मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह
शहरी बोगदा प्रकल्पातील टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ
या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, ते आणखी सहा महिने आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. एल अॅण्ड टी या नामांकित कंपनीकडे कामाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.वरळी–शिवडी सी-लिंक पुढील वर्षी खुला झाल्यानंतर, तसेच कोस्टल रोड जोडणी झाल्यावर, पश्चिम उपनगरातील लोकांनाही नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे हजारो लोकांचे हजारो तास वाचवणारा हा प्रकल्प असून, मुंबईच्या वाहतुकीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment