बहुराष्ट्रीय जबील कंपनीकडून आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण
· विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी
मुंबई, दि. १७ :- अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय जबील कंपनीने महाराष्ट्रातील काही निवडक आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जबील कंपनीच्या शिष्टमंडळाने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली. यावेळी कंपनीने महाराष्ट्रातील आयटीआय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment