सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन संकुल
असलेले नागपूर भारतातील प्रमुख केंद्र
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वारी एनर्जीच्या 10 गिगावॅट एकात्मिक प्रकल्पाचे भूमिपूजन
नागपूर, दि. 14 : सौरऊर्जा निर्मितीमध्ये जागतिकस्तरावर महत्त्वाची भूमिका असलेल्या एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन संकुल नागपूर येथे वारी एनर्जिज माध्यमातून उभारण्यात येत आहे. भारतातील सर्वात मोठी 10 गिगावॅट क्षमता असलेला हा प्रकल्प सौर क्षेत्रासाठी अधिक स्थिर देशांतर्गत पुरवठा यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सौरऊर्जा निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment