Friday, 26 December 2025

विनापरवाना किटकनाशके, घरगुती वापरासाठीची (उदा. झुरळ, उंदीर, ढेकूण, मच्छर, डास, मुंग्या इत्यादी नियंत्रण

 विनापरवाना किटकनाशके, घरगुती वापरासाठीची (उदा. झुरळ, उंदीर, ढेकूण, मच्छर, डास, मुंग्या इत्यादी नियंत्रण) किटकनाशके यांचा साठा व विक्री तसेच पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स करणाऱ्या विक्रेते व व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेस आहे. तरी मुंबई शहर,मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांतील सर्व विक्रेत्यांनी किटकनाशके साठा च विक्री (घाऊक व किरकोळ), घरगुती किटकनाशके विक्री व किटकनाशके फवारणी करणेसाठी परवाने त्वरित घ्यावेत व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन  कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, यांनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे, ७वा मजला, धर्मवीर आनंद प्रशासकीय इमारत, कशीश पार्क, एल.बी.एस मार्ग, तीन हात नाक्याजवळ, ठाणे (पश्चिम) ४००६०४ संपर्क क्रमांक ८६९१०५८०९४ येथे संपर्क साधावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचाल शिवाजी आमले यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi