Monday, 15 December 2025

नागपूरमधील लीज प्रॉपर्टीज फ्री-होल्ड करण्याबाबत विचार करणार

 नागपूरमधील लीज प्रॉपर्टीज फ्री-होल्ड करण्याबाबत विचार करणार

- मंत्री शंभूराज देसाई

 

नागपूरदि. १४ :  नागपूर महानगरपालिका व सुधार प्राधिकरणाच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या मालमत्तांबाबतचे करार संबंधित अटी-शर्तींनुसार सुरू आहेत. मात्र या मालमत्ता फ्री-होल्ड करून भूखंडधारक किंवा मालमत्ताधारकांना देण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच  प्राप्त झाला असल्याने तो तातडीने तपासण्यात येईलअशी माहिती  मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्राधिकरणामार्फत भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंड व मालमत्तांबाबत विधानसभा सदस्य प्रवीण दटके यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मुद्दा उपस्थित केलात्यावेळी मंत्री देसाई यांनीही माहिती दिली.

यासंदर्भात मंत्री देसाई म्हणाले कीयासंदर्भात नगरविकासविधि व न्याय विभाग  आणि वित्त विभाग यांच्याकडून अभिप्राय घेतला जाणार आहे. तसेच फ्री-होल्ड प्रॉपर्टी करण्यासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक धोरण ठरवावे लागेल.  एका महानगरपालिकेसाठी घेतलेला निर्णय भविष्यात संपूर्ण राज्यासाठी लागू होऊ शकतोत्यामुळे धोरणात्मक निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi