Friday, 26 December 2025

जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची मुलाखत

मुंबईदि. २६माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात  'बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी व नियोजनया विषयावर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारदि. 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. तर 'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत बुधवारदि. 31 डिसेंबर 2025 तसेच गुरूवार दि. 1 व शुक्रवार दि. 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. निवेदक जाई वैशंपायन यांनी ही मुलाखत घेतली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असूननिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्व संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे प्रशासन सांभाळणारी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ही आशिया खंडातील सर्वात मोठी आणि प्रभावी नागरी संस्था मानली जाते. शहरातील मूलभूत नागरी सुविधासार्वजनिक आरोग्य व्यवस्थाशिक्षणआपत्ती व्यवस्थापनपायाभूत सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध सेवांमध्ये मुंबई महानगरपालिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शकमुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेले नियोजन तसेच मतदारांसाठी आवश्यक सुविधामतदान केंद्रांवरील व्यवस्थापनसुरक्षेची व्यवस्था तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी याबाबत 'जय महाराष्ट्रआणि 'दिलखुलासकार्यक्रमात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi