नागपूर विभागातील शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध
- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
नागपूर, दि. १४ :- नागपूर विभागातील शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य सुधाकर अडबाले यांनी म.वि.प. नियम ९७ अन्वये या विषयी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले, नागपूर विभागातील शिक्षकांच्या प्रसिद्ध केलेल्या सेवा ज्येष्ठता यादीवर येणाऱ्या आक्षेपांचे निराकरण करून एक महिन्याच्या आत यावर निर्णय घेतले जातील. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अडचणी असतील त्या देखील सोडवल्या जातील, असेही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment