'झेब्रु' शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• रस्ता सुरक्षा जन जागृतीसाठी झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा
नागपूर, दि. 9 : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने 'झेब्रु' शुभंकराचा अनावरण परिवहन विभागाचे महत्त्वाचे पाऊल आहे. या शुभंकरामुळे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी झेब्रु शुभंकराचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात आयोजित सोहळ्यात करण्यात आले.
No comments:
Post a Comment