Thursday, 11 December 2025

विकास सेवा संस्था सक्षम असणे आवश्यक

 विकास सेवा संस्था सक्षम असणे आवश्यक

-         सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 

नागपूरदि. १० - शेतकऱ्यांना कर्ज मिळावे यादृष्टीने विकास सेवा संस्था सक्षम असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने एका महसूली गावात एकापेक्षा जास्त संस्था उघडण्यात येत नाहीत. तथापि पहिल्या संस्था सक्षम असतील तर नवीन विकास संस्था स्थापन करण्याचे निर्देश देण्यात येतीलअसे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य प्रवीण दरेकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरेप्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणालेअहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील नियोजित पुण्यश्लोक विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेस जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक मर्यादित अहिल्यानगरच्या अरणगावता. जामखेड शाखेत खाते उघडून देण्यासह कर्ज पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात येतील

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi