Monday, 29 December 2025

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा

 अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

 

नागपूरदि.११ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवावातसेच योजनांच्या अंमलबजावणीस गती देण्यात यावीअसे निर्देश दिले.

 

          अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांचा आढावा मंत्री श्री. विखे पाटील यांनी नागपूर येथील विधान भवनातील त्यांच्या दालनात आयोजित बैठकीत घेतला. या आढावा बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलआमदार सर्वश्री निरंजन डावखरेअभिमन्यू पवारॲड. राहुल कुलसामान्य प्रशासन विभागाचे सचिव गणेश पाटीलमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख तसेच वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे उपस्थित होते.

 

          या बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनात्यांची अंमलबजावणी याचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. यावेळी सर्व संबंधितांना निर्देश देताना म्हणालेमहामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना व्यापक प्रचार-प्रसिद्धी मिळावी म्हणून जिल्हानिहाय व विभागनिहाय कार्यक्रममेळावे आणि माहितीपर उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात यावा. यामुळे लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती सहज पोहोचेल. तसेच महामंडळाचे संकेतस्थळ तातडीने सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही तत्काळ करावीअसे निर्देश त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi