तृणधान्य म्हणजे ज्वारी व बाजरी आणि छोटे तृणधान्य म्हणजे नाचणी, भगर, राळ, कोद्रो, सावा, वरी, छोटा सावा तसेच छोट्या तृणधान्यांना विविध भागात नागली, मोर, भादली, कांगणी असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. राज्यातील हवामान आधारित या भरडधान्य पिकांचा विस्तार कसा करता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली. भरडधान्ये आणि इतर अनुषंगिक दुर्मिळ पिके उच्च पोषणमूल्ये असलेली सर्वांना माफक दरात उपलब्ध होणे गरजेचे आहे. भरडधान्यांपासून बनवलेल्या उत्पादनांची मागणी वाढावी भरडधान्यांपासून बनविलेल्या उत्पादनांना चव, रंग आणि सादरीकरण यांवर अधिक लक्ष दिले तर विशेषतः तरुण पिढीत या पोषणधान्यांची मागणी वाढू शकते.
अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी शासन विविध प्रयत्न करत आहे. हवामानातील वाढती अनिश्चितता आणि मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भरडधान्य पिके विशेष महत्त्वाची आहेत. मात्र, मूल्यसाखळीतील अडचणी, दर्जेदार बियाण्यांचा अभाव, बाजारपेठेची अपुरी उपलब्धता तसेच ग्राहकांमध्ये कमी जागरूकता आणि मागणी या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शासनाचा टास्क फोर्स काम करणार आहे.
No comments:
Post a Comment