‘स्वयंसिध्दा’ उपक्रमासाठी महिलांनी 'स्त्री शक्ती'ॲप वर
जास्तीत जास्त नोंदणी करावी
-राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे
मुंबई, दि.15 : महिला सशक्तिकरणाच्या उद्देशाने राज्य सार्वजनिक विद्यापीठांअंतर्गत सुरू केलेल्या 'स्वयंसिध्दा उपक्रमासाठी' जास्तीत जास्त महिला विद्यार्थीनींना जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे तसेच स्वयंसिध्दा उपक्रमासाठी महिलांनी ' स्त्रीशक्ती' ॲप वर जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे निर्देश माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले
'लोकभवन' येथे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंसिध्दा उपक्रमाबाबत दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यपालांचे उपसचिव राम मूर्ती, लोकभवनमधील सह संचालक (वै. वि. मं.) विकास कुलकर्णी तसेच दूरदृश्य प्रणाली द्वारे स्वयंसिद्धा उपक्रम अंमलबजावणीतील राज्य सार्वजनिक विद्यापीठांचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणाली द्वारे यावेळी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment