाला वेगवेगळ्या ठिकाणी मध्यम आणि लहान ऊंचीची १० रोपं बांधून घेतली. यात पांढरं तगर आहेजास्वंद आहेतुळस आहेमनी प्लांट आहे, कडिपत्त्याचं रोपं आहे आणि इतर ही रोपं आहेत.
माझ्या घरात आईसह माझी पत्नी आणि तीन मुलं आहेत श्री. माने सांगत होतेत्यांना सगळ्यांना झाडं लावण्याची खूप आवड आहे. आम्ही केतकीपाडा,दहिसर येथील आदिवासी पाड्यात राहातो. निसर्गाच्या सान्निध्यात राहात असल्याने झाडांची आवड होतीच.. त्यातून ही कल्पना सूचली.


लोकांना माझी रिक्षा खूप वेगळी वाटते. सिग्नल ला थांबलं तर लोक रिक्षा जवळ येऊन "सेल्फी" काढतातगाडीत बसलेले लोक गाडीतून हाताने "खूप सुंदर" असं सांगतात.  एवढच कशाला रिक्षात बसणारे लोक झाडासाठी म्हणजे रोपासाठी पैसे देतात.. म्हणतातआमच्या नावानं रिक्षात एक रोप लावा… कालच एका प्रवाशाने ५० रुपये काढून दिले म्हणालेआणखी एखादं चांगलं रोप विकत घ्या आणि रिक्षाला लावा…  अशी ही माझी रिक्षा सबसे निराली हैमाझी  वृ(रि)क्षा  राणी आहेजी वृक्ष लागवडीचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देतेलोकांना आनंद होतो आणि त्यांच्या आनंदात मी आनंदी होतो

Friday, 31 May 2019

खातेनिहाय यादी

केंद्र सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज शुक्रवारी (दि.31) मंत्र्यांची खातेनिहाय यादी अखेर प्रसिद्ध

खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे : 

▪ पंतप्रधान नरेंद्र मोदी : कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण खाते, निवृत्तीवेतन (पेन्शन), अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग. तसेच खातेवाटपानंतर जी खाती रिक्त राहतील त्याचा कार्यभारही असेल. 
▪ अमित शहा : केंद्रीय गृहखाते
▪ निर्मला सितारामन : केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
▪ राजनाथ सिंह : संरक्षण मंत्रालय
▪ एस. जयशंकर : परराष्ट्र मंत्रालय
▪ नितीन गडकरी : परिवहन 
▪ पीयुष गोयल : रेल्वे मंत्री 
▪ धर्मेंद्र प्रधान : पेट्रोलियम 
▪ रविशंकर प्रसाद : कायदा व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय
▪ स्मृती इराणी : केंद्रीय मनुष्यबळ खाते
▪ राम विलास पासवान : ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
▪ नरेंद्र सिंह तोमर : कृषी व शेतकरी 
▪ प्रकाश जावडेकर : पर्यावरण आणि माहिती प्रसारण
▪ हरसिमरत कौर बादल : अन्न प्रक्रिया उद्योग
▪ रमेश पोखरियाल निशंक : केंद्रीय मनुष्यबळ खाते
▪ थावर चंद गहलोत : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
▪ अर्जुन मुंडा : आदिवासी व्यवहार
▪ डॉ. हर्षवर्धन : आरोग्यमंत्री
▪ किरेन रिजीजू : क्रीडा
▪ मुख्तार अब्बास नक्वी :अल्पसंख्यांक मंत्री
▪ प्रल्हाद जोशी : संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री
▪ डॉ. महेंद्रनाथ पांडे : उद्योजग कौशल्य विकास मंत्रालय
▪ अरविंद सावंत : अवजड उद्योग मंत्रालय 
▪ गिरिराज सिंह : पशुसवंर्धन आणि मत्स पालन
▪ गजेंद्रसिंह शेखावत : जल मंत्रालय 

सुविचार

छोट्या गोष्टींमधून किती अर्थ बदलतो,
तुमच्याकडे कुणी बोटं दाखवली तर बदनामी
तुमच्याकडे कोणी अंगठा केला तर प्रोत्साहन
आणि अंगठा व बोट एकत्र आले तर प्रशंसा 

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१९ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकी प्रदानासंबंधी सप्ष्टीकरण








प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळाची शपथ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील मंत्रीमंडळाची शपथ; महाराष्ट्राला 4 कॅबिनेट, 3 राज्यमंत्रीगुरुवार, ३० मे, २०१९
बातमी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रीमंडळास आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित शानदार समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 9 राज्यमंत्री (स्वंतत्र प्रभार) व 24 राज्यमंत्री यांचा समावेश आहे. यावेळी ब्रेक्सिस्ट देशाचे प्रमुख, उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्यासह विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयुष गोयल आणि अरविंद सावंत यांना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली. तर रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.

याआधी वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री, जलसंसाधन मंत्री म्हणून तर पीयुष गोयल यांनी ऊर्जा मंत्रालय व कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती व प्रसारण मंत्री, पर्यावरणमंत्री आणि मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून मंत्रीपद भुषवीले आहे. तर रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाचे राज्यमंत्री म्हणून पद भुषवीले आहे. रावसाहेब दानवे यांनीही राज्यमंत्री पद भूषविले होते. अरविंद सावंत आणि संजय धोत्रे यांनी प्रथमच केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Featured post

Lakshvedhi