Thursday, 15 January 2026

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध

 बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ३ हजार ३०० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या चमू कार्यरत आहेत. तसेच गरज भासल्यास गरजू रुग्णाला तत्काळ रुग्णालयात नेणे सुलभ व्हावीयासाठी ८० रुग्णवाहिका देखील तैनात ठेवण्यात आल्या आहेत. प्राथमिक वैद्यकीय सेवा सुविधेच्या दृष्टीने आवश्यक असणारी औषधेगोळ्याइंजेक्शन्स इत्यादी देखील सर्व वैद्यकीय चमूंकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi