आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे
-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. 8 : राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
आरोग्यमंत्र्यांनी नुकताच अमरावती, मेळघाट, अकोला, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विविध आरोग्य संस्थांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाही बाबतची आढावा बैठक मंत्रालयातील समिती सभागृहात झाली.
No comments:
Post a Comment