गरीब आणि गरजू माणसाला मदत करायची आहे, या भावनेने जनआरोग्य योजना अधिक लोकाभिमुख कराव्यात, असे सांगून आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, तज्ज्ञ समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची राज्यभर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, या योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्यास पात्र लाभार्थ्यांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल, असेही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
बैठकीत शासकीय जनआरोग्य योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि रुग्णकेंद्रित करण्यावर भर देण्यात आला.
No comments:
Post a Comment