पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार
- मंत्री डॉ.उदय सामंत
नागपूर, दि. 12 : पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली समिती आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईल, असे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.
पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडीबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ. सामंत बोलत होते.
मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, पुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजन विभाग आणि ट्रॅफिक प्लॅनर नेमण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल.
No comments:
Post a Comment