राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 65 वसतिगृहे सुरू ;
उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्येही जागा निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुलींच्या वसतीगृहातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ, डेअरीच्या पडीक जागांचाही वसतीगृहासाठी वापर
- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
नागपूर, दि. 9 : इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी राज्यात 65 नवी वसतिगृहे सुरू करण्याचे काम इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पूर्ण केले असून या उपक्रमाचे श्रेय मंत्री अतुल सावे यांना दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
No comments:
Post a Comment