ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीला दिलासा देणारा
या प्रकल्पामुळे इंधन बचत, प्रदूषणात घट आणि कार्यालयीन प्रवासात वेळेची मोठी बचत होणार असल्याचे ते म्हणाले. मुंबई–पश्चिम उपनगर आणि नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्यांनाही या बोगद्याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईतील भूमिगत वाहतूक व्यवस्थेचा हा मोठा प्रयोग असून फ्लायओव्हर, कोस्टल बोगदा, आणि आता भूमिगत बोगदा या सर्वांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याचे खऱ्या अर्थाने हा गेम चेंजर प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पाची माहिती
Ø मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे.
Ø प्रकल्पाचा खर्चः रु ८०५६ कोटी
Ø पूर्णत्वाचा कालावधीः ५४ महिने
प्रकल्पाचे मुख्य फायदे
Ø मुंबईतील पूर्व-पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबई या भुयारी मार्गाद्वारे जोडली जाईल.
Ø प्रवासाचा वेळ १५-२० मिनिटांनी कमी होईल.
Ø इंधनाची बचत होईल.
Ø तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
प्रकल्प तपशील
Ø हा भारतातील पहिला शहरी बोगदा प्रकल्प असून तो घनदाट लोकवस्ती असलेल्या भागाखालून तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) च्या ५० मी. खालून जातो.
Ø प्रकल्पाची एकूण लांबी ९.९६ किमी , ज्यामध्ये जवळपास ७ किमी भुयारी मार्ग .
Ø प्रत्येक बोगद्यात ३.२ मीटर रुंदीचे २ पदरी रस्ते, १ पदरी आपत्कालीन रस्ता . दोन्ही बोगद्यांमध्ये वेग मर्यादा वेग ८० किमी/तास .
Ø दोन्ही बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकमेकांशी प्रत्येकी ३०० मी. अंतरावर क्रॉसपॅसेजद्वारे जोडले जातील.
Ø बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या क्षमतेचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. आग प्रतिरोधक यंत्रणा, पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था, सुयोग्य व आधुनिक पध्दतीने वाहतूक विनिमयासाठी इन्टीलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (आयटीएस) इत्यादी बाबींचे प्रयोजन आहे.
Ø प्रकल्पाच्या जमिनीखालील संरेखनामुळे भू-संपादन कमी होते, शहरी वातावरण जपते आणि शहरात कमीत कमी व्यत्यय सुनिश्चित करते.
Ø सदर प्रकल्प हा मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि अटल सेतू सारख्या प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी जोडला जातो.
बोगद्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान
Ø या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा स्लरी शील्ड प्रकारची टनेल बोरिंग मशीन असून, ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित आणि मुंबईच्या किनारी भूगर्भातील मिश्र व खडकाळ भूस्तराकरीता अचूक व सुरक्षित खोदकाम करणारी यंत्रणा आहे.
Ø हे तंत्रज्ञान मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात देखील वापरण्यात आले असल्याने कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.
टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)
Ø प्रकल्पासाठी वापरले जाणाऱ्या टीबीएमचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मितीची कामे स्थानिक पातळीवर मूळ टनेल बोरिंग मशीन उत्पादक (ओईएम) यांचा देखरेखीत करण्यात आले आहे.
Ø कटर हेड व्यासः १२.१९ मीटर
Ø लांबी: ८२ मीटर
Ø वजनः अंदाजे २, ४०० मेट्रिक टन.
No comments:
Post a Comment