महाराष्ट्र सदनात खाद्य महोत्सवाचे उद्घाटन
महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा जगभरात प्रसार व्हावा : शेफ विष्णू मनोहर
नवी दिल्ली, १२ : महाराष्ट्राच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा दिल्लीकरांना परिचय व्हावा यासाठी आयोजित महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अत्यंत समृद्ध व वैशिष्ट्यपूर्ण असून तिचा जगभरात प्रचार प्रसार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विष्णू मनोहर यांनी यावेळी केले.
नवी दिल्ली येथील कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात आयोजित या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे. 25 स्टॉल्सच्या माध्यमातून या खाद्यसंस्कृतीचा परिचय करून देण्यात आला आहे. कोकणातील सी-फूडपासून खास वैदर्भिय पदार्थांपर्यंत , पश्चिम महाराष्ट्रातील व खानदेश-मराठवाड्याच्या पारंपरिक डिशेसपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, उपअभियंता किरण चौधरी, आशुतोष द्विवेदी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment