Wednesday, 10 December 2025

लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही

 लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

नागपूरदि. 10 : लाडकी बहीण योजना ही सरकारची लोकाभिमुख आणि जनकल्याणकारी योजना असून ती कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. योजना सुरू करताना आम्ही सकारात्मक भावनेने निर्णय घेतलाअशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

            विधानसभा सदस्य सुनील प्रभूजयंत पाटीलनानाभाऊ पटोलेहारून शेख यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एका लक्षवेधी सुचनेद्वारे विचारणा केली असताउपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी उत्तर दिले.

            उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीआचारसंहितेच्या काळातही लाभार्थींना अडथळा येऊ नये म्हणून आगाऊ निधीही उपलब्ध करून देण्यात आले होते. लाभार्थी बहिणींनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात जनादेश दिला आहे. त्यामुळे ही योजना कमी करणे किंवा बंद करणे तर दूरचआम्ही ज्या-ज्या घोषणा केल्या आहेत त्या योग्य वेळी पूर्ण केल्या जातील.

            उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले कीलाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी मोठा आधार असून तिचा विस्तार आणि लाभ सातत्याने सुरु राहील. शासन दिलेल्या सर्व वचनांची पूर्तता करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi