*‼️प्रत्येकाने जेवणापूर्वी “दासबोध” मध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला खालील श्लोक म्हटला जातो. ताटासमोरची शांत कृतज्ञता!*‼️🌹🙏❇️💐🌻
*भारतीय संस्कृतीत जेवण म्हणजे केवळ पोट भरण्याचे साधन नसून ते एक संस्कार मानला जातो.*
*म्हणूनच जेवणापूर्वी “दासबोध” मध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला खालील श्लोक म्हटला जातो.*
*“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।*
*सहज हवन होते नाम घेता फुकाचे ॥*
*जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह ।*
*उदरभरण नोहे जीणिजे यज्ञकर्म ॥”*
*या काही ओळींमध्ये केवळ देवाचे स्मरण नसते. तर अन्नासाठी त्यामागील श्रमासाठी आणि मिळालेल्या समाधानासाठी कृतज्ञता दडलेली असते. मग असे अन्न खाताना अहंकार भाव नसावा. कारण ते आपल्या कष्टाचे असले तरी ते ईश्वर कृपेने मिळालेले असते. त्यात ईश्वराचा वास व देवपूजेसारखे पुण्यकर्म असते. असे श्रद्धेने, योग्य भावनेने केलेले जेवण म्हणजेच यज्ञ होय.*
*अशी प्रार्थना करण्याची आपली परंपरा आहे. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनात आणि मोबाईल मध्ये गुंतलेल्या आयुष्यात ही प्रार्थना हळूहळू विस्मरणात जात आहे.*
*परदेशात रहात असताना, एके दिवशी अगदी सहजपणे माझ्या नजरेत एक साधसं दृश्य आलं. आणि माझ्या मनात ते खोलवर रुतून बसलं. माझी कामवाली (मेड) जेवणाच्या प्लेट समोर बसली होती. तिचे डोळे मिटले होते. आणि ओठाने हलकेच पुटपुटत होती. सभोवतालच्या गडबडीतही तिच्याभोवती शांततेचे एक वलय होते.*
*जेवणानंतर मी तिला विचारलं. तेव्हा ती सहजपणे म्हणाली Madam,”We are praying for and believing in one God in heaven “ (“मी प्रार्थना करत होती.” )*
*मला थोडं आश्चर्यच वाटलं. पुढे ती म्हणाली की, त्यांच्या संस्कृतीत जेवणापूर्वी देवाचे आभार मानण्याची पद्धत आहे. अर्थात, तिने ती प्रार्थना तिच्या स्थानिक भाषेत केली होती. पण नंतर तिने मला तिचा अर्थ इंग्रजीत सांगितला. खरेतर तिच्या प्रार्थनेचे शब्द साधे पण अर्थ विलक्षण खोल विचार करायला लावणारा होता. ती म्हणाली, “आम्ही अगोदर देवाचे आभार मानतो. कारण त्याच्या कृपेने मला आज हे अन्न मिळाले. आणि त्याच्याच बरोबर तुमचेही आभार मानतो कारण तुम्ही ते मला दिले. त्यामुळेच मी आज तृप्तपणे खाऊ शकते आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सदैव सुख शांती लाभो अशीही मी देवाकडे प्रार्थना करते. थोडक्यात काय, “अन्न दाता सुखी भव।”*
*म्हणजेच प्रार्थना शब्दात नसते. ती भावनेत असते. ती देवळात नाही तर ताटा समोरही करायची असते. आणि त्याच क्षणी मला प्रकर्षाने जाणवलं प्रार्थना ही भाषा, देश किंवा संस्कृतीत अडकलेली नसते. आपल्यापेक्षा वेगळ्या देशात, वेगळ्या संस्कृतीतील एक साधी स्त्री अन्नाप्रती इतकी कृतज्ञता व्यक्त करते. की जी कृतज्ञता आपण विसरत चाललो आहोत. तीच कृतज्ञता एका परक्या देशात अजूनही श्वास घेताना पाहत होते.*
*कदाचित पुन्हा एकदा आपल्याला हे असेच जेवणापूर्वी थोडं थांबायला हवं ताटाकडे पाहून क्षणभर डोळे मिटून शब्दाशिवाय “धन्यवाद” म्हणायला हवेत. कारण “अन्न पोट भरतं.” पण “कृतज्ञता माणूसपण जिवंत ठेवत.”*
*ॐ नमःशिवाय*
*!!सर्वांना राम कृष्ण हरी!!*
*!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!*
*श्री स्वामी समर्थ*
*समाजातील प्रामाणिक, समाजसेवक, यांच्यावर प्रेम करा पण विश्वासघातकी, दगाबाज, खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, चुगलीखोर अश्या लोकांपासुन सावध व दूर रहा, कुठल्याही अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.*
‼️🌹🙏‼️🌹🙏‼️🌹🙏
No comments:
Post a Comment