Sunday, 15 March 2026

पत्रकारांनी ‘एआय’कडे कौश

 मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषदेत ब्रिजेश सिंह यांनी पत्रकारितेतील एआय वापरावर केले मार्गदर्शन

पत्रकारांनी एआयकडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे

-      प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

·         एआयच्या युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची

मुंबईदि. 14 : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची क्षमता नसतेहे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहेअसे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित एआय परिषद २०२६चे उद्घाटन महासंचालक श्री. सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी एआयमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात होणारे बदलसंधी आणि आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाणउपाध्यक्ष स्वाती घोसाळकरराजेंद्र हुंजेविश्वस्त देवदास मटालेअजय वैद्यकार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. सिंह म्हणालेमानव इतिहासात ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया छपाई तंत्रज्ञानाच्या शोधानंतर मोठ्या प्रमाणावर बदलली. पूर्वी ज्ञान काही विशिष्ट गटांपुरते मर्यादित होतेमात्र छपाईमुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर प्रसारमाध्यमांचा विकास झाला. दूरदर्शन सुरू झाले तेव्हा वृत्तपत्रांना धोका वाटत होताडिजिटल माध्यमे आली तेव्हा टीव्हीला धोका वाटू लागला. मात्र या सर्व बदलांनंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले. भविष्यातही पत्रकारिता टिकेलमात्र जे काही काम स्वयंचलित होऊ शकते ते एआयमुळे स्वयंचलित होणार हेही वास्तव आहेअसे त्यांनी नमूद केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi