Friday, 12 December 2025

कापड गिरण्यांच्या जमिनीवरील, जुन्या इमारती व चाळींचा पुनर्विकासास प्रोत्साहन देण्याचे,

 कापड गिरण्यांच्या जमिनीवरीलजुन्या इमारती व चाळींचा पुनर्विकासास प्रोत्साहन देण्याचेअनुषंगाने बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मधील विनियम ३५ (७) (अ) मध्ये अन्य नियमावलीच्या धर्तीवरसुधारणा एमआर आणि टीपी कायद्याचे कलम ३७ (१ क क) अन्वये फेरबदलाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करुनया फेरबदल प्रस्तावास शासनाने मंजूरी दिली आहे. फेरबदल मंजूरीचीअधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

           या सुधारणेमुळे कापड गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींचापुनर्विकास सुसह्य होणार असून पुनर्विकासास चालना मिळेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याविकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मधीलविनियम ३५ मध्येकापड गिरण्यांच्या जमिनींच्या विकास किंवा पुनर्विकासासाठी तरतुदी आहेत. या तरतुदीमधील खंड (७) (अ) मध्येकापड गिरण्यांच्या जमिनीवरव्यापलेल्या निवासी / निवासी सह व्यावसायिक इमारती/चाळीच्या पुनर्विकासाबाबततरतुदी नमूद केलेल्या आहेत. या तरतुदीनुसारकापड गिरण्यांच्या जमिनीवरीलजुन्या इमारती / चाळी किंवा गिरणीच्या जमिनीवरील पात्र रहिवाशांना पुनर्वसनामध्ये सदनिकेचा अधिकार आहे. मात्र या नियमावलीत रहिवाशांना पुनर्वसन क्षेत्र प्रदान करण्यासाठीविकासक / मालक यांना प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्राची तरतुद समाविष्ट नाही. त्यामुळे जमिनमालक / विकासककापड गिरण्यांच्या जमिनीवरील इमारती/चाळींच्या पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदनात सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi