Saturday, 24 January 2026

एक मत ग्रामपंचायतीपासून तर संसदेच्या माध्यमातून देश घडविण्यात महत्वपूर्ण

 भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात अनुच्छेद 326 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा समान अधिकार बहाल करण्यात आला आहेहा अधिकार केवळ मतदानापुरता मर्यादित नसूनतो देशाच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहेआपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून संविधानाची अंमलबजावणी होतेकायदे बनतातधोरणे ठरतात आणि देशाची दिशा निश्चित होतेत्यामुळे मतदानाचा हक्क म्हणजे सामान्य नागरिकांच्या हातात दिलेले अत्यंत प्रभावी लोकशाही अस्त्र आहे.  आपले एक-एक मत ग्रामपंचायतीपासून तर संसदेच्या माध्यमातून देश घडविण्यात महत्वपूर्ण ठरते.  या देशासाठी काय करायचे तर सर्वप्रथम जागरुक मतदार बनायचे  मतदानाचा हक्क प्रत्येक निवडणुकीत गाजवायचा हे प्रथम कर्तव्य संविधानाला अपेक्षित आहे.  18 वर्षावरील प्रत्येक सुजाण नागरिकाला हा हक्क संविधानाने दिला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi