महापरिनिर्वाण दिनानिमित्त
‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
महासंचालक सुनिल वारे यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. 3: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमांतर्गत “महापरिनिर्वाण दिनानिमित्त - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व योगदान” या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत 6, 8 आणि 9 डिसेंबर 2025 या रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 9 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था घडविण्यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने कार्यरत आहे. समाजातील वंचित घटकांना अंधश्रद्धा, जातीय-पंथीय भेदभाव, सांप्रदायिक द्वेष व असमानतेतून मुक्त करत वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक ऐक्य आणि समतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी शासनामार्फत विविध धोरणात्मक उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर, ‘महापरिनिर्वाण दिन’ निमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुआयामी कार्य, विचारसंपदा आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान या विषयावर महासंचालक श्री. वारे यांनी ‘दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
00000
No comments:
Post a Comment