Thursday, 22 January 2026

भारत निवडणूक आयोगाच्या ‘ईसीआयनेट’ डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन

 भारत निवडणूक आयोगाच्या ईसीआयनेट’ डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन

 

मुंबईदि.२२ : भारत निवडणूक आयोगाने इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम)-२०२६ दरम्यान ईसीआयनेट (ईसीआयएनईटी)’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भरत मंडपमनवी दिल्ली येथे ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतूनतसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या सहकार्याने ‘ईसीआयनेट’ची निर्मिती करण्यात आली असूनत्याची विकासाची घोषणा मे २०२५ मध्ये करण्यात आली होती.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले कीहा प्लॅटफॉर्म कायद्याच्या चौकटीत विकसित करण्यात आला असून तो २२ अनुसूचित भाषा आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्थांनी त्यांच्या देशांतर्गत कायदे व स्थानिक भाषांनुसार अशाच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या विकासासाठी भारतासोबत सहकार्य करावेअसे आवाहनही त्यांनी केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi