Saturday, 3 January 2026

महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार

 महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेने  महत्त्वाचा टप्पा

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट४५ हजार रोजगार निर्माण होणार

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि.12 - महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे Global Capability Center (GCC) अर्थात जागतिक क्षमता केंद्र  उभारणार आहे. या प्रकल्पातून 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकूण 45,000 रोजगार निर्माण  होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिओ कन्व्हेशन सेंटर येथे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलासीईओ, ANSR , विक्रम आहुजाब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या गुंतवणूक व तांत्रिक भागीदारी  प्रकल्पाच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi