राज्यात भरडधान्य आधारित उपक्रमांना गती देण्यासाठी
विशेष कार्यदलाची आवश्यकता
कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी
मुंबई, दि.२७: कमी पाण्यात तग धरणारे पीक म्हणजे तृणधान्य हे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. निसर्गाच्या सान्निध्यात, तसेच कमी पाण्यात येणारी बाजरी, ज्वारी, नाचणी या भरडधान्यांच्या उत्पादनात राज्य आघाडीवर आहे. राज्यात दर्जेदार तृणधान्य- भरडधान्यांची पेरणी ते विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी, भरडधान्य उत्पादन व विक्री समन्वयासाठी राज्यस्तरीय भरडधान्य टास्क फोर्स स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभाग आणि एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या कृषी विषयक एक दिवशीय कार्यशाळेत अपर मुख्य सचिव रस्तोगी बोलत होते. या चर्चासत्रात संशोधक, शेतकरी प्रतिनिधी, भरडधान्य क्षेत्रातील संबंधित तज्ज्ञ सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment