Wednesday, 17 December 2025

राज्याचा विकास थांबणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर प्रतिपादन महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना

 राज्याचा विकास थांबणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत

अंतिम आठवडा प्रस्तावावर प्रतिपादन

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना

रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूरदि. 14 : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असूनसर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्जराजकोषीय तूटगुंतवणूकरोजगारनिर्मितीसिंचनवीजदळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व  नेत्यांना एकत्र येऊन रचनात्मक कार्यातून राज्याला वेगाने पुढे नेण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi