Tuesday, 30 December 2025

नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता

 नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•        हडपसर - यवत रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात

•        पायाभूत सुविधा मंत्रिमंडळ समितीची बैठक

 

नागपूरदि. 9 : नागपूर - चंद्रपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अंतर्गत केंद्र शासनाच्या गतीशक्ती पोर्टलकडून प्राप्त सूचनांचा विचार करून एकूण 204 किलोमीटर लांबीच्या सुधारित रस्ता आखणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.  मुंबई शहरातील घाटकोपर पूर्वचेंबूर आणि अंधेरी (प.) आंबिवली मुद्रण कामगार नगर व चुनाभट्टी येथील भूखंडांचा खासगीकरणाच्या माध्यमातून विकासाच्या मुदतवाढीस देखील आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

          बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेमुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi