राष्ट्रीय मतदार दिन
राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे. कर्तव्य
25 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवण्यात आली. त्यामुळे भारतीय लोकशाहीत 25 जानेवारी या दिवसाला अतिशय महत्व आहे. तथापि, नागरिकांना आपल्या मताची किंमत उपयोगिता, महत्व आणि कर्तव्य कळावे यासाठी 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो. 2026 हे वर्ष राष्ट्रीय मतदार दिनाचे 16 वे वर्ष आहे. निवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रीद वाक्य 'माझा भारत माझे मत ' हे ठेवले आहे
No comments:
Post a Comment